
24/12/2024
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या "*हिरक महोत्सवी संशोधन आरंभ योजना 2024-2025* " अंतर्गत *यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील* दोन प्राध्यापकांना संशोधनासाठी अनुदान मंजुर झाले आहे. प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक *डॉ. ए. आर. भुसनर* यांनी "शेती पिकावरील कीड व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भक्षक कीटक , (बायोकंट्रोल एजंट्स) च्या बायोनॉमिक्स आणि बायोकंट्रोल संभाव्यतेवरील अभ्यास" या विषयावर संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यांना या संशोधनासाठी 1,39,000/- इतके अनुदान मंजूर झाले आहे. तसेच भौतिकशास्त्र विषयातील सहाय्यक प्राध्यापक *डॉ.एस. एस. पुजारी* यांनी “सिंथेसिस ऑफ निकेल-कोबाल्ट फॉस्फेट थिन फिल्म्स ॲज ॲन इलेक्ट्रोकॅटॅलिस्ट फॉर नॉन-एंझायमेटिक ग्लुकोज सेन्सिंग” या विषयावर संशोधन प्रस्ताव विद्यापीठास पाठवला होता. त्यांना या संशोधनासाठी 2,50,000/- इतके अनुदान मंजुर झाले आहे. या संशोधन प्रस्तावासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य *प्रो. डॉ. ए. एम. शेख* , मुख्य कार्यकारी अधिकारी *डॉ. विलास कार्जींनी* व संस्था अध्यक्ष आमदार *मा. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर)* यांची प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले.