Sushrut Ivf

Sushrut Ivf Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushrut Ivf, Medical and health, 2013-E ward Rajarampuri 6th Lane, Kolhapur.

आपल्या सर्वांना कळविण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे, आपल्या सर्वांचे  श्रेयस व सुश्रुत आय वी एफ हॉस्पिटल नवीन रुपात विविध...
22/08/2024

आपल्या सर्वांना कळविण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे, आपल्या सर्वांचे श्रेयस व सुश्रुत आय वी एफ हॉस्पिटल नवीन रुपात विविध आरोग्य सेवा सुविधांनी सुसज्ज होत असून लवकरच आपण राजारामपुरी मधून उजळाईवाडी येथे ९ मजली इमारती मध्ये स्थलांतरित होत आहोत. आपणा सर्वांचे सहकार्य आम्हाला आमचे कार्य करण्यास सदैव उपयुक्त ठरले आहे,आपले शुभाशीर्वाद कायम आमच्या सोबत आहेत . सर्व अत्याधुनिक व अद्ययावत सोयींनी युक्त कोल्हापुरातील श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट रुग्णांसाठी महत्वाच्या व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांसाठी कायम कार्यरत राहील.

25/07/2024
30/03/2024

रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांच्या तर्फे PCOS या विषयावर डॉक्टर जिरगे मॅडम, एंडोक्राइनोलॉजिस्ट
आणि इतर डॉक्टर आज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सवांद साधणार आहेत तरी याचा लाभ आमच्या पेजवर थेट प्रक्षेपणाद्वारे घ्यावा .हा कार्यक्रम PCOS सोसायटी ऑफ इंडिया यांच्या कडून आयोजित केला आहे .

30/11/2023

दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर व त्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

बदललेली जीवनशैली वंध्यत्वासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे हे आपल्याला माहीतच आहे ,आहार ,वजन, व्यायामाचा अभाव ,मानसिक व शारीरिक ताणतणाव यासोबतच पर्यावरणात मानवनिर्मित काही घातक गोष्टींचा अतिवापर हा देखील त्यासाठी तितका जबाबदार ठरत आहे त्यापैकी एक म्हणजे प्लास्टिक. सहज उपलब्धता स्वस्त व टिकाऊ यामुळे नकळत आपल्या घरात प्लास्टिक कधी साठत गेलं हे आपल्या लक्षातच आलं नाही आणि त्याचा थेट परिणाम हा स्त्री व पुरुष प्रजनन क्षमतेवर होत आहे प्लास्टिक मध्ये endocrine disrupting chemicals (EDC) खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि याचा गंभीर परिणाम केवळ प्रजनन क्षमतेवरच नाही तर आरोग्यावरही होत आहे .प्लास्टिक मधील केमिकल्स मुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे तसेच त्यांच्या गुणवत्तेवर देखील मोठा परिणाम होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे .त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील अंडाशय व स्त्रीबीजावर परिणाम एकंदरीतच गर्भधारणेपासून गर्भाची वाढ प्रेग्नेंसी मधील कॉम्प्लिकेशन्स वारंवार होणारे गर्भपात या सर्वांना हे घातक केमिकल्स कारणीभूत ठरत आहेत ,यासाठी वेळीच सावध होऊन प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून त्याबद्दल जनजागृती करणे खूप गरजेचे आहे. आपण काय करू शकतो...
आपल्या किचन मधील सर्व प्लास्टिकच्या वस्तू या पर्यायी म्हणजे स्टेनलेस स्टील व ग्लास यामध्ये बदलून घेऊया.
प्लास्टिक फूड कंटेनर्स डबा बंद वस्तू सर्व प्रकारचे कॉस्मेटिक्स ,परफ्युम्स, फेस वॉश, रूम फ्रेशनर्स या सर्वांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कण असतात त्याचा अनावश्यक उपयोग टाळणे खूप गरजेचे आहे जेणेकरून स्त्री व पुरुष प्रजनन क्षमता अबाधित राहील.
घरात पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्या ह्या देखील प्लास्टिक ऐवजी सिमेंटच्या बनवण्यात याव्यात.
जिथे जिथे शक्य होईल तिथे प्लास्टिकला पर्याय निवडूया म्हणजे पर्यावरण व पर्यायाने मानवी आरोग्य सुरक्षित ठेवता येईल .प्लास्टिकचा वापर टाळणे हा एक महत्वाचा उपाय आपल्या हातात आहे अन्यथा अधिकाधिक केमिकल्स च्या मानवी शरीरातील शिरकावामुळे एकंदरीतच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रीशियनच्या अध्यक्षा डॉ. राणी ठकार  व इंग्लंड चे प्रख्यात स्त्री रोगतज्ञ डॉ. अब्दुल सुलत...
17/10/2023

लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ ऑबस्टेट्रीशियनच्या अध्यक्षा डॉ. राणी ठकार व इंग्लंड चे प्रख्यात स्त्री रोगतज्ञ डॉ. अब्दुल सुलतान यांनी 'मातृत्व काळातील स्त्रियांचे आरोग्य' या विषयावर या क्षेत्रातील तज्ञांना मार्गदर्शन केले.

The PCOS Society India च्या वतीने सुरू झालेल्या E3 सेमिनार ची सुरूवात कोल्हापूर येथे करण्यात आली. डॉ. पद्मा रेखा जिरगे य...
17/10/2023

The PCOS Society India च्या वतीने सुरू झालेल्या E3 सेमिनार ची सुरूवात कोल्हापूर येथे करण्यात आली. डॉ. पद्मा रेखा जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व KOGS च्या संयुक्त विद्यमाने हा सेमिनार दि 16/7/23 रोजी सयाजी हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता.

11/07/2023
कोल्हापूरला कायम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. पद्...
10/07/2023

कोल्हापूरला कायम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची Maharashtra chapter of ISAR (Indian Society of Assisted Reproduction) या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे बहुमानाचे पद डॉ. पद्मा रेखा जिरगे यांना दि ९ जुलै रोजी नागपूर येथे पार पडलेल्या परिषदे मध्ये बहाल करण्यात आले आहे.
या परिषदेत डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी वंध्यत्व क्षेत्रातील सध्याच्या व भविष्यातील विविध पैलूंवर मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. पद्मा रेखा जिरगे विविध संशोधन तसेच प्रत्यक्ष रुग्ण उपचार याद्वारे कायमच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडत आहेत. वंध्यत्व उपचारांमध्ये त्यांचे संशोधन हे नक्कीच अनेक पेशंटस् साठी वंध्यत्व निवारण करण्यासाठी बहुमोल ठरत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर सारख्या तुलनेने छोट्या जिल्ह्यासाठी डॉ. पद्मा रेखा जिरगे यांची ही निवड खूप अभिमानास्पद आहे .

पुढील दोन वर्षे डॉ.पद्मा रेखा जिरगे हा पदभार सांभाळतील .वंध्यत्व रुग्णांना यशस्वी व सर्वोत्तम उपचार देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्वांसाठीच त्यांची ही निवड सार्थ ठरणार आहे .या दोन वर्षात त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कार्यपद्धती बद्दल त्यांनी माहिती दिली .त्यात पुढील गोष्टींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले .
1. आयव्हीएफ स्पेशालिस्ट ना आयव्हीएफ सेवा देण्यासाठी गरजेचे असणारे सर्व प्रकारचे अद्ययावत व प्रगत एज्युकेशनल मटेरियल उपलब्ध करून देण्यात येईल.
2.आयव्हीएफ क्षेत्रात काम करणारे व या क्षेत्राचा कणा असणारे Embryologist यांना ट्रबल शूटिंग साठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येईल
3.आयव्हीएफ नर्सेस हा देखील या क्षेत्राचा खूप महत्त्वाचा भाग असून त्यांची भूमिका त्यांनी अधिक सक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने एक Uniform online programme चे आयोजन केले जाईल.
4. तसेच सर्व स्टाफ साठी प्रोफर्टिलिटी कौन्सिलिंग साठी एक प्रोग्राम आयोजित केला जाईल.
या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्राला आयव्हीएफ क्षेत्रात प्रगती पूर्ण पथावर नेण्यासाठी
डॉ.पद्मा रेखा जिरगे यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

You can't go back and change the journey so far.However you can start where you are and change the result.This couple tr...
02/03/2023

You can't go back and change the journey so far.
However you can start where you are and change the result.

This couple truly made it happen.
This couple came to us in their late thirties and had 9 miscarriages including 1 pregnancy in the fallopian tube (tubal ectopic pregnancy).

Their journey started with us in December 2020.
Hypothyroidism, impaired glucose tolerance and ge***al tuberculosis was diagnosed in 2 to 3 hospital visits and the treatment for these conditions was started.
Low dose aspirin was started as her thrombophilia test came positive and the plan was to start heparin injections once she is pregnant.
Healthy weight and lifestyle modifications definitely contribute to positive pregnancy outcome and the patient followed everything we advised.

This wife underwent her first IVF cycle and she was pregnant.
She delivered a healthy 2.2 kg baby girl by LSCS at 36 weeks.

Infertility is a tough journey but if you work hard and don't give up , things will definitely fall into place.

Best wishes.
Team Shreyas and Sushrut.

डॉ.पद्मारेखा जिरगे यांना इंटरनॅशनल  सोसायटी फॉर फर्टिलिटी प्रिझर्वेशन या  आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान देण्यासाठी निम...
11/11/2022

डॉ.पद्मारेखा जिरगे यांना इंटरनॅशनल सोसायटी फॉर फर्टिलिटी प्रिझर्वेशन या आंतरराष्ट्रीय परिषदेत व्याख्यान देण्यासाठी निमंत्रण....

Address

2013-E Ward Rajarampuri 6th Lane
Kolhapur
416008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushrut Ivf posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Sushrut Ivf:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram