25/11/2023
च्यवनप्राश🌸
सध्या शिशीर ऋतुस प्रारंभ झाला आहे. गुलाबी थंडी पडली आहे. मनाला आल्हाद देणारे वातावरण निर्माण झाले आहे.
या ऋतूत रात्र मोठी व दिवस लहान असतो. थंडीच्या योगाने शरीराची सर्व छिद्रे आकुंचित होऊन बंद होतात त्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. इतर काळा पेक्षा जास्त भूक लागते. पचनशक्ती देखील चांगल्या प्रकारे कार्य करते. शरीराचे बल वाढलेले असते.
अशा कालावधीत च्यवनप्राश सारखे आयुर्वेदोक्त रसायन कल्प सेवन केल्यास शरीरास चांगला लाभ होतो.
देवांचे वैद्य भगवान अश्विनीकुमार यांनी हे औषध निर्माण केले व त्यामुळे च्यवन नावाच्या ऋषींना त्यांचे तारुण्य परत मिळाले अशी कथा प्रसिद्ध आहे.
त्यावरून या औषधाचे नाव 'च्यवनप्राश' हे पडले आहे.
😊कोणी सेवन करावे ?
1 वाढत्या वयातील मुले
2 वृद्ध व्यक्ती
3 खोकला,क्षय, दमा,फुप्फुसाचे आजार असणाऱ्या व्यक्ती
4 ज्याना आपली शारीरिक ताकद वाढवायची आहे असे
😊 होणारे फायदे
1 जठराग्नी प्रदीप्त होतो
2 धी, धृती, स्मृती वाढीस लागते
3 त्वचेचा रंग सुधारतो
4 आयुष्य वाढते
5 पंचज्ञानेंद्रिय यांची ताकद वाढते
6 शारीरिक व मानसिक ताकद वाढते
😊किती प्रमाणात घ्यावे?
प्रत्येकाला पचेल एवढे
सुचना : च्यवनप्राश हे आयुर्वेदीय औषध असून जवळील वैद्याच्या सल्ल्यानुसारच सेवन करावे ही नम्र विनंती.
@@@@@@
डॉ दत्तप्रसाद प्रभु
श्री विश्र्वदत्त आयुर्वेद योग
आणि पंचकर्म केंद्र
कुडाळ
8411849757
9405161861