19/02/2023
My Article in Saptahik VIVEK....
होमिओपॅथी व लहान मुलांतील मानसिक आजार
evivek | February 15, 2014 | 0
***डॉ. सचिन जाधव****
मनोविकार हा तर होमिओपॅथी या शास्त्राचा गाभा आहे. या शास्त्रानुसार कुठलाही आजार आधी मानसिक स्तरावर सुरू होऊन मग शारीरिक स्तरावर प्रकट होतो. होमिओपॅथीमध्ये प्रथमत: व्यक्तीच्या मानसिक व भावनिक रचनेचा विचार केला जातो. यात प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे, हा मूळ गाभा पाहिला जातो व नंतर त्या व्यक्तीच्या लक्षणांचा व मानसिकतेचा विचार करून त्यास पूर्णपणे जुळून येणारी औषधी दिली जाते. त्यामुळे इतर औषधांसारखे दुष्परिणाम न होता उपचार होण्याची जास्त शक्यता असते. शारीरिक व मानसिक संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या समस्यांवर होमिओपॅथी हा गुणकारी उपाय ठरू शकतो.
होमिओपॅथी हे शास्त्र सर्व शास्त्रांत तसे नवीनच. आयुर्वेद, ऍलोपॅथी या इतर शास्त्रांनंतर, सर्वात शेवटी शोध लागलेले शास्त्र. (Most Updated & latest.) डॉ. सॅम्युअल हनेमन यांनी या शास्त्राचा शोध लावला. होमिओपॅथिक उपचारामध्ये व्यक्तीतील वेगळेपणा (शारीरिक, मानसिक व भावनिक) पाहून त्यांना जुळून येणारी औषधी दिली जाते. या औषधी पोटंटायजेशन या क्रियेद्वारे त्यातील औषधी गुणधर्म वाढवले जाऊन प्रत्यक्ष औषधाचा अर्क कमी होत जातो. त्यामुळे होमिओपॅथिक औषधांचा परिणाम खोलवर (जनुकीय व पेशीय स्तरावर) होऊन औषधांमुळे होणारा दुष्परिणाम व्यक्तीवर न होता फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये होतो आणि बिघाड निर्माण झालेली शारीरिक व मानसिक क्रिया पूर्ववत सुरळीत होते. मनोविकार हा तर होमिओपॅथी या शास्त्राचा गाभा आहे. या शास्त्रानुसार कुठलाही आजार आधी मानसिक स्तरावर सुरू होऊन मग शारीरिक स्तरावर प्रकट होतो. वेगवेगळया भावनांचे प्रकटीकरण ही प्राण्याची नैसर्गिक गरज आहे. राग, द्वेष, दु:ख, प्रेम, अपमान, आकर्षण, वाईट वाटणे या अगदी सहजभावना आहेत. परंतु मनुष्यप्राणी मात्र आपल्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा उपयोग करून या नैसर्गिक भावना व्यक्त न करता अप्रकट स्वरूपातच ठेवत आहे. परिणामी, व्यक्त होऊ पाहणाऱ्या भावना व त्यांना दाबून ठेवण्यासाठी प्रयत्नात असलेला व्यक्ती या संघर्षात वेगवेगळया शारीरिक व्याधींच्या स्वरूपात त्यांची परिणती होत असते.
abc-1कुठलाही रोग हा आनुवंशिकरीत्या जरी संक्रमित केला गेलेला असला, तरी मानसिक स्तरांवरील काहीतरी बदलानंतरच तो प्रकट स्वरूपात त्रास द्यायला सुरुवात करतो. समजून घेण्यास अवघड वाटत असले तरीही होमिओपॅथी हे शास्त्र जाणून घेण्यासाठी त्याचे मूलगामी विचार समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
सतत कुठल्यातरी विचारात असणे, सारखे दचकणे, अतिस्वच्छता (सारखे हात धुणे, इ.) विनाकारण बेचैनी, अस्वस्थता, स्थिरता नसणे, हातापायांची सारखी विनाकारण चाललेली हालचाल, अकारण भीती वाटणे, वाईट स्वप्न पडणे, सारखे नकारात्मक विचार डोक्यात येणे, विनाकारण घाई घाई करणे, स्वत:शी बडबड करणे, मनात कुढत बसणे, आत्महत्येचे विचार मनात येणे ही मनोविकाराची सुरुवातीची काही प्रमुख लक्षणे सांगता येतील.
लहान मुलांमध्ये काहीशा वेगळया स्वरूपात आपल्याला ही लक्षणे दिसतात. अस्वस्थता, प्रमाणाबाहेर वेगाने हालचाली करणे (Hyperactive), तोंड वेडेवाकडे करणे, तोतरेपणा व इतर श्वसनीय अडथळे, नखे चावणे, झोपेत दात खाणे, झोपेत चालणे, मनस्तापी वर्तन करणे, सारखी भीतिदायक स्वप्ने पडून घाबरून उठणे, यासारख्या गोष्टींकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. आजूबाजूच्या परिस्थितीबरोबर जुळवून घेण्यास अयशस्वी झालेली मुले या प्रकारची लक्षणे दाखवतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास कालांतराने काहीशा गंभीर स्वरूपातील लक्षणे आपल्यापुढे उभे राहू शकतात. त्यांचे मनोविकारामध्ये रूपांतर होऊ शकते.
आई-वडिलांचे परस्परांशी संबंध जर समाधानकारक नसतील, तर अशी मुले स्वतःला भावनिकदृष्टया असुरक्षित समजतात. विनाकारण रुसणे, साध्या साध्या गोष्टीला घाबरणे, भित्रेपणा, विनाकारण तासन्तास रडणे, या गोष्टींतून भावनिक असुरक्षितता व्यक्त होते.
आई-वडिलांच्या अतिनियंत्रणामुळे व अभ्यासाच्या अतिदबावामुळे, वयाला न झेपणाऱ्या शिक्षेमुळे ते उदास, घुमे, एकलकोंडे बनते व नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्यातही फारसे प्रगत नसते. मनोविकार सुरू होण्यासाठी अशा गोष्टी मनोविकाराचा पाया ठरू शकतात.
प्रशंसा, कौतुक मिळालेले मूल किंवा दोन भावंडांपैकी एकाच्या मनात जर नाकारलेपणाची भावना आली, तर ते सुरुवातील उदास बनते व परिस्थितीशी जुळवून न घेता आल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू शकते. मग शाळेत लहान चोऱ्या करणे, शिक्षकांशी व घरातील मोठया व्यक्तीबरोबर उध्दट वर्तन करणे, सारखी धुसफूस करणे अशा गोष्टी ते करू लागते.
अशा परिस्थितीत मुलाच्या सर्वांगीण विकासाठी आपण होमिओपॅथी या शास्त्राची मदत घेऊन आपले मूल आत्मविश्वासपूर्ण व धीट बनवू शकतो.
ताण म्हणजे काय?
ताण म्हणजे नेमके काय, याची शास्त्रीय मीमांसा अनेक प्रकारे करता येईल. पण ताण याचा सोपा अर्थ ‘आयुष्यात झालेल्या नकारात्मक बदलांना शरीराने अथवा मनाने दिलेला प्रतिसाद.’ ताण येण्याची कारणे कधी आंतरिक असतील, कधी बाह्य जगातील असतील, तर कधी दोन्ही. वयात येणाऱ्या मुलांमध्ये दोन्ही प्रकारचा ताण कमालीचा असतो.
एकीकडे शरीरात होणारे बदल व याच वयात स्पर्धात्मक युग, वेगवेगळी आकर्षणे, भिन्नलिंगी व्यक्तीचे नैसर्गिकरीत्या वाटणारे आकर्षण, पालकांची अवास्तव अपेक्षा, वैचारिकरीत्या बंड करण्याची प्रवृत्ती या अनेक गोष्टी या मुलामुलींवर एकाच वेळेस परिणाम करीत असतात आणि त्यामुळे ही मुलेमुली कमालीची तणावग्रस्त असतात.
लहानपणी बसलेला एखादा मानसिक धक्का – मग तो शिक्षकांकडून अथवा पालकांकडून असेल किंवा बाहेरच्या जगात घडला असेल – त्यात न पेलवणारी शिक्षा किंवा भीती किंवा दाबला गेलेला राग या गोष्टी इतक्या खोलवर परिणाम करतात की, कधीकधी लहान मुलांच्या दृष्टीवरसुध्दा त्याचा परिणाम दिसून येतो किंवा एखाद्या शारीरिक आजाराच्या रूपातसुध्दा दिसून येतो.
आजच्या टेक्नॉलॉजीच्या जगात मोबाईल, कॉम्प्युटर, व्हिडिओ गेम इत्यादी गोष्टींनासुध्दा एखादे मूल ऍडिक्ट होते. अशी मुले काल्पनिक जगात जास्त रमायला लगतात व त्यांचे सामाजिक जीवन हळूहळू कमी होत जाते. ती या उपकरणांच्या मोहात पडतात व त्यांना त्यातून बाहेर काढणे मग पालकांना अवघड जाते. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद, त्यांचे जीवनातील चांगले-वाईट अनुभव सांगणे, त्यांच्या काही गोष्टी लक्ष देऊन ऐकणे फार आवश्यक आहे.
होमिओपॅथीमध्ये प्रथमत: व्यक्तीच्या मानसिक व भावनिक रचनेचा विचार केला जातो. यात प्रत्येक व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे, हा मूळ गाभा पाहिला जातो व नंतर त्या व्यक्तीच्या लक्षणांचा व मानसिकतेचा विचार करून त्यास पूर्णपणे जुळून येणारी औषधी दिली जाते. त्यामुळे इतर औषधांसारखे दुष्परिणाम न होता उपचार होण्याची जास्त शक्यता असते.
Dr.Sachin Jadhav
M.D. (HOMEOPATHY)
9867735451
sachanu@yahoo.co.in