Vivekanand Hospital and Research Centre,Latur

Vivekanand Hospital and Research Centre,Latur Vivekanand family has grown into an organization comprising of multiple individually operating estab

In year 1966 a group of young, fresh postgraduate doctors from B.J. Medical College, Pune, India walked out with a mission in mind , a mission to dedicate themselves for the cause of distant, deprived people of Latur village in Central India and the surrounding region which longed for basic medical service .The idea conceived and nurtured into Vivekanand Medical Research Society, Latur, based on trusteeship principle in its true spirit.

22/04/2021

माणसे अशी कार्यतत्पर असतात म्हणून विचारसरणी निरपेक्ष कामाला एकत्र भिडतात आणि संकटे परतवून लावतात!!

विवेकानंद हॉस्पिटलचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांतजी कर्वा ह्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात!!

*लातूरचे ऑक्सिजन संकट आणि दाखवलेली समयसूचकता !*

बुधवार : दि.21.04.2021 वेळ : स.11.15

माझा फोन खणखणला ! Covid positive होऊन विवेकानंद हॉस्पिटल मध्ये बेडवर पडलेलो . अशावेळी फोन घेणे जरा कठीणच !

मा. डॉ.कुकडे काकांचा फोन. घाईघाईत ते म्हणाले
" विवेकानंद रुग्णालयात आज दु 5 पर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे. आपल्या रुग्णालयात 70 रुग्ण असून, त्यात 45 जण व्हेंटिलेटरवर आणि ऑक्सिजन वर आहेत. मला जाणीव आहे , तुम्ही बेडवर आहात पण या प्रकरणात तुम्ही लक्ष घालावे . संपुर्ण लातूर जिल्हा हाय अलर्ट वर आहे . पालकमंत्री श्री अमितजी देशमुख यांच्याशी संपर्क करा . मला खात्री आहे तुम्ही यातून मार्ग काढाल ."

पायाखालची जमीन हादरली.
विवेकानंद रुग्णालयातुनच, तसेच सर्व शासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. माझ्या दवाखान्यातील खोलीला थोड्या वेळासाठी युद्धस्थळाचे War Room चे स्वरूप आले. हॉस्पिटलमधले वरिष्ठ डॉक्टर्स ppe kit मध्ये माझ्या खोलीतच योग्य ती माहिती देता यावी म्हणून थांबून राहिले।

ताबडतोब मा. श्री अमितजी यांना फोन केला. लातूरमधील गंभीर ऑक्सिजन संकटाबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रच्या पुणे FDI विभागाने अगोदरच सर्व टँकर इतरत्र वळवले होते. अवघ्या 15 मिनिटात श्री अमितजींचा मला फोन आला . त्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याचे सांगत आम्हाला आश्वस्त केले. मला विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला .

मी इतर दवाखान्यात फोन लावले . सर्वांची परिस्थिती गंभीरच होती.

थोड्या वेळाने श्री अमितजींचा पुन्हा फोन आला .
" एक ट्रक 12.15 वा. हैद्राबादहुन निघाला आहे .( जो दुपारी 5 वा. लातूरला पोहोचला ) दुसरा ट्रक रात्रीपर्यंत येईल .( जो नुकताच पोहोंचला आणि त्यातून विवेकानंद रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयाला पुरवठा झाला )"

चला , तूर्तास लढण्यासाठी बळ मिळाले होते. संपूर्ण रात्रभर विवेकानंद रुग्णालयाच्या स्टाफनी अपुऱ्या oxygen वर 45 रुग्णांचे प्राण वाचवले .मी, रुग्णालयाचा संपूर्ण स्टाफ रात्रभर जागेच होतो.

रात्रभर, मला गोळी घेऊन देखील झोप आली नाही.

लातूरच्या नाना गॅस प्लांटचे श्री फटाले सुद्धा रात्रभर जागे होते .

पहाटे 2.00 वा . श्री अमितजींना पुन्हा फोन लावला व पुढील पुरवठ्यासंबंधी विचारणा केली .

" मी सर्व व्यवस्था केली आहे , आज दुपारपर्यंत लातूरला सुरळीत पुरवठा होईल "

जीव भांडयात पडला !

मला खूप आनंद आहे की 400 ते 500 रुग्णाचे प्राण वाचवण्यात ईश्वराने मला छोटेसे साधन बनवले. मला होणारा आरोग्यविषयक त्रास यापुढे कांहीच नाही.

मा. श्री अमितजी देशमुख यांच्या भगीरथ प्रयत्नाने लातूरवरचे मोठे संकट टळले, हे मला अभिमानाने नमूद करावेसे वाटते . एकदा त्यांना परिस्थिती सांगितली की त्यांनी प्रयत्नात कोणतीही कसर ठेवली नाही.

*मान गये. True पालकमंत्री*

अमितजी , तुम्हाला धन्यवाद !

लक्ष्मीकांत कर्वा,
उपाध्यक्ष,
विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान ,
लातूर

One more weapon arrived in VHL and started working to fight against Corona .That is HFNO units - High Flow Nasal Oxygen....
03/08/2020

One more weapon arrived in VHL and started working to fight against Corona .
That is HFNO units - High Flow Nasal Oxygen.
(Two units)

विवेकानंद रुग्णालयात हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशन यंत्रणा
कोरोना रुग्णांसाठी ठरतेय संजीवनी

विवेकानंद रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वोत्तम उपचार केले जात आहेत. यासाठी हाय फ्लो नेझल ऑक्सिजनेशन यंत्र रुग्णालयात वापरण्यात येत असून ही यंत्रणा कोरोना बाधित रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे.
मराठवाड्यात अशी यंत्रणा वापरणारे विवेकानंद रुग्णालय हे या परिसरातील एकमेव रुग्णालय आहे.कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. विवेकानंद रुग्णालयात हे अद्ययावत तंत्रज्ञान व यंत्रणा वापरून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथे सध्या ३५ ते ४० रुग्ण उपचार घेत आहेत.तज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.कोरोनाबाधित रुग्णाला अधिक ऑक्सिजनची गरज असते.फुप्फुसांना दुखापत होऊ नये यासाठी अधिकचा ऑक्सिजन लागतो.ऑक्सीजन कमी पडला तर रुग्णाला व्हेंटिलेटर लावावे लागते परंतु व्हेंटिलेटरचेही अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे कमी वेळात अधिक ऑक्सीजन पुरवण्यासाठी नेझल हाय फ्लो ऑक्सिजनेशन यंत्रणा काम करते. या माध्यमातून एका मिनिटामध्ये ६० लिटर ऑक्सिजन देता येऊ शकतो.त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांसाठी हे यंत्र संजीवनी ठरणारे आहे. गेल्या काही दिवसांपासून विवेकानंद रुग्णालयाने या यंत्राद्वारे उपचार सुरू केले आहेत.
विवेकानंद रुग्णालयात सध्या अशी दोन मशीनस् उपलब्ध असून रुग्णांची वाढती संख्या पाहता लवकरच आणखी तीन मशीनस् उपलब्ध केले जाणार आहेत. ही यंत्रणा महागडी असली तरी रुग्णांवर उपचार करून बरे करण्याला प्राधान्य आहे. अधिकाधिक चांगले आणि परिपूर्ण उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध आहे. हाय फ्लो ऑक्सिजनेशन यंत्रणेचा अत्यवस्थ रुग्णांना सर्वाधिक लाभ होत आहे.
लातुरात मृत्युदर वाढलेला असल्याची चर्चा होत आहे परंतु यात तथ्य नाही.आपल्याकडे आजार वाढल्यानंतरच रुग्ण येत आहेत.त्यामुळेच त्यांच्यावर उपचार करणे कठीण जात आहे.
तरी रुग्णांनी सामान्य लक्षणे दिसताच उपचारासाठी पुढे यावे, असे आवाहन विवेकानंद रुग्णालय करीत आहे.

Address

Signal Camp , Vidya Nagar
Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivekanand Hospital and Research Centre,Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category