
19/08/2025
"लोग कहते है मैं शराबी हूँ...!" असे म्हणन झुलणारा शराबी म्हणजेच मद्यपी' हा आपल्या समाजाला दारुचा बसलेला एक विळखाच आहे. दारूबंदीसाठी आज अनेक स्त्रीया निदर्शने, आंदोलने करत आहेत, दारुची दुकाने बंद पाडत आहेत, दारू सुटावी यासाठीही नाना- उपाय करित आहेत. मात्र हे सर्व उपाय करण्याने दारू पिणाऱ्याच्या संख्येत फारशी घट झालेली दिसून येत नाही. एक व्यसन म्हणून मदयप्राशनाकडे पाहिले जाते. मात्र, खरं तर दारू पिणे- मध्यप्राशन हा एक गंभीर स्वरुपाचा आजार म्हणून गणला जातो.तर या आजाराने ग्रासलेल्या आपल्या नवऱ्याला, वडिलांना, भावाला, मुलाला आणि मित्राला त्यातून पूर्ण बरं कसं करता येईल याचा विचार करणं आत्ता अतिशय महत्त्वाचं ठरतं. यासाठी या लेखाद्वारे मला या जुन्या परंतू आपल्यासाठी नव्या असणाऱ्या आजाराचे स्वरूप, माहिती व त्यातून बाहेर पडण्याचे उपाय आपल्याला ज्ञात करून दयायचे आहेत.
व्यसनं ही दोन प्रकारची असतान :- 1) Non-mood altering and 2) Mood altering.सर्व व्यसनांमध्ये आज बऱ्याच प्रमाणात आढळून येणारे आणि व्यसनाधिन व्यक्तीबरोबरच त्याच्या कुटुंबालाही उद्ध्वस्त करणारे व्यसन म्हणजे मद्यपाश (Alcoholism) या व्यसनाचा समावेश mood altering या दुसऱ्या प्रकारात होतो.आजपर्यंत या मद्यपाशाकडे बघण्याचा दृष्टीकोन म्हणजे एक व्यसन किंवा दुर्गुण असाच होता, आणि अजूनही आहे. पण फार मोठ्या संशोधनानंतर १९५६ साली "अमेरिकन वैदयकिय संघटना " या निष्कर्षापर्यंत पोहोचली की, हा एक आजार आहे.असा आजार जो मदयपीच्या शारिरीक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक या व अशा सर्वच विभागांवर परिणाम करतो अल्कोहोल हे रसायन मुळातच 'डिप्रेसेंट' आहे. त्यामुळे ते त्याला नैराश्याकडे घेऊन जाते, त्याला अडचणींना तोंड द्यावे लागते तो एकटा पडतो,एकाकी बनतो. त्याचे मानसिक तसेच आध्यात्मिक खच्चिकरण होते. हा एक वाढत जाणारा आजार आहे. त्याचप्रमाणे हा बरा न होणारा आजार आहे, ताब्यात न ठेवता येणारी पिण्याची इच्छा हे त्याचं लक्षण आहे.अगदी अनेक वर्षे मदयविरहीत राहुनही मद्यपी ने जर पुन्हा सुरुवात केली, तर तो त्यावर कधीच ताबा ठेऊ शकत नाही, हे अनेक तज्ञ मान्य करतात. १० लोक, ज्यांनी आनंद मिळवण्यासाठी दारु प्यायला सुरुवात केलेली असते, त्यापैकी फक्त 2 ते 3 लोक हे व्यसनी बनतात.अशा प्रकारच्या व्यसन या आजारातून बाहेर पडण्यासाठी आमची संस्था उपचार करते.
संपर्कव-सहयोग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, जि.कोल्हापूर 7219377317 #व्यसनमुक्ती_केंद्र