
21/06/2024
कोल्हापूर बालरोग तज्ञ संघटनेची वार्षिक वैद्यकीय परिषद कॅपकॉन २०२४ संपन्न- डॉ. प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे विशेष अतिथी - डॉ साईनाथ पोवार अध्यक्ष कोल्हापूर बालरोग तज्ञ संघटना
कोल्हापूर: कोल्हापूर बालरोग तज्ञ संघटनेची बालरोग तज्ञांकरिता कॅपकॉन २०२४ हि विभागीय वैद्यकीय परिषद १५ व १६ जुन रोजी कोल्हापूर येथे संपन्न झाली. या परिषदेमध्ये 250 बालरोग तज्ञांचा सहभाग असून बालरोग उपचारामध्ये विशेष कौशल्य असलेले देश विदेशातील नामांकित ३० विशेषतज्ञांनी मार्गदर्शन केले.
यावर्षी विभागीय परिषद हॉटेल सयाजी येथे आयोजित केलेली होती. परिषदेत कार्यरत बालरोगतज्ञांना व पदवीधर विद्यार्थी यांना विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे , गडचिरोली यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी डॉ सत्यवान मोरे, अधिष्ठाता, सीपीआर हास्पिटल, डॉ रामगोपाल चेजारा, अध्यक्ष, महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञ संघटना , डॉ अमोल पवार, सचिव महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञ संघटना, डॉ साईनाथ पोवार, अध्यक्ष, कोल्हापूर बालरोग तज्ज्ञ संघटना, डॉ राहुल पाटील, सचिव कोल्हापूर बालरोग तज्ज्ञ संघटना, डॉ प्रमा बाफना, डॉ साईप्रसाद कवठेकर डॉ महेश कोरे,डॉ नरेंद्र नानिवडेकर, डॉ.उदय पाटील ,डॉ. मोहन पाटील , डॉ रमेश निगडे, डॉ निवेदिता पाटील,डॉ दीपा फिरके डॉ संघवी,उपस्थित होते. सूत्र संचालन डॉ श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. कोल्हापुरातील बालरोग तज्ज्ञ संघटना दरवर्षी बालरोगतज्ज्ञांची परिषद आयोजित करते. हि बालरोगतज्ञांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यास मदत करते. या परिषदेत डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे हे विशेष अतिथी होते आणि डॉ प्रकाश आमटे यांनी त्यांच्या त्यांचा लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा या ठिकाणचा अलौकिक प्रवास व अनुभव व त्यांचे सामाजिक कार्याबद्दल अनुभव कथन केले. डॉ. साईनाथ पोवार अध्यक्ष, डॉ. राहुल पाटील सचिव आणि डॉ. प्रमा बाफना यांनी त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष सत्कार केला.या परिषदेत देश विदेशातील तज्ञांनी सादरीकरण केले.डॉ. कमलाकर चिटणीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. सुशील काबरा, दिल्ली यांनी लहान मुलांच्या फुफ्फुसाच्या विविध आजार व त्यातील प्रगत उपचार याबद्दल माहिती दिली. या ठिकाणी डॉ सागर वारणकर, मुंबई , डॉ तुषार मणियार मुंबई डॉ नरेश तायडे अमरावती , डॉ व्यंकटेश कायरमकोंडा इंग्लंड,डॉ विशाल सावंत गोवा,डॉ सारा धनावडे सांगली डॉ अनिकेत कुंभोजकर डॉ विभोर बोरकर मुंबई डॉ अभिलाषा सिंग बेळगाव डॉ जयशंकर कौशिक,गुवाहाटी, डॉ विनायक पत्की सांगली डॉ यतेश पुजार चिकोडी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या परिषदेत कोल्हापूर जिल्हा, सांगली, कराड, औरंगाबाद, नाशिक, मुंबई येथील बालरोगतज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेत ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ देवधर,डॉ विचारे,डॉ कित्तुर डॉ मिरगुंडे डॉ प्रकाश संघवी, व कोल्हापूर येथील सर्व बालरोग तज्ञ उपस्थित होते. या परिषदेमुळे आपल्या परिसरातील बालरोगतज्ञांना व परिणामी त्यांच्या रुग्णांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास डॉ साईनाथ पोवार अध्यक्ष, बालरोग तज्ञ संघटना यांनी व्यक्त केला.