17/05/2016
😰❤💊😰❤💊😰❤💊
〰〰〰〰〰〰〰〰〰
☑ *१७ मे उच्च रक्तदाब (नियंत्रण) दिन World Hypertension (Control) Day*
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔺 *_‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग'_*_च्या वतीने दरवर्षी *१७ मे* हा *‘जागतिक उच्चरक्तदाब दिन’* म्हणून साजरा केला जातो._
🔲🔲🔲
🔺 _दिवसेंदिवस लोकांमधील उच्च रक्तदाबाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या आजाराविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी ‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग’च्या वतीने दरवर्षी १७ मे हा दिवस ‘जागतिक उच्चरक्तदाब दिन’म्हणून साजरा केला जातो._
🔲🔲🔲
गेल्या काही वर्षापासून भारतात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या संख्येचे कारण लोकांचे बदललेले राहणीमान हे असून इतर हि कारणाबरोबरच आहारातील ‘जंक फूड’(निकृष्ट दर्जाचे खाणे)चे वाढलेले प्रमाण, दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव, सिगारेट आणि अल्कोहोल यांसारखी व्यसने अशा गोष्टी सुद्धा यासाठी अधिक जबाबदार आहेत, हे वेळोवेळी केलेल्या सर्व्हे आणि अभ्यासाअंती स्पष्ट झालंय योग्य व पोषक आहार घेतल्यास आणि काही पथ्ये पाळल्यास हा आजार टाळता येऊ शकतो.
🔲🔲🔲
🔺 *समतोल आहार असा असावा*
_३३ टक्के कच्चे अन्न, ३३ टक्के शिजवलेले अन्न अशा प्रमाणात आहार घ्यावा, तर आहारानंतर ३४ टक्के पोट रिकामे ठेवावे._
उच्च रक्तदाबामुळे मधुमेह होण्याची शक्यता पाच पटीने वाढते.
*आहारात मिठाच्या अतिरिक्त वापरामुळे उच्च रक्तदाब होण्याची संभाव्यता वाढते. दिवसाकाठी माणसाला केवळ तीन ग्रॅम मिठाची आवश्यकता असते.*
लक्षणे जाणवल्यास उच्च रक्तदाब हा वेळीच नियंत्रणात आणणे गरजेचे आहे...
🔲🔲🔲
🔺 *उपचार पद्धती:-*
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी जीवनशैलीत आणि आहारात बदल करावा.नियमित व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात राहाते. किमान ३० मिनिटे व्यायाम करणे आवश्यक.फळे, भाज्य, धान्य, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे सकस आहार रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो.जेवणात मिठाचे प्रमाण कमी असावे.रात्री चांगली झोप घ्या, रात्रीची झोप रक्तदाब नियंत्रणास ठेवण्यास मदत करते.धुम्रपान करू नये यामुळे रक्तदाब वाढतो....
🔺 *-: लक्षणे :-*
डोळ्यांखाली लालसर ठिपके दिसतात. चेहरा लालसर होतो.चालताना तोल गेल्यासारखे जाणवते.
🔺 *तणाव कमी करा*
दररोजचा तणाव हा उच्च रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत आहे. मुळात कुटुंबातील आर्थिक समस्या, मुलांचे शिक्षण, कामाचा त्रास यामुळे उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तणावाचे कारण माहीत पडल्यावर त्यावर विचार न करता समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. *उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी दररोज योगा करणे गरजेचे आहे.*
🔲🔲🔲
🔺 *रक्तदाबावर दह्याचा उतारा*
आहारात दररोज दही खाल्याने उच्चरक्तदाब नियंत्रणात येतो असं एका अभ्यासादरम्यान सिद्ध झालंय. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासात दीर्घकाळ आहारात दही खाणा-या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, असं म्हटलंय.
〰〰〰〰〰〰〰〰〰
😰❤💊😰❤💊😰❤💊