04/10/2025
श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल लातूरमध्ये दांडिया नाईट उत्साहात संपन्न
लातूर: श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी ,राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्र महोत्सव निमित्ताने दांडिया नाईट आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ मधुरा हंडरगुळे संचालिका सुशीला हॉस्पिटल लातूर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली .सोबत संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे उपाध्यक्ष सौ जयदेवी बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे,संचालक नंदकिशोर बावगे,संचालिका माधुरी बावगे, सीमा बावगे उपस्थित होते. या दांडिया नाईट कार्यक्रमामधून बेस्ट ग्रुप डान्स( जी एन एम फर्स्ट इयर विद्यार्थी) ,बेस्ट कपल डान्स , बेस्ट गेटप मुली( सुप्रिया जाधव) व मुलांमधून प्रथम क्रमांक काढून रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रचे वितरण करण्यात आले.तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला,प्राचार्य डॉ.वीरेंद्र मेश्राम, प्राचार्य डॉ नितीन लोणीकर प्राचार्य संतोष मेदगे,प्राचार्य रूपाली गिरी,उपप्राचार्य योगिता बावगे, माधव सोनवरे, शुभम वैरागकर आदी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होते.