21/09/2024
नमस्कार मित्रांनो
संधिवात हा एक आजार नसून फक्त एक लक्षण आहे . जसे की ताप, आणि ताप कुठल्याही इन्फेक्शन मधे होऊ शकतो, ताप येण्याचे हजारो - लाखो कारण आहेत उदा. डेंग्यू, मलेरिया, कोरोना, कावीळ, TB , लिव्हर , किडनी चे इन्फेक्शन इत्यादी. आपल्यापैकी जवळपास सगळ्यांना माहीत असेल Dolo नावाची टॅबलेट दिली की ताप कमी होतो पण तो फक्त तात्पुरता काही तासांसाठी. मुळातून ताप जाण्यासाठी रोगाचं निदान करणं आवश्यक आहे. पण हे आजार काही दिवसानंतर योग्य ट्रीटमेंट घेतल्यावर मुळातून बरे होतात
त्याचप्रमाणे संधिवात हा आजार नसून एक लक्षण आहे, संधिवात होण्याचे हजारो कारण आहेत. संधिवाताचे आजार शेकडो वर्षांपासून आहेत पण लोकांना नेमकं माहितीच नाही की संधिवात झाल्यास नेमकं जायचं कुठं ? आणि तसं पाहिलं तर बहुतांश डॉक्टरांना पण ह्या आजाराबद्दल माहिती नाहीये, आणि जर समजलं तरी पेशंट पाठवणार कुठे? कारण मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये हे डॉक्टर्स नाहीच आहेत. जिल्ह्यामधेच काय तर पुणे , मुंबई सारख्या ठिकाणी पण Rheumatologist खूप खूप तुरळक आहेत. मग आपल्याकडे पर्याय उरतो काय ? Painkiller खायच्या आणि सहन करायचं.
यात तसं पाहिलं तर दोष पण कुणाला देता येत नाही, कारण ही ब्रांच अजून नवीन आहे, develop होत आहे. भारतामध्ये दर वर्षी जवळपास एक लाख MBBS admission hotat, MD /MS chya ७०,००० seats ahet. आणि DM Rheumatology (संधिवात रोग तज्ञ) च्या फक्तं २० seats आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये Rheumatology ची एक पण सीट नाही. मग पेशंट जाणार तरी कुठे?
संधिवात म्हणजे काय?
आपल्या रक्तामध्ये मुख्यतः तीन प्रकारच्या पेशी असतात, haemoglobin, पांढरी पेशी, प्लेटलेट. पांढऱ्या पेशी हे शरीरामध्ये सैनिक म्हणून काम करतात. म्हणजेच कुठला बॅक्टेरिया , व्हायरस , किटाणू शरीरात घुसला तर त्याला नष्ट करतात. संधीवतामध्ये ह्या पांढरी पेशा स्वतच्या शरीराला दुश्मन समजतात आनी स्वतःला अटॅक करतात. आणि सगळ्यात आधी सांध्या वर अटॅक करतात त्यामुळे सांधे दुखणे , सूज येणे अशी लक्षणे दिसतात.
संधिवात आजारांची लक्षणे:
हाता पायाची बोटे दुखणे , सांधे सूजणे, सकाळी सकाळी सांधे , कंबर आकडून धरणे,खूप थकवा येणे, त्वचेवर लाल , काळे चट्टे ,उन्हामध्ये त्वचा लाल होणे, चामडी टाईट होणे, दम लागणे , थंड पाण्यामधे बोटं निळी, पांढरी पडणे , कमी वयात दात किडणे अथवा सगळे दात एक साथ किडणे, परत परत डोळे लाल होणे, तोंड आणि डोळे कोरडे पडणे , कमी वयात कंबर (मुलामध्ये )दुखणे इत्यादी
अशी लक्षणे असल्यास तुम्ही Rheumatologist कडे त्वरित भेट दिली पाहिजे. दुर्लक्ष केल्यास हाताची बोटे , आणि इतर सांधे वाकडी होणे, किडनी , lungs 🫁, हृदय फेल होण्याची खूप दाट शक्यता असते .
जर तु्हाला किंवा तुमचे नातेवाईक , मित्र, शेजारी यापैकी कोणाला अशी लक्षणे असल्यास त्यांना Rheumatologist कडे जाण्याचा सल्ला द्या.
Dr Mahesh Gaikwad
MBBS
MD Medicine
DM Rheumatology
Udgir , Latur