
09/02/2022
The power of a मिठी ...🤗♥️🤗
माझ्याकडे counselling ला येणाऱ्या एका मुलाची मी आज गोष्ट सांगणार आहे.23 वर्षांचा ,gym मध्ये जाणारा ,healthy, handsome engineer मुलगा.पण mentally disturbed. करण काय तर प्रत्येक गोष्टीत वडिलांशी उडणारे खटके.वडील overprotective आणि तुला नक्की जमेल ना,कशाला रिस्क घेतोस,हे नको करू अपयश येईल अस सारख ऐकवणारे.त्यामुळे ह्या मुलाचा confidence level खूप लो.
त्याला त्यामुळे वाडीलांबद्दल असलेला आकस. ह्या सागळ्यात भावनिक दृष्ट्या आणि त्यामुळे शारीरिक दृष्ट्या तो वाडीलांपासून खूप दूर गेलेला.काही sessions नंतर आमच्या लक्षात आलं की त्याचे वडील।खूप जास्त अपयश पचवून आज यशस्वी झाले आहेत.तर त्यांना कदाचित आपल्या मुलाला हरलेला पाहायचं नसेल म्हणून ते अशी चुकीच्या पद्धतीने काळजी घेत असतील.पण त्यात पण मुलाबद्दल प्रेम असणारच ना.♥️
मग मी त्याला एक टास्क दिला.बाबांना मिठी मारायची आणि म्हणायचं की एकदा मला माझ्या मनासारखं शांतपणे करू दे,नाही जमलं तर तुम्ही आहातच,पण एकदा माझ्यावर विश्वास ठेऊन बघा😅
त्याला हा टास्क अशक्य वाटला. आधी तयारच होईना ,खूप messages केले ..मला दुसरं काहीही सांगा पण हे नको वगैरे.पण मी नाही बधले😉😄..टास्क केलास तर पुढचं सेशन घेईन.Finally त्याने ते केला आणि तो इतका खुश होता मला भेटायला आला तेव्हा.तो म्हणाला की बाबा तर गोधळूनच गेले.मी मिठी मारलेली त्यांना इतक अनअपेक्षित होत की त्यांनी मला जवळ घ्यावा हेच त्यांच्या लक्ष्यात आलं नाही🙆पण आत्ता आमचे रेलशन्स खूप सुधारले आहेत.माहीत नाही कस काय ,पण त्या touch ने मला पण एकदम secured वाटलं आणि बाबांना पण माझ्याबद्दल एकदम विश्वास वाटला♥️
आणि ह्या सगळ्यात सगळ्यात जास्त कोण खुश झाल असेल???ofcourse त्याची आई 💃
This is the power of touch 🤗♥️
Mrs Manasi Mahajan
समुपदेशक, रेकी मास्टर,संज्ञानात्मक वर्तणूक थेरपिस्ट,