Sneh Clinic

Sneh Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sneh Clinic, Medical and health, Purohit Mourya Apt. , Opp. Waman Hari Pethe jewellers, Near Sasane Ground, Kolhapur.

फणसाच्या बिया ...आरोग्याची किमयालहानपणी पाऊस पडत असताना आई गरमा गरम aआठळ्या खायला देत असे,म्हणजेच फणसाच्या बिया. प्रोटीन...
02/06/2022

फणसाच्या बिया ...आरोग्याची किमया

लहानपणी पाऊस पडत असताना आई गरमा गरम a
आठळ्या खायला देत असे,म्हणजेच फणसाच्या बिया. प्रोटीनचा एक उत्तम स्रोत असलेल्या या बिया चवीला ही झकास लागतात. यामध्ये पोलिफेनोल्स भरपूर प्रमाणत असतात जे तुमच्या त्वचेला तरुण ठेवतात. बियाचा फेसपॅक त्वचेवरील सुरकुत्या कमी करतो . बियामधील झिंकमुळे हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. रक्तातील साखर नियंत्रित राहते. पोट सुरक्षित ठेवते. यात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणत असते. पौष्टिक खाण्याचा हा एक उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. बिया आमटीत घालून ही खाता येतात. आपल्या पारंपरिक खाण्याकडे लक्ष वळवा....

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805

भारतीय मसाला दिवस शुभेच्छा🌶️20 मे...आपण भारतीय जेवणात अनेक प्रकारचे मसाले वापरतो. प केवळ चव नाहीतर मसाल्याचे औषधी उपयोग ...
21/05/2022

भारतीय मसाला दिवस शुभेच्छा🌶️
20 मे...

आपण भारतीय जेवणात अनेक प्रकारचे मसाले वापरतो. प केवळ चव नाहीतर मसाल्याचे औषधी उपयोग आहेत जे आज पश्र्चात्यानी ही मानले आहेत.
ओवा...हृदय उत्तम ठेवतो , कॅल्शियम चा उत्तम स्रोत
काळी मिरी ...वजन कमी करते , चयापचय प्रक्रिया वाढवते.
जिरे...प्रतिकारशक्ती वाढते , दमा आणि निद्रानाश यामध्ये उपयोगी
लवंग... अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल
यात ओमेगा थ्री फॅटी अँसिड आहे जे हृदयाला सुरक्षित ठेवते.
मिरची...वजन कमी करते, रक्तदाब कमी करते, यात व्हिटॅमिन सी भरपूर आहे.
वेलदोडे....मधुमेहासाठी अत्यंत उपयोगी आणि रक्तात गुठळ्या होवू देत नाही .
बडीशेप...पचनास उत्तम आणि वय वाढीचे परिणाम टाळते.
मेथी...पचनास उत्तम ,केस वाढ करते
मोहरी...हृदय सुरक्षित ठेवते. वाईट कॉलेस्ट्रॉल घटवते, रक्तप्रवाह चांगला ठेवते.
जायफळ...लिव्हर उत्तम ठेवते .झोप चांगली आणते.

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क , सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर 7499891805

भोपळ्याच्या बिया ....आरोग्याची किमयापूर्वी आपल्या घरामध्ये लाल भोपळ्याच्या बिया खाण्याची पद्धत होती आता आपण ते विसरलोच. ...
13/05/2022

भोपळ्याच्या बिया ....आरोग्याची किमया

पूर्वी आपल्या घरामध्ये लाल भोपळ्याच्या बिया खाण्याची पद्धत होती आता आपण ते विसरलोच. लाल भोपळ्याच्या बिया हा एक पोषणमूल्यांचा खजिना आहे यामध्ये विपुल प्रमाणात झिंक आहे जे खूप स्ट्रॉंग अँटिऑक्सिडंट आहे. भोपळ्याच्या बिया प्रोस्टेट आणि मूत्राशय याचे आरोग्य चांगले ठेवतात. तसेच उत्तम क्वालिटीचे शुक्राणू तयार होतात. भोपळ्याच्या बिया मधील विपुल मॅग्नेशियम हृदय सुरक्षित ठेवते. रक्तदाब, साखर यावर नियंत्रण ठेवायला मदत करते. झोपेची गुणवत्ता वाढवते. भोपळ्याच्या बिया सलाड मध्ये ,स्नॅक्स म्हणून,खिरीत , चिवड्यात, लाडवात, भाजीत घालून खाता येतात. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया नक्की खा!

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लीनिक
ताराबाई पार्क ,सासणे ग्राऊंड जवळ
कोल्हापूर
7499891805

चिंच खा कॉलेस्ट्रॉल घटवाआपल्यापैकी प्रत्येकाने चिंचेचे गोळे लहानपणी मिटक्या मारत खाल्ले आहेत. आपला मोठा व्हिटॅमिन सी चा ...
04/05/2022

चिंच खा कॉलेस्ट्रॉल घटवा

आपल्यापैकी प्रत्येकाने चिंचेचे गोळे लहानपणी मिटक्या मारत खाल्ले आहेत. आपला मोठा व्हिटॅमिन सी चा तो डोस होता.
चिंचेमध्ये फ्लावोनाइड आणि पॉली फेनोल्स आहेत जे वजन कमी करायला मदत करतात. याचबरोबर हायड्रॉक्सी सायट्रिक ऍसिड मुळे साखरेचे चरबीत रूपांतर होत नाही. चिंच बद्धकोष्ठता असलेल्यांसाठी उत्तम आहे. चिंच रक्तातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले वाढवते. त्यामुळे हृदयाचा मित्र आहे.पोटाचे अल्सर होण्यापासून वाचवते. चिंच रोज स्वयंपाकात वापरणारे दाक्षिणात्य म्हणूनच रोज भात खावून ही फिट राहू शकतात.

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क ,सासणे ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805

उन्हाळ्याचा आनंद ....करवंदउन्हाळा आला की करवंद बाजारात दिसू लागतात. आपण एकदा तरी हा रानमेवा चाखतोच . करवंदामध्ये सी व्हि...
17/04/2022

उन्हाळ्याचा आनंद ....करवंद

उन्हाळा आला की करवंद बाजारात दिसू लागतात. आपण एकदा तरी हा रानमेवा चाखतोच . करवंदामध्ये सी व्हिटॅमिन विपुल प्रमाणात असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्वचा चांगली होण्यासाठी मदत मिळते. करवंद यामध्ये लोह देखील भरपूर आहे त्यामुळे अनिमिया पेशंटमध्ये करवंदे खाल्ली तर फायदा होतो. करवंदात फायबर आहे ,ते पोट साफ करण्यास मदत करते. आजारपणातून उठल्यानंतर तोंडाची चव गेली असल्यास, भूक कमी झाली असल्यास करवंदे खाल्ल्यामुळे भूक लागते. उन्हाळ्याचा त्रास कमी करण्याचे काम करवंदाचे सरबत करू शकते. रानात उगवणारे हे फळ असल्यामुळे याच्यावर कीटकनाशक मारलेली नसतात, कोणतेही खत वापरलेले नसते त्यामुळे खाण्यास अत्यंत सुरक्षित आहेत.
करवंदाची चटणी , सरबत, जाम खा...आणि उन्हाळा एन्जॉय करा...

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805

आंबा... आंबाउन्हाळा मला आवडतो कारण ...आंबे  खायला मिळतात. आंबा खाण्यापूर्वी अर्धा एक तास पाण्यात बुडवून ठेवा. त्यातील फा...
14/04/2022

आंबा... आंबा

उन्हाळा मला आवडतो कारण ...आंबे खायला मिळतात. आंबा खाण्यापूर्वी अर्धा एक तास पाण्यात बुडवून ठेवा. त्यातील फायटिक एसिड कमी होते. उष्णता कमी होते. आंब्यात भरपूर सी व्हिटॅमिन आहे . बीटा कॅरोटीन आहे. त्यामुळे डोळे छान राहतात. भरपूर फायबर आहे. बद्धकोष्ठता कमी होते.
ज्यांना डायबिटीस आहे असे ही आंबा खावू शकतात..दिवसातून एक ! वजन कमी करू इच्छिणारे ही आंबा खावू शकतात. .Happy Mango Days...🐥🥭🥭🥭🥭

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक,
ताराबाई पार्क ,
सासणे ग्राउंड जवळ
कोल्हापूर 7499891805

कैरी खा ...कॉलेस्ट्रॉल घटवाकैरी नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटते उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कैरीचे पन्हे खूप मदत करते. कै...
03/04/2022

कैरी खा ...कॉलेस्ट्रॉल घटवा

कैरी नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटते उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कैरीचे पन्हे खूप मदत करते. कैरी मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आहे त्यामुळे तुमची इम्युनिटी खूप वाढते .याच बरोबर तुमची त्वचा सैल पडू नये यासाठी कैरी कोलाजिन तयार व्हायला मदत करते. कैरीतील मॅनगिफेरीन, कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडचे प्रमाण संतुलित करते. त्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाला सुरक्षित करते.
पचनास मदत करते. उन्हाळ्यात रोज कैरी खा आणि सुरक्षित रहा...

गारेगार काकड्या काकडी ही भाजी नसून  फळ आहे. उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवण्याचे काम काकड्या करतात. पाण्याचं प्रमाण व्यवस...
31/03/2022

गारेगार काकड्या

काकडी ही भाजी नसून फळ आहे. उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवण्याचे काम काकड्या करतात. पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवतात. काकडी मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम विपुल प्रमाणत आहे .त्यामुळे हृदयासाठी उत्तम आहेत. तसेच डायबिटीस असणाऱ्यांनी काकडी रोज खावी. काकडीमुळे इन्सुलिनचे कार्य चांगले चालते. काकडी मध्ये खूप फायबर आहे. यातील पेक्टिन मुळे आतड्याची चांगली हालचाल होवून पोट साफ होते. त्वचेसाठी काकडी वरदान आहे.काकडी कोशिंबीर, दही काकडी, काकडीचे थालिपीठ, रस घेवू शकता. मात्र काकडी सालीसकट खा!

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ ❤️.

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
ताराबाई पार्क, सासने ग्राउंड जवळ
कोल्हापूर
7499891805

क....कलिंगडाचा .🍉🍉सध्या सगळीकडे कलिंगडे मिळत आहेत अशा प्रकारचा एक विनोद चांगलाच गाजतो आहे. रसदार, लाल कलिंगड खाण्याचा मो...
30/03/2022

क....कलिंगडाचा .🍉🍉

सध्या सगळीकडे कलिंगडे मिळत आहेत अशा प्रकारचा एक विनोद चांगलाच गाजतो आहे. रसदार, लाल कलिंगड खाण्याचा मोह कुणाला होत नाही? कलिंगड हे उन्हाळ्यात तुमच्या शरीराला पाणी देण्याचं काम करत. लघवी साफ होते. यात खूप प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. साहजिकच प्रतिकारशक्ती वाढते. तुमची त्वचा सुंदर होते. कलिंगड खाल्ल्याने रक्तदाब नियमित राहतो आणि हृदय निरोगी राहते. रक्तातील वाईट कॉलेस्ट्रॉल कमी होत. कलिंगडमध्ये एक सीट्रूलिन नावाचे महत्वाचे अमिनो एसिड आहे. यातील लायकोपेन कर्करोगाला प्रतिबंध करते.
कलिंगडाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे मेंदूच्या आणि मज्जा संस्थेच्या वाढीसाठी मदत करत. अल्झायमर मध्ये उपयोगी आहे. कलिंगड मुळे स्नायू चांगले राहतात. त्यामुळे खेळाडूंनी व्यायामानंतर कलिंगड जरूर खा. 🍉🍉🍉

काळजी घ्या स्वतःची

लव्ह युअर सेल्फ❤️

डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक
सासणे ग्राउंड जवळ
ताराबाई पार्क
कोल्हापूर.
७४९९८९१८०५

Address

Purohit Mourya Apt. , Opp. Waman Hari Pethe Jewellers, Near Sasane Ground
Kolhapur
416003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sneh Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram