16/09/2025
हरिश्चंद्र सुडे यांना २०२५ चा "मराठवाडा भूषण पुरस्कार"
मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार २०२५ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. हरीश्चंद्र सुडे यांना दि.१७ ला पुण्यात *बालगंधर्व येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राजस्थान चे राज्यपाल मा.श्री. हरिभाऊ बागडे, विधानसभा परीषद सभापती मा. श्री. राम शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजकुमार धुरगुडे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थिती असणार आहे.
श्री. हरिश्चंद्र सुडे हे गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन , पुण्यातील स्थिर नोकरी सोडून 1981 पासून मराठवाड्याच्या विकासात योगदान देत आहेत. त्यांनी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग सक्षमीकरणासोबतच, ग्रामीण विकास, आदर्श ग्राम, पाणलोट विकास, दुष्काळ निर्मूलन, महिला सक्षमीकरण व विविध ज्वलंत प्रश्नांवरती भरीव योगदान दिले आहे.
दिव्यांग पुनर्वसनाचा लातूर पॅटर्न स्वाधार केंद्राच्या माध्यमातून निर्माण केला आहे. त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी मराठवाडा समन्वय समिती पुणे , यांच्या वतीने २०२५ सालातील सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
बुधवारी(ता.१७) सायंकाळी ५.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. #मराठवाडा_भूषण #मराठवाडा #गौरवाचा_क्षण