08/03/2024
होमिओपॅथी आणि स्त्रियांचे आजार
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
होमिओपॅथी मध्ये महिलांच्या आजारासाठी भरपूर औषधे आहेत, खरेतर पौंडवस्था असो कि रजोनिवृत्ती होमिओपॅथिक औषधे ज्या त्या अवस्थेत चांगल्याप्रकारे काम करतात.
आजकाल स्त्रियांचे जीवन धावपळीचे आणि ताणतणावाचे झालेले आहे. घरकाम, बाहेरील काम, मुलांचे संगोपन, सणवार हे सर्व करताना तिची नक्कीच दमछाक होते. काही दुखतही असेल तरी एखादी पेनकिलर घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी कधी साधारण दिसणारे लक्षण मोठ्या आजाराचे कारण होऊ शकते.
आपण काही कॉमन आजार बघूया जे स्त्रियां मध्ये सर्वञ आढळतात जसे संधिवात, मधुमेह ,उच्च रॅक्टदाब ,थायरॉइड ची समस्या ,पिसीओडी ( polycystic ovarian syndrome) गर्भाशयाचे आजार ( fibroids, adenomyosis , cervical cancer ,ovarian cyst ,chocolate cyst ,infertility ) ब्रेस्ट कैन्सर, पाळीच्या समस्या, Depression, anxiety panic attacks, migrain इ. आजारासाठी होमिओपॅथी उपयूक्त आहे.
होमिओपॅथिक औषधे देतांना आपण रुग्णाच्या आजाराची लक्षणे तसेच रुग्णामध्ये आजार झाल्यावर होणारे शारीरिक व मानसिक बदल या सर्वांचा सारासार विचार करून औषध निवडतो.
वरील आजारबरोबर स्त्रियांमध्ये नैराश्यता, विनाकारण चीड चीडपणा खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. आपली मानसिकता आणि गर्भाशय यांचा खूप जवळचा संबध आहे कसा तो एक केस मधून पाहुयात.
एक ३२ वर्षाची स्त्री रुग्ण तिच्या आई सोबत दवाख्यान्यामध्ये आली. तिने तिच्या आजाराची लक्षणे सांगायला सुरवात केली कि तिला हल्ली फारच चक्कर येत आहेत सोबतच जेवण न जाणे, विकनेस ,काहीच करावेसे न वाटणे , कशातच इंटरेस्ट नसने पुढे अजून डिटेल्स घेतल्यावर तिला १२ std पासून PCOD चा प्रॉब्लम आहे आणि आता काही दिवसापासून तिची पाळी पूर्ण बंद आहे. ती लिपिक या पदावर सरकारी विभागात काम करते. होमिओपॅथी मध्ये आपण रुग्णाची life space घेतो म्हणजे अशा घटना ज्या त्याच्या आयुष्यात घडून गेल्या ज्याने त्याच्या मनावर खूपच खोल परिणाम झाला. तिची हिस्टरी घेताना असे लक्षात आले कि तिचे काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला, तिच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाले होते. ती आणि तिचा नवरा वेगवेगळ्या गावात राहायचे ती सासू-सासर्यांसोबत राहत होती. या सहा वर्षात ते दोघे एकत्र राहिलेच नाही. सासूसासरे मुलबाळावरून सतत टोमणे मारायचे, नंतर तर तिला स्वतःला वाटू लागले कि मला कधीच बाळ होणार नाही. याच कारणाने तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला.
माझ्याकडे ज्यावेळेस ती आली तेव्हा ती खूपच आतून तुटली होती. तिला काहीच करावेसे वाटत नव्हतं तसेच तिला जगावेसं सुद्धा वाटत नव्हतं तिचे डोळे निर्विकार होते, पाणीसूद्धा नव्हते त्यात.
अशा केसमध्ये आपण रुग्णाला कॉन्सलिंग तर करतोच पण त्याही पेक्षा एक योग्य अभ्यासपूर्वक निवडलेले होमिओपॅथिक औषध रुग्णाला जीवनदान देऊन जाते. रुग्णाला ते औषध पूर्णपणे डिप्रेशन मधून बाहेर काढतेच पण जो काही हार्मोनिअल इम्बॅलन्स झाला तो सुध्दा भरून निघतो.
चला तर मग काही होमिओपॅथिक मेडिसिन बघुयात ज्या स्त्रीयांसाठी वरदान आहेत.
* इगनेशिया :-
अतिशय सवेंदनशील असलेली हि स्त्री घर आणि मुलांसाठी हसतखेळत सगळं करत असते. तिचे सर्व दुःख ती दाबून टाकते आणि चेहऱ्यावर एक हास्य ठेवते. तिचे दुःख ती कोणालाही सांगत नाही. हे औषध मायग्रेन, URTICAREA , झोप न येणे, कुठल्याही प्रकारची अलर्जी नाक किंवा त्वचेची, संधिवात, गर्भाशयाचे आजार (chocolate cyst, इन्फर्टिलिटी ) पाळीच्या तक्रारी, रजोनिवृत्तीच्या समस्या, थायरॉडच्या समस्या इत्यादि मध्ये हे औषध चांगले काम करते.
* सेपिया :-
हे औषध उंच सडपातळ स्त्रियांसाठी उपयुकत असून ज्या आपल्या प्रियजनांसाठी कर्तव्यशील असतात पण जेव्हा त्यानां वाटत कि मी एवढं करून कोणीच माझा विचार करत नाही, तेव्हा त्या दुखावतात तसेच त्यांचं त्यांच्या प्रियजयासाठीच प्रेम कमी होते व त्या आजारी पडतात. हे औषध एक्सट्रीम डिप्रेशन, ओव्हर वेट ,ऍलर्जीक रायनाटीस, अस्थमा, गर्भाशयाचे आजार ( Fibroid , PCOD ,Dysmenorrhoea, Menopause ) मूळव्याध, Sciatica , स्किनच्या समस्या ( Eczema, Dermatitis, Brown Spots) थायरॉड च्या समस्या इ. मध्ये उपयोगी आहेत.
पल्सेटिला :-
अतिशय नाजूक ,सौम्य ,कोमल, चंचल आणि अतिशय प्रेमळ असलेली ही स्त्री घरी सगळ्यांची आवडती असते. सगळे घरचे तिच्यावर प्रेम करत असतात पण तिला ते कमी वाटत असते. चेहऱ्यावर पिंपल, डाग, eczma , त्वचेच्या खाजेच्या समस्या, fungal infection , डोळ्यांचे आजार, बद्ध कोष्टता, मूळव्याध , पचनाच्या तक्रारी, पाळीच्या तक्रारी ,PCOD ,Dysmenorrhoea ,ब्रेस्ट कॅन्सर , थायरॉइड संबधी तक्रारी इ. वर उपयोगी आहेत.
*नायट्रम मूर :-
अतिशय मितभाषी असलेली हि स्त्री जास्त कोणाशी बोलणे टाळून स्वतः मध्ये गुरभटलेली असते. ती तिच्या करियर बद्दल महत्त्वकांशी असत, जे तिला हवं असते ते ती मिळवते. स्किनच्या समस्या जसे ( Eczema ,Psoriasis ,Dermatitis ,Tinea ) यासारख्या तक्रारीवर उपयोगी आहे. गर्भाशयाचे आजार ( Infertility PCOD ,)मूळव्याध, भगन्धर, अस्थमा bronchitis इ आजारावर हे औषध उपयोगी आहे.
अशी भरपूर औषधे आहेत जसे Rhustox, vanila, Kalicarb, Bryonia, Ruta, Stayphisagria, phosphorus हि यादी अगणित आहे. होमिओपॅथी मध्ये स्त्रियांसाठी मुबलक औषधे उपलब्ध आहेत.
तेव्हा होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करून आपल्या आयुष्यातून आजारांपासून मुक्तता मिळवा. खरेतर होमिओपॅथी मध्ये प्रत्येक आजाराशी निगडित विशिष्ट असे औषध नसते. व्यक्ती तशा प्रवृत्ती त्याप्रमाणे व्यक्तीमत्व तसे होमिओपॅथिक औषधे आहेत. प्रत्येक व्यक्तीची हि वयक्तिक व विशिष्ट त्याच्या केसप्रमाणे औषध व औषधाचे प्रमाण दिले जाते.

डॉ. जयश्री झिल्ले
होमिओपॅथिक कन्सलटंट
अडवान्सड होमिओपॅथिक क्लिनिक
श्याम नगर लातूर
email :- jaishree.zille@gmail.com