
15/08/2025
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला
लासलगाव – लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे ७९ वा स्वातंत्र्यदिन अभूतपूर्व उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आज, शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता, लासलगाव डॉक्टर्स हॉल येथे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. स्वप्निल अनिल जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताच्या गजरात झाली. त्यानंतर देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन आणि "स्वातंत्र्य ही देणगी नसून जबाबदारी आहे" या संदेशावर आधारित प्रेरणादायी भाषण झाले.
असोसिएशनचे पदाधिकारी, सर्व सदस्य डॉक्टर,मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रप्रेम आणि ऐक्याचा सुंदर संदेश दिला.