28/06/2021
पावसाळा व बस्ती चिकित्सा………
उन्हाळ्यातील कडक ऊन, वाहणाऱ्या घामाच्या धारा या पासून मुक्ती मिळण्यासाठी आपण सगळे जण ज्याची आतुरतेने वाट बघत असतो तो पावसाळा......वर्षा ऋतू. या वर्षी नाही म्हटलं तरी पावसाळा तसा लांबलाच आहे. सुरवातीला कडक उन्हापासून मुक्ती देणारा पावसाळा आल्हाददायी वाटतो. पण काही दिवस गेल्यावर अचानक बदललेले हे वातावरण एक ना अनेक आजार घेऊन येते. याअशा विचित्र वातावरणात अनेक साथीचे आजार बळावतात पावसामुळे वातावरणात वाढलेल्या गारठ्याचि संचित वात दोषाला जोड मिळते आणि वात दोषाचा प्रकोप होतो. आता हया मुळच्या शीत आणि रुक्ष वात दोषाला शांत करणार कोण? हा प्रकुपित वात पुढे सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी इ. वातविकारांना बळ देतो. आधीच वाढलेला वात त्यात पचन संस्था मंदावल्याने होणार पित्ताचा प्रकोप….. प्रकुपित वात पित्तदोषाच्या साहचर्याने शितपित्त(आंगावर पित्ताच्या गांधी उठणे), अॅसिडिटि होणे, अजीर्णासारखे व्याधि उत्पन्न करतो. पावसाळ्यात जठराग्नि (पचन शक्ति) मुळातच दुर्बल असतो आणि निसर्गतः वात दोषाचा प्रकोप....... हया सगळ्यावर उपाय म्हणून अयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वर्षा ऋतुचर्येचे पालन करावे. पचण्यास हलके, ताजे आणि गरम अन्न खावे. तेल तुपाचा योग्य प्रमाणात आहारात वापर करावा. ह्या सगळ्या तक्रारींवर उपाय म्हणून आणि त्याखेरीज स्वास्थ व्यक्तिंनीदेखिल आरोग्य टिकवण्यासाठी व वातविकार टाळण्यासाठी पावसाळ्यात बस्ति कर्म (पंचकर्मातील एक ऊपक्रम) करूनच घ्यावे.शरीरातील वातप्रधान विकारावर बस्ती चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते. ज्याप्रमाणे आपण आपल्या वाहनांची काळजी वेळच्या वेळी ऑइलिंग, सव्र्हिसिंग करून घेतो, त्याप्रमाणे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठीसुद्धा वेळोवेळी त्याचं शद्धीकरण होणं गरजेचं असतं. त्यासाठी सामान्य व्यक्तींनी अवश्य पंचकर्म करून घ्यावेत. बस्ती म्हणजे काय? पंचकर्मातील बस्ती हा शब्दप्रयोग अनेकांच्या परिचयाचा असतो. जसं आपण तोंडावाटे औषध घेतो तसेच गुदद्वारामार्गे औषध देणे म्हणजे बस्ती होय. आजकालच्या व्यावहारिक भाषेतील शब्द म्हणजे एनिमा. एनिमामध्ये साबण अधिक पाणी पोट साफ करण्यासाठी देतात. बस्तीचा इतका संकुचित अर्थ नाही, परंतु समजण्यासाठी म्हणून एनिमा हा शब्द वापरला. मलद्वारावाटे औषध देणे इतके साधर्म्य एनिमा व पंचकर्मातील बस्ती यामध्ये आहे.
शरीरामध्ये असणा-या वात, कफ, पित्त यापैकी वात दोष हा प्रभावशाली व सर्व दोषांवर, शरीरावर नियंत्रण करणारा आहे. म्हणून बस्ती चिकित्सा ही अर्धी चिकित्सा वा परिपूर्ण उपचार पद्धती संबोधली जाते.
शारीर धातुंचे पोषण आणि वर्धन करते.तारूण्य टिकवण्यास मदत करते.पचन शक्ति सुधरण्यास फायदेशीर ठरते. वात विकार व काही पित्त विकारांचे देखिल शरिरातून उच्चाटन करुन टाकते.
बस्ति उपक्रमानंतर संधिवात,गुडघेदुखी, कंबरदुखी,आमवात ह्यात उत्तम उपशय मिळतो.
अपचन, मलबद्धता, पोटात वात धरणे ह्या तक्रारी दूर होतात.अनापत्यता, पाळीच्या तक्रारी, सौंदर्य वर्धन हयात उपयुक्त. हे आणि अश्या बर्याणच फायद्यांनी बस्ति आपल्या शरिरास उपकृत करते.वजन वाढवणे / कमी करणे , वात शमन , वेदना शमन , मलावष्टंभ आणि कितीतरी विकारात बस्ती ची योजना करता येते....
मग कसला विचार करताय? ह्या पावसाळ्यात वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार बस्ति घ्या आणि वात विकारांना अलविदा करा.......
- डॉ. सायली कारळकर (पाष्टे)
बी.ए.एम्.एस्., एम्.एस्. (आयुर्वेदा) स्त्रीरोग व प्रसुतितज्ञ
बीजमंत्रा चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
खासबाग, न्यू देवल क्लब समोर,कोल्हापूर
मो. ८७७९१८६५४७, ७५०६६७९४९९