
27/01/2025
२४ जानेवारी २०२५
*न्यू व्हिजन नर्सिंग स्कूलतर्फे "सतत नर्सिंग शिक्षण" (CNE/CPD) वर चर्चासत्र आयोजित*
लातूर: "आरोग्यसेवा क्षेत्रातील संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणातील आव्हाने व उदयोन्मुख समस्या" या विषयावर सतत नर्सिंग शिक्षण (CNE/CPD) कार्यक्रमाचे उद्घाटन २४ जानेवारी २०२५ न्यू व्हिजन नर्सिंग स्कूलतर्फे "सतत नर्सिंग शिक्षण" (CNE/CPD) वर चर्चासत्र आयोजित
लातूर: "आरोग्यसेवा क्षेत्रातील संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणातील आव्हाने व उदयोन्मुख समस्या" या विषयावर सतत नर्सिंग शिक्षण (CNE/CPD) कार्यक्रमाचे उद्घाटन २४ जानेवारी रोजी गॅलेक्सी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर, लातूरचे संचालक डॉ. विश्रांत भारती यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमात डॉ. विश्रांत भारती सरांनी उपस्थितांना आरोग्याची दैनंदिन काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम न्यू व्हिजन नर्सिंग स्कूलतर्फे आयोजित करण्यात आला होता. या चर्चासत्रामध्ये डॉ. अरुण कदम सर, न्यू व्हिजन नर्सिंग स्कूलचे उपाध्यक्ष यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. तसेच न्यू व्हिजन नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या श्रीमती कुमुदिनी कदम मॅडम यांनी "संसर्ग नियंत्रण" या विषयावर व्याख्यान दिले. त्या या कार्यक्रमाच्या आयोजक होत्या.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून श्रीमती अंजना गिरी या CNE (सतत नर्सिंग शिक्षण) साठी निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात अन्य मान्यवर वक्त्यांमध्ये डॉ. माधव शिंदे डॉ अभिनव कदम सर, माधव सरवडे सर आणि श्रीमती सुनीता मिसाळ मॅडम यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला अंदाजे ४०० नर्सिंग स्टाफ सदस्यांनी सहभाग घेतला आणि संसर्ग नियंत्रण व आरोग्यविषयक अनेक महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले.