03/05/2021
*सावधान! सावधान!! सावधान!!!*
नमस्कार,
आपण सर्वजण सध्या अतिशय भयावह अवस्थेतून जात आहोत. Corona च्या विळख्यामुळे शारीरिक ,मानसिक, आर्थिक , सामाजिक..सर्वच स्तरांवर प्रचंड उलथापालथ होत आहे.
आपल्यासाठी पूर्ण नवीन असणारं हे आजारपण. प्रतिबंध , उपचार , औषधं या सर्वांबाबत चाचपडत आपण टक्कर देत आहोत.
काही काळ उलटल्यानंतर च या विषाणूचे काही दूरगामी दुष्परिणाम शरीरावर झाले असतील तर ते आता समजून येत आहेत.
त्या मध्ये एक दंतवैद्य ( dentist) म्हणून माझ्या निदर्शनास आलेला दुष्परिणाम आहे - एक बुरशीजन्य आजार - mucormycosis !!!!!
ही बुरशी, corona विषाणू सारखी नवीन नाही आहे. हि , आधी देखील होती , ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती काही कारणाने कमी झाली आहे, यांच्यात तिचा प्रादुर्भाव आढळतो. उदा. - renal transplant, hepatic transplant , uncontrolled diabetes etc .
पण अशा रूग्णांची संख्या अगदी वर्षाकाठी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे.
Corona विषाणू आता हेच काम धडाडीने करतो आहे. या विषाणूंमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वरच घाला घातला जातो, जो कि , या बुरशीच्या पथ्यावर पडतो.
नेमकं काय होतं....
आपल्या चेहऱ्यावर, गालांच्या हाडांमध्ये, कपाळावर, नाकाच्या बाजूला, हवेच्या पोकळ्या असतात. त्यांना sinus म्हणतात. आपल्या भारतात सारख्या देशांमध्ये पराग कणांतून spore form मध्ये हि बुरशी, नाकावाटे यातील एखाद्या sinus मध्ये स्थिरावते. तिला अनुकूल वातावरण मिळालं कि , ती प्रचंड वेगाने वाढायला लागते. ( आता अनुकूल वातावरण काय , ते मी नंतर सांगते ) तिथल्या रक्तवाहिन्या मध्ये जाऊन, गुठळी बनवून त्या बंद करते. त्यामुळे, त्या रक्तवाहिनीने , ज्या भागाला रक्तपुरवठा केला जातो, तो भाग कुजायला म्हणजेच necros व्हायला सुरुवात होते. अगदी काही दिवसांतच हा प्रसार, डोळे , जबडा हा भाग व्यापतो. उपचारांती हा संसर्गित भाग काढून टाकावा लागतो. काही वेळा मेंदू पर्यंत संसर्ग झाला तर , coma , death हे पण आपण टाळू शकत नाही.
भयानक आहे ना हे सगळं......!!!!
आतापर्यंत मी तुम्हांला हि बुरशी नेमकं काय करते ते सांगितलं.. आता बघू , ती का पसरते..
मघाशी मी अनुकूल वातावरण म्हटलं - ते काय आहे बघू.
हि बुरशी वाढण्याची मुख्य कारणं....
1. रुग्णांची कमी झालेली रोगप्रतिकारक्षमता
2. वाढलेले रक्तातील साखरेचे प्रमाण
3. वाढलेलं रक्तातील serum ferritine . आता , serum ferritine काय काम करतं , तर बुरशीला वाढायला medium मिळवून देतं.
या तिन्ही गोष्टी का होतात , तर corona virus मुळं.
याची सुरुवात कधी होते ....
*विषाणू संसर्गाच्या पहिल्या दिवसापासून पुढचे कमीत कमी 3 महिने हा धोका राहतो. तेंव्हा काळजी घेणे , लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.* रुग्णालयांतील रुग्णांबरोबरच, asymptomatic corona patient मध्ये देखील हा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
लक्षणे -
1. डोकं दुखणे
2. दुर्गंधी येणे.
3. चेहऱ्यावर काही भागांत जडपणा, बधीरपणा जाणवणे.
4. काही रुग्णांना चेहऱ्यावर काही भागांत प्रचंड वेदना होतात.
5. डोळ्यांभोवती सुज येणे.
6. वरच्या जबड्यात दुखणे , दात शिवशिवणे.
7. अचानक दात हलायला लागणे.
8. नजर अधू होणे.
9. डोळ्यांच्या बुबुळांची हालचाल करू न शकणे.
10. उपचार न केल्यास तोंडांत जखमा होऊन वाहायला लागतात. ( Draining sinuses)
उपचार -
1. रक्ताच्या तपासण्या...
2. CT PNS या मुळे नक्की किती भागात बुरशी पसरली आहे ते कळते.
3. शस्त्रक्रिया... संसर्गित भाग काढून टाकावा लागतो.
4. Antifungal (बुरशी नाशक) ही औषधे शस्त्रक्रिये नंतर कमीत कमी काही आठवडे घेणे अत्यावश्यक आहे.
5. Asthetic correction. जबडा काढावा लागल्यास खाल्लेले नाकाच्या पोकळीत जाऊ नये म्हणून/ आणि जेवता यावे यासाठी दातांचे डॉक्टर obturator कवळी देऊ शकतात .
या सगळ्या उपचारांमध्ये प्रचंड शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हानी होते.
उपचारांच्या इतक्या अडचणींना सामोरं जाण्यापेक्षा , आपण प्रतिबंधात्मक काही करु शकतो का..?
हो, प्रयत्न नक्कीच करू शकतो.
हि बुरशी संधीसाधू (opportunistic) आहे.
प्रतिकुल परिस्थितीत तीची वाढ होत नाही
1. रक्तातील वाढलेली साखरेची पातळी येनकेन प्रकारे पूर्वपदावर आणायची.
2. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, योग्य आहार, तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार यांचा अंतर्भाव करायचा.
3. जलनेती , नस्य , diluted bitadin drops या सारख्या उपचारांनी आपण नाक आणि sinuse ची काळजी घ्यावी.
जसजसे दिवस पुढे जातील , या लेखातील उपचार , औषधे यांत बदल होऊ शकतात. नवीन संशोधन यासाठी सुरू आहे.तोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय करा. छोट्यात छोट्या लक्षणांबाबत सजग रहा. दुर्दैवाने काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोगमुक्त व्हा.
हा रोग फार वेगाने वाढणारा असून यावरती जितक्या लवकर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ला (Physician कान नाक घसा तज्ज्ञ डेंटिस्ट डोळ्याचे डॉक्टर )
घेऊन त्वरित उपचार सुरू करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे.
-डॉ हर्षदा गोरे ( MDS)
-डॉ पूजा पंगम (BDS)
-डॉ अरुण बालकुंडे (MDS)
-Team Gore ENT and Dental Hospital, Latur.