22/12/2024
योगमित्र उपक्रम क्रमांक १४
सकाळ' समूह तर्फे हॉकी स्टेडियम, कोल्हापूर येथील रस्त्यावर 'जॉय स्ट्रीट' हा उपक्रम रविवार, २२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात आम्ही सर्व योगमित्रचे शिक्षक सहभागी झालो होतो. यानिमित्ताने, योग प्रात्यक्षिके योगमित्रच्या योगशिक्षकांनी सादर केला. या उपक्रमास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूरच्या लोकांसाठी काही योग प्रकार, आसने, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व त्यांच्याकडून विविध आसने, सूर्य नमस्कार आमच्या शिक्षकांनी करवून सुद्धा घेतली. 'योगा से होगा' हा अनोखा गेम उपस्थितीतांनी खूप चांगल्या प्रकारे खेळला. योगाचा अवलंब सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहचावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांमधून योगा बद्दलची जनजागृती केली गेली.
सहभागी योगशिक्षक व सदस्य: संजय पोवार, विशाल गुडूळकर, सुचित्रा देसाई, सुरेश देसाई, अनन्या पोवार, डॉ. श्रुती बांदिवडेकर, पद्मश्री चव्हाण, सुषमा जाधव, सागर जाधव, अनुष्का पाटील, पल्लवी बकरे, जयश्री घोलप, डॉ. कावेरी चौगुले, शीतल काजवे, सुवर्णा पाटील, संजना मांडवकर
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम सुरू केल्याबद्दल 'सकाळ' समूहाचे आभार, अभिनंदन व पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा!