05/07/2021
कोविड आणि कोविड नंतर होणारा मुळव्याधिचा त्रास :
२०२०-२०२१ ही दोन्ही वर्ष आपण कोविड पाहतोय याच्या पूर्वी कधीच असा आजार आपण पाहिलेला नव्हता.
जसजशी माहिती कळत गेली तसे आपल्याला त्यापासून बचावाचे मार्ग कळत गेले, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, दोन व्यक्ती मधे ३-६ फुट अंतर ठेवणे, ई. ही झाली बाह्य सुरक्षा प्रणाली यासोबत शरीराला आतून सक्षम बनवण्यासाठी प्रतिकाराशक्ति वाढवण्यासाठी पौष्टिक ताजा आणि प्रथिनयुक्त आहार सेवन करणे, जे नवनवीन कळतील ते प्रयोग करणे, मटण अण्डी चिकन अनेक उष्ण पदार्थ, मीरे लवंग आले सुंठ पिंपळी याचा प्रचंड वापर केला गेला.
याने लाभ झाला पण नंतर याचे शरीरावर काय विपरीत परिणाम होतील याचा कोणी विचार केला नाही.
याचाच परिणाम म्हणून ज्याना कोविड होऊन गेलेला आहे अशा लोकांना मुळव्याध, फिशर चा त्रास जाणवू लागला आहे.
सध्या येणाऱ्या मुळव्याधीच्या एकूण रुग्णांन पैकी 75% रुग्ण हे पोस्ट कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर पहिल्यांदा असा त्रास होणारे आहेत..
यामधे प्रामुख्याने संडासला होताना कडक होणे, गाठी होणे, त्यामुळे संडासच्या जागी अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना होणे.
संडासवेळी रक्तस्राव होणे,
तीव्र स्वरूपाची भगभग, कापल्याप्रमाणे वेदना होणे, बसायला देखील न येणे, व वारंवार रक्त जाऊन रक्तकमी होणे व त्यामुळे पुन्हा थकवा येणे
पुन्हा होणाऱ्या वेदने च्या भीतीने जेवण कमी करने अशी लक्षणे किंवा याच्याशी साम्य लक्षणे दिसत आहेत..
अशी लक्षणे दिसत असतील तर लगेच तपासून घ्या व यातून बरे व्हा.
*कोविड सहन झाला पण हा त्रास सहन होत नाही अशा रुग्णाच्या तक्रारी आहेत.
त्यामुळे तुम्हाला जर असा काही त्रास जाणवत असेल तर अवश्य आमच्या क्लिनिक ला भेट द्या व यातून आराम मिळवा.
आतापर्यंत आलेल्या सर्व रुग्णाना या त्रासा पासून पूर्ण आराम मिळालेला आहे.
यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती फक्त योग्य आहारच्या सल्ल्याची व योग्य उपचारांची.
त्यामुळे अवश्य भेट द्या व वेदनामय जीवन टाळा.
सुश्रुत आयुर्वेदिक क्लिनिक
मुळव्याध भगंदर चिकित्सा केंद्र
आंबेडकर चौक , कुंभोज.
संपर्क : ९८९०३३०५९५