15/06/2025
आज जागतिक पितृ दिन (१५ जून)...
आपल्या संस्कृतीने आई, वडील आणि गुरुजनांचा आदर करण्याची, त्यांचा नित्य सन्मान राखण्याची शिकवण दिली आहे. आई, वडील प्रत्येक कुटुंबाचे महत्त्वाचे घटक असतात. मात्र कुटुंबाचा आधारवड म्हणजे वडील. स्वतःच्या आधी नेहमी कुटुंबाचा विचार करणारी व्यक्ती म्हणजे वडील. कधी चुकांवर ओरडणारी, तर कधी प्रेमाने डोक्यावर हात फिरवणारी, सुसंस्कार करणारी, यशाची प्रेरणा रुजविणारी ही व्यक्ती. आपल्याला वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टांचा, त्यागाचा सन्मान आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी जागतिक पितृ दिन (International Father’s Day) साजरा केला जातो.
भारतीय संस्कृतीत मातेप्रमाणे पित्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांचे संगोपन, पोषण, कुटुंबाचे रक्षण आदी कर्तव्ये पार पडणाऱ्या वडिलांचे स्थान म्हणूनच अमूल्य प्रकारचे आहे. वडिलांचा सन्मान, आदर राखू या, त्यांच्याप्रति आजच्याच दिवशी नव्हे, सदैव कृतज्ञ राहू या...
#