03/01/2026
डॉक्टरसाहेब फिट्स किंवा झटके येणे म्हणजे नेमके काय असते?
फिट्स किंवा झटके म्हणजे मेंदूतील अनियंत्रित विद्युत सक्रियतेमुळे होणारा अचानक शारीरिक आणि मानसिक बदल. मेंदूतील न्यूरॉन्स अचानक आणि असामान्यरित्या विद्युत सिग्नल्स पाठवतात, त्यामुळे फिट्स येतात.
फिट्स येण्याची काही महत्त्वाची कारणे : उच्च ताप, मेंदूला झालेली दुखापत/संसर्ग, जन्मतः बाळ रडले नसेल तर, ट्यूमर, अनुवांशिक आजार
तसं पाहिलं तर फिट्सला बऱ्याच नावाने ओळखले जाते -
फिट्स, झटके, आकडी, दौरा, मिर्गी, जप्ती, अपस्मार, दातखिळी बसणे, डोळे पांढरे करणे, डोळे तिराळे करणे, फेफरे, हात-पाय वाकडे करणे, काही ठिकाणी अटॅक येणे सुद्धा म्हणतात
आणि सीझर (Seizure), Convulsions, एपिलेप्सी (Epilepsy) ही शास्त्रीय नावे आहेत
आपल्या कडे फिट्स ला काय म्हणतात?, कॉमेंट करून नक्की कळवा