09/05/2020
लकवा
अचानक होतो लुळा,
एक हात अन पाय..
बोलण्यास अडथळा,
बोललेले समजत नाय.
कधी तोंड होते वाकडे,
कधी जातो चालताना तोल,
हा लकवा आहे ओळखा
करी जीवन मातीमोल !
कधी दिसे ना काही नयनां,
कधी दिसते दोन दोन,
अशी लक्षणे दिसतां
करा डाॅक्टरांना फोन.
यांत नसे वेदना,
म्हणूनच दाखवण्यास होतो ऊशीर.
वेळेत केला उपचार तर
पूर्ववत होई शरीर !
—डाॅ निलेश नागरगोजे
ही लक्षणे stroke / अर्धांगवायुची / लकवा याची आहेत
प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो व उपचारात विलंब झाला तर एका मिनिटांत लाखों मज्जातंतू नष्ट होतात
लकवा मुळे रूग्ण अंथरूणावर खितपत पडून राहु शकतो व लकवा म्हणजे कुटुंबावर वैद्यकीय आघात नसून आर्थिक संकटही ठरते
लवकर उपचार केल्यास रूगण पूर्ण बरा होऊ शकतो
बरेच रूग्ण हा अमूल्य वेळ वाया घालवतात व दूर कुठेतरी दोरी, गंडा घालण्यासाठी घेऊन जातात
हे खूप दुर्दैव ठरते
म्हणून लकवा म्हणजे नेमके काय लक्षणे - त्यासाठी जनजाग्रुती व्हावी म्हणुन हा शब्दप्रपंच....
अशा अनेक रूग्णांना आस्था न्युरोकेअर , लातूर येथे वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पूर्ववत जीवन झाले आहे.