18/08/2020
सध्या करोना हा सर्वांच्याच काळजीचा विषय झालेला आहे. या आजारापासून स्वतःचे रक्षण करायचे तर आपली श्वसन संस्था कार्यक्षम असणे आवश्यक आहे.
त्यासाठी कपालभाती करून श्वसन मार्गाची स्वच्छता करावी नंतर दीर्घ श्वसन वरचेवर करीत राहणे योग्य ठरेल. मात्र हे करण्यापूर्वी, पूर्वी खाल्लेले अन्न पूर्णपणे पचलेले असणे आवश्यक आहे. नाहीतर अन्नपचन नीट होणार नाही. शिवाय यासाठी मनाची एकाग्रता सुद्धा आवश्यक आहे. आपण अंथरुणावर पडल्या पडल्या सुद्धा म्हणजेच विश्रांती घेत सुद्धा हे काम सहजपणे करू शकतो. यामध्ये दीर्घ श्वास घेण्याबरोबरच उच्छ्वास सुद्धा दीर्घ करणं महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर जेवढा वेळ सहज श्वास रोखून धरता येईल तेवढा धरावा. यालाच कुंभक असे म्हणतात. मात्र ही क्रिया करताना कोणत्याही प्रकारचा ताण आपल्या श्वासावर येणार नाही याची काळजी घ्यावी.
श्वास जेवढा दीर्घ घेतला जाईल तेवढीच बाहेरची शुद्ध हवा आपल्या फुप्फुसांना मिळते. थोडावेळ का होईना आपल्याला श्वास रोखून धरता आला तर मिळालेल्या प्राणवायूचा आपल्या फुप्फुसांना, रक्त शुद्धीकरणासाठी चांगला उपयोग करून घेता येतो. श्वास दीर्घ सोडण्याने फुप्फुसातील अशुद्ध हवा जास्तीत जास्त बाहेर टाकली जाते.
अशाप्रकारे दीर्घश्वसन केल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व पेशींना प्राणवायूचा पुरवठा चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे सर्व पेशींची कार्यक्षमता वाढते. अर्थातच शरीराची प्रतिकारशक्ती चांगली रहाते.
तुळस ही वनस्पती, श्वसन संस्थेची प्रतिकारशक्ती वाढविणारी एक उत्तम वनस्पती आहे.
या तुळशीचा आपल्याला अनेक प्रकारे उपयोग करून घेता येतो.१. तुळशीची दोन-तीन पाने स्वच्छ धुऊन मध किंवा साखरेबरोबर चावून खाता येतात. काढ्यात सुद्धा तुळशीची पानं आपण बरेच जण वापरतोच.३. तुळशीचा रस मधाबरोबर घेता येतो-चाटण ४.सर्दीसाठी पाण्यामध्ये तुळशीची पानं घालून त्याची वाफ सुद्धा खूप उपयोगी पडते . लहान बाळांची छाती भरलीअसेल तर, पाण्यात तुळशीची पाने घालून त्यावर धातूची चाळणी ठेवून, त्यावर सुती कपडा ठेवून, त्या कपड्याने वाफेचा शेक बाळाच्या छातीला, कपाळाला द्यावा. सर्दी लगेच कमी होते.५.सकाळी कपभर पाण्यात तुळशीची चार-पाच पाने भिजत घालून रात्री ते पाणी प्यावे. शांत झोप लागते आणि सर्दी खोकला सुद्धा कमी होतो.६. तुळशीच्या जाड काड्या झोपताना आपल्या डोक्याशेजारी ठेवाव्यात. किंवा काड्या भरपूर असतील तर आपल्या कॉटखाली सुद्धा टाकाव्यात. त्या वासाने सर्दी खोकला कमी होईलच, पण डास सुद्धा येणार नाहीत. ७.रोज पिण्याच्या पाण्याच्या तांब्याच्या तांब्या मध्ये तुळशीची तीन चार पानं टाकावी. पचनाला तसंच सर्दी खोकला उपयोगी
तुळस ओझोन वायू बाहेर टाकते असं म्हणतात.आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असा हा ओझोन वायू हल्ली दिवसेदिवस हवेमध्ये कमी होतो आहे असे म्हणतात. त्यामुळे तुळशीचे महत्त्व आता तर अधिकच वाढलं आहे.
मात्र एक सावधानतेचा इशारा--ज्या लोकांच्या घशाला कोरड पडते किंवा लघवीला जळजळ होते किंवा आम्लपित्ताचा त्रास असेल अशा लोकांनी तुळशीचा वापर जपूनच करावा.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया:|