12/02/2025
#अवयवदान #ही #काळाची #गरज #आहे - #डॉ. #स्नेहल #हाके- #पाटील
लातूर (११/०२/२०२५) येथील ब्रिलियंट महाविद्यालय सायंकाळचे व पी.पी.कॉलेज ऑफ नर्सिंग,लातूर च्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात अवयवदान वर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथील #भूलतज्ञ #डॉ. #स्नेहल #हाके #पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी अवयवदान या विषयावर संवाद साधला. विद्यार्थी व शिक्षकांच्या मनातील अवयवदाना मागील अंधश्रद्धा दूर करत अवयवदानाचे महत्व स्पष्ट केले. तसेच मरणोत्तर आपल्या शरीरातील अवयव दान केल्याने आठ जणांना त्याचा फायदा होतो आणि ५० पेक्षा जास्त लोकांना इतर प्रकारे त्याचा उपयोग होतो. त्यासाठी आपण स्वतःला सदृढ कसे ठेवायचे, त्यासाठी योग्य आहार कसा घ्यावा हेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी #संस्थाध्यक्ष #प्राचार्य. #एकनाथ #पाटील हे होते तर नर्सिंग कॉलेज चे #प्राचार्य #अनिल #वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकांमध्ये अवयवदानाबद्दल समज गैरसमज असल्यामुळे जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अवयवदान करणाऱ्याची संख्या इतर देशाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी अवयवदानाची जनजागृती करून अवयवदान करण्याचे आवाहन समाजातील लोकांना केले पाहिजे असे संस्थाध्यक्ष प्राचार्य एकनाथ पाटील यांनी यावेळी मनोगत मांडले. प्रास्ताविकामधे प्रभारी प्राचार्य #प्रा. #युवराज #बी. #अंधोरीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व महाविद्यालयात राबवले जाणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. या अवयवदान जनजागृती कार्यक्रमामध्ये उपस्थित #डॉ. #स्नेहा #भुटे व #डॉ. #पेट्रिक यांच्याकडे स्वतः संस्थाध्यक्ष प्राचार्य.एकनाथ पाटील, प्र.प्राचार्य प्रा.युवराज बी.अंधोरीकर, प्रा.प्रियंका गोमचाळे, डॉ.अर्चना धनवे, प्रा.सोनाली कांबळे यांनी अवयवदान नोंदणी फॉर्म भरून इतरांनाही नोंदणी करण्याचे आव्हाहन केले. सूत्रसंचालन प्रा.सोनाली कांबळे तर आभार प्रा.प्रियंका गोमचाळे यांनी मानले. यावेळी नर्सिंग कॉलेज च्या उपप्राचार्या माधुरी
इळेकर, डॉ.जितेंद्र गायकवाड, प्रा.बळीराम मोठेराव, प्रा.ऋषिकेश साके, ट्यूटर वर्षा चाटे, ट्यूटर खाणपाटे शिवानंद, प्रा.स्वप्नाली क्षीरसागर, श्री.वृषल ढेपे, श्री.धनराज पडिले, श्री.परशुराम तिवारी, श्री.दयानंद भारती, श्री.परमेश्वर लवटे, अजय सांडूर, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.