06/04/2026
#सक्सेस_स्टोरी
मागील महिन्यात एक ४८ वर्षीय महिला रुग्ण अतिरक्तस्त्राव होतो म्हणून आमच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या डॉ योगेश लाडे सर व डॉ.मयुर तिरमखे सर यांच्या टीमने प्राथमिक तपासणी केल्यानंतर सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.सोनोग्राफी रिपोर्ट बघितल्यानंतर गर्भाशय काढणे फायदेशीर राहील असे सरांनी सांगितले.
रुग्णाच्या दोन सिझेरियन डिलिव्हरी, उच्च रक्तदाब, सहा महिन्यापूर्वी येवून गेलेला हृदयविकाराचा झटका या सर्व कारणांमुळे दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करणे अवघड होते परंतु आमच्या टीमने हे आव्हान स्वीकारून रुग्णाची शस्त्रक्रिया कमीत कमी रक्तस्त्राव व रक्तदाब नियंत्रित ठेवून यशस्वी केली.
दोन दिवस रुग्णालयात आवश्यक ते उपचार केल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला,यावेळी रुग्ण व नातेवाईक यांनी योग्य ते उपचार वेळेत मिळाल्यामुळे उपचार करणाऱ्या टीमचे आभार मानले. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ.योगेश लाडे, डॉ.मयुर तिरमखे, भूलतज्ञ डॉ.आभा बूब, डॉ.बी.एस.ढाकणे सर यांनी परिश्रम घेतले.