24/10/2023
*शंभर लोकांनी रक्तदान करून नवरात्रीचे सेवा अंबाबाई चरणी अर्पण......*
व्हाईट आर्मी व करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी हक्कदार श्री पूजक मंडळ संयुक्त विद्यमाने
गेले पंधरा वर्षे शारदीय नवरात्र उत्सव निमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. याहीवर्षी आज व उद्या (२४ व २५ ऑक्टो. २०२३) आयोजित करण्यात करण्यात आले आहे.
आज दसऱ्या च्या दिवशी शंभर लोकांनी रक्तदान करून रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.
आज सकाळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री राहुल रेखावर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी देवस्थानचे सचिव बनसोडे राजवाड्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव देवस्थानचे व्यवस्थापक दिंडे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे प्रशांत शेंडे यांच्या उपस्थितीत झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराची रक्तदान करण्यास सुरुवात झाली यामध्ये देवस्थानचे सचिव देवस्थानचे सचिव श्री बनसोडे सर, पोलीस अधिकारी, तरुण मुले जे नुकतीच पहिल्यांदा रक्तदान केले असे महिला व पुरुष यांचा सहभाग त्याचबरोबर 63 वर्षाचे सरोजिनी जाधव, 55 वेळा रक्तदान करणारे अमृत मिरजकर यांनी रक्तदान करून सहभाग नोदविला. आजच्या रक्तदान शिबिरामध्ये वरील विशेष याबरोबर गुजरात ते कर्नाटक, चिकमंगळूर, हुबळी, बेळगाव, महाराष्ट्र, नागपूर ते जळगाव नंदुरबार, बार्शी, लातूर येथून प्रतिवर्षीप्रमाणे कोल्हापूर सांगली साताऱ्यातील श्री अंबाबाईच्या दर्शनात आलेले भक्त सेवक वर्ग तसेच व्हाईट आर्मीचे जवान यांनी रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपली नवरात्रीचे सेवा सांगता करण्यात आली.
आज रक्तदान शिबिरा विशेष माननीय युवराज यशराज भोसले यांनी भेट दिली यांच्या हस्ते नवरात्र काळात सेवा देणाऱ्या भक्तांचा प्रमुख रायगड उत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत देवस्थान सीसीटीव्हीचे प्रमुख राहुल जगताप देवीचे पायघड्या सेवा करणारे संदीप दोशी शैलेश बांदेकर सत्कार यांचा सत्कार करण्यात आला.
आजच्या रक्त संकलन छत्रपती प्रमिलाराजे सीपीआर हॉस्पिटल व अर्पण ब्लड बँक यांच्या व्यवस्थापनेखाली करण्यात आले.