
06/07/2025
*देव झोपायला गेले का??????*
आज सहा जुलै *देवशयनी एकादशी* म्हणजेच देव झोपायला जातात ती एकादशी! असं ऐकल्यावर साहजिकच उत्सुकता निर्माण झाली .
देवशयनी एकादशी म्हणजे भगवान विष्णू चार महिन्यांसाठी *योगनिद्रेत* जातात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो.
या काळाला आयुर्वेदातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षाचा अर्धा भाग म्हणजेच आदान काळ प्रकृती सूर्याच्या तीव्र किरणांद्वारा शरीरातील शक्ती आपल्याकडून घेत असते. आणि आता सुरू होतो तो *विसर्ग काळ* यामध्ये ही गेलेली शक्ती आपण रीगेन करत असतो. ही शक्ती पुढे आपल्याला वर्षभर उपयोगी पडत असते.
देवनिद्रावस्थेत असणे हे शरीराने विश्रांती घेण्याचे प्रतीक असे समजावे.
आता बघा ना या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, म्हणूनच साथीचे आजार जास्त प्रमाणात पसरतात. म्हणूनच का असेल लग्नासारखे मोठे समारंभ वगैरे या काळात होत नाहीत. आणि धार्मिक दृष्ट्या बघितलं तर भगवान विष्णू जरी योगनिद्रेत असले तरी श्रावणापासून पुढे अनुक्रमे भगवान शंकर,कृष्ण, गणपती व नंतर देवी नवरात्र पर्यंत आपल्या प्रार्थनांना साद देतात. या काळाचे महत्व म्हणजे चातुर्मासातील उपवास, मांसाहार वर्ज, पाणी नवीन असल्याने त्या पिण्याची योग्य पद्धत आयुर्वेदात वर्णन केलेच आहे. शिवाय *शरीरशुद्धीसाठी देखील हा काळ अतिशय उत्तम* सांगितलेला आहे. दूषित दोष बाहेर काढून शरीरात नवीन धातूंची निर्मिती होते. अगदीच समजावे अशा भाषेत सांगाव म्हटलं तर शरीर रुपी गाडीचं वार्षिक सर्विसिंग करून घ्यावं व पंचकर्म केल्यानंतरही ऋतूनुसार किंवा अगदी सणांनुसार सांगितलेली पथ्य पाळली तर खूप मोठ्या आजारातही मुक्ती मिळू शकते. बस्ती चिकित्सेसाठी हा काळ श्रेष्ठ सांगितला आहे.
आयुर्वेद व आपली संस्कृती विभिन्न करताच येत नाही.खरंच संस्कृती मनापासून जोपासली किंवा आयुर्वेद व्यवस्थित आचरणात आणला तर आपण निरोगी राहणारच यात शंका नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
*श्री विश्वस्कंद मल्टी स्पेशालिटी आयुर्वेदिक हॉस्पिटल*
प्रतिभा नगर, कोल्हापूर.
7218491221
*डॉ सिमीन बावडेकर
(MS. स्त्री रोग तज्ञ आयुर्वेद )
*डॉ स्नेहलकुमार बावडेकर
(MD आयुर्वेद)