
12/10/2024
आज (१२ ऑक्टोबर) विजयादशमी अर्थात दसरा...
हिंदू परंपरेनुसार, आश्विन शुक्ल दशमी या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा हा महत्त्वपूर्ण सण... आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होते. नऊ दिवस देवीची उपासना केल्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी होते. प्राचीन काळापासून साजरा केला जाणारा या सणाचा दिवस सर्वोत्तम साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभकार्याला प्रारंभ, सोने, जमीन, घर, वाहन याशिवाय विविध वस्तू खरेदी केल्या जातात.
श्री दुर्गादेवीने संपूर्ण विश्वाला त्रास देणाऱ्या महिषासुराचा, तर श्रीरामांनी रावणाचा वध याच दिवशी केला. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संध्याकाळी एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून देऊन शुभेच्छा देण्याची जुनी प्रथा आहे, जी आजही कायम आहे.
अज्ञानावर ज्ञानाचा, दुष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने मिळविलेल्या विजयाचा हा दिवस आपणही उत्साहात साजरा करू या...
अनारोग्य, अज्ञान, समस्या, संकट या सर्व समस्यांचा नायनाट होवो, सर्वांवर सुख-समृद्धीचा वर्षाव होवो, हीच सदिच्छा...
'सोनं घ्या, सोन्यासारखं रहा...'
#दसरा #विजयादशमी #प्रभूश्रीराम #श्रीदुर्गामाता #पावनदिवस #शुभेच्छा #सोनं घ्या_सोन्यासारखं रहा