16/03/2022
उष्माघात: कारणे, खबरदारी व मार्गदर्शक तत्वे:-
>शहरात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या >उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची >काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने >नागरिकांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे व सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे-
उष्माघात होण्याची कारणे:-
>उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
>कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
>जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
>घट्ट कपड्याचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे:-
>थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
>भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
>रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उपचार:-
>रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
>रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
>रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
>रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे
काय करावे:-
>तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
>हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
>बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
>प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
>उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
>शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
>अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
>गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
>घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
>कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
>सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
>पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
>बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
>गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
>रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
>जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी
काय करु नये:-
>लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
>दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
>गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
>बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
>उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी >स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत