Pawar Medical Agency

Pawar Medical Agency Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pawar Medical Agency, Lodhivali.
(1)

it's Wholesale & Retail Medical Shop
सेवा पर्मोधर्म it's Head line of My Business
in my shop Consumer Products,Medicine,Surgical,Generic Medicine,Ayurvedic Medicine Available in Whosale & Retail Now please Visit once.....

गढूळ पाण्याला काचे सारखे स्वच्छ करते. पाण्यातील शेवाळ नष्ट करते. ऊपलब्ध - पवार मेडिकल एजन्सी कर्जत 8308162878
14/06/2025

गढूळ पाण्याला काचे सारखे स्वच्छ करते. पाण्यातील शेवाळ नष्ट करते. ऊपलब्ध - पवार मेडिकल एजन्सी कर्जत 8308162878

*ब्लिचिंग पावडर:*- उपलब्ध आहे.- पवार मेडिकल एजन्सी, कुळधरण रोड, कर्जत - 8411955646- *गढूळ पाण्याला काचे सारखे स्वच्छ करत...
14/06/2025

*ब्लिचिंग पावडर:*
- उपलब्ध आहे.- पवार मेडिकल एजन्सी, कुळधरण रोड, कर्जत - 8411955646
- *गढूळ पाण्याला काचे सारखे स्वच्छ करते. गढूळपणा पुर्ण पणे घालवते...*
- *पाण्याचे निर्जंतुकीकरण*
- *उत्तम जंतू नाशक.*
- *माश्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी जमिनीवर व सार्वजनिक ठिकाणी पाउडर पसरवणे किंवा फवारणी करता येते .*
- *शेवाळ नष्ट करते...!!*
- *पावसाळ्यात पाण्यातून पसरणारे जलजन्य आजार (गॅस्ट्रो,कावीळ,जुलाब,उलट्या ई.) साथीचे रोग
पसरू नयेत. म्हणुन विहीर, जलस्रोत, इत्यादी ठिकाणी ब्लिचिंग पावडर चा वापर केला जातो..!!**
त्यासोबत साठून राहिलेल्या पाण्यात मच्छर निर्मिती होऊ नये म्हणुन सुधा ब्लिचिंग पावडर वापरतात...!!
-- याचा उपयोग मुख्यतः पाण्याच्या टाकीत व विहिरीत वाढलेले अनावश्यक शेवाळ नष्ट करण्यासाठी केला जातो. शेवाळ हे आरोग्यास हानिकारक असतात. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
त्याचबरोबर पावसाळ्यात जमिनीवर, पाण्यात, घराच्या पटांगणात वाढले असणारे शेवाळ जिथे घसरून पडायची भीती असते. ती शेवाळ नष्ट करण्यास सुधा ब्लिचिंग पाउडर महत्त्वाचे असते. पाणी शुद्ध व निर्जंतुक करा. टाकीत थेट योग्य प्रमाणात टाकू शकता. त्याकरिता त्याचे ठरवून दिलेले प्रमाण वापरावे लागते. याची माहितीही आपणास दिली जाईल.
---
पवार मेडिकल एजन्सी
कुळधरण रोड,कर्जत
Mo. 08308162878

Pawar Medical Agency PMA Patriotic Healthcare pvt. Ltd. Highlight ManCity

*मिनरल मिक्चर किंवा खनिज युक्त पावडर  का द्यावे आपल्या दुभत्या जनावराला* ...... *पवार मेडिकल एजन्सी* . चा माहीती पूर्ण ल...
24/04/2025

*मिनरल मिक्चर किंवा खनिज युक्त पावडर का द्यावे आपल्या दुभत्या जनावराला* ...... *पवार मेडिकल एजन्सी* . चा माहीती पूर्ण लेख...नक्की वाचा.....
जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य यासोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरिरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. जनावरांना त्या-त्या प्रदेशात किंवा गावात आढळणारा विविध प्रकारचा चारा, हिरवे गवत, कडबा हंगामानुसार ऊस, उसाचे वाडे तसेच इतर संकरित चारा पिकांचा समावेश होतो. संकरित पिके जेवढे जास्त उत्पादन देतात. तेवढे जास्त अन्नद्रवे जमिनीतून शोषून घेतात. तसेच शेतात सारखी तीच ती पिके घेतल्याने आणि माती परीक्षणानुसार जमिनीत अन्नघटकांच्या कमतरता वेळेवर पूर्ण न केल्याने पिकांची वाढ खुंटते, उत्पादन घटते, चाऱ्याची प्रत खालावते जमिनीत खनिज मिश्रणाचे अतिरिक्त प्रमाण नसल्याने ते चाऱ्यामध्ये येत नाहीत. असा निकृष्ट प्रतीचा चारा जनावरांनी खाल्ल्यास जनावरे कुपोषित होतात. चाऱ्यांमध्ये जीवनसत्वे नसल्याने जनावरे अशक्त होत असतात.


पशुपालकांनी बारकाईने लक्ष न दिल्याने असे असंतुलित खाद्य जनावरे खात असतात. यामुळे दूध उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. अशावेळी पशुपालक जनावरांना प्रमाणापेक्षा जास्त खाद्य पुरवितात त्यावेळी दुधाच्या प्रमाणात खर्चात खूप वाढ होते. जे पशुपालक नेहमी हिरवा चारा दुसरीकडून खरेदी करतात तेव्हा त्यांना सकस चाऱ्याची हमी नसते. त्यांनी जर त्या शेतकऱ्याकडे माती परीक्षणानुसार उत्पादित केलेला चारा आम्ही जास्त किमतीला घेऊ, अशी मागणी केली तर चाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात खनिजांची कमतरता भासणार नाही. त्यामुळे खनिज मिश्रणावरचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते.
खनिज मिश्रणे कोणती असतात ?
दुभत्या जनावरांच्या शरिरामध्ये खनिज मिश्रणाचे प्रमाण खूप असते. वेगवेगळ्या शरिरक्रियेसाठी बऱ्याच खनिज मिश्रणाचा पुरवठा आहारात असणे आवश्यक असते. उदा. (मुख्य खनिजे) कॅल्शियम, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, सल्फर, सोडियम, पोटँशिअम, क्लोरीन (सुक्ष्म खनिजे) लोह, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन, मॅगनीज, झिंक आणि सेलेनियम यासारखी खनिजे अत्यल्प प्रमाणात द्यावी लागतात.
कोणत्या क्रियांसाठी खनिज मिश्रणाची अत्यंत आवश्यकता असते ?
गर्भावस्थेत गर्भाची पूर्ण वाढ होण्यासाठी
शरीर पोषणासाठी तसेच वासराच्या जलद वाढीसाठी.
प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादन वाढीसाठी.
जनावरांच्या सर्व शारीरिक जडणघडणीसाठी.
जास्त दुधारु पशूंमध्ये दुधाद्वारे कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जाते, ती कमतरता भरून काढण्यासाठी.
दुधाळ जनावरातील खनिजांच्या कमतरतेची प्रमुख कारणे?
सतत जमिनीमध्ये घेण्यात येणारे एकच पीक उत्पादनामुळे जमिनीतील खनिज मिश्रणे हळूहळू नाहीशी होतात.
चारा पिकांच्या तसेच माती परीक्षण अहवालाच्या आवश्यकतेनुसार जमिनीत अन्नद्रव्याचा पुरेशा प्रमाणात वापर न करणे.
सुधारित पिकांच्या जातींमध्ये अधिक पीक उत्पादन मिळते. त्यावेळी भरपूर अन्नांश जमिनीतून शोषला जातो त्यावेळी दुसरे पीक चांगले येत नाही.
सतत जनावरांना हत्ती गवत, ऊस, ऊसाचे वाडे, कडवळ खाऊ घातल्याने खनिज मिश्रणे उपलब्ध होत नाहीत तर ती शेणाद्वारे बाहेर पडतात.

बार्लीचा चारा म्हणून जास्त वापर केल्यास जनावरांना खनिज मिश्रणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते.
इथेनॉल, बियर, अल्कोहोल, स्टार्च, इत्यादी निर्मितीमध्ये सातु, मका, ज्वारी यासारख्या अन्नधान्याचा वापर होतो. निर्मिती दरम्यान मिळणाऱ्या चोथ्याचा वापर जनावरांचा चारा म्हणून केल्यास खनिजांची कमतरता भासते.
जनावरांना पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी, चारा खाद्यामध्ये एखाद्या खनिजाचे प्रमाण कमी-अधिक असल्यास व त्या खनिजांमुळे इतर काही खनिजांचे जनावरांच्या शरीरात योग्य प्रमाणात शोषण होत नाही त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या खनिजांचा समतोल बिघडत जातो.
जनावरांच्या आजारपणात त्यांची भूक मंदावते या काळात पहिल्या आहारापेक्षा कमी अधिक अन्नग्रहण केले जाते त्यावेळी गरज असूनही खनिज मिश्रणे शरीरात पोहचत नाहीत.
बऱ्याचवेळा पशुपालक दूध उत्पादन चांगले मिळायला लागले कि जनावरांच्या ग्रहण क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात हिरवा चारा खाद्य देतात. त्यावेळी जनावरांमध्ये खनिज मिश्रणाची कमतरता जाणवते.
एक गोचीड दर दिवसाला साधारण अर्धा मि.ली रक्त शोषतात तसेच जंत, कृमी, परजीवी किटकांचा योग्यवेळी बंदोबस्त केला नाहीतर पचन व शोषण झालेल्या खनिज मिश्रणाचा नाश होऊन कमतरता भासते.

खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे आढळणारी लक्षणे-
वासरांची जलद गतीने वाढ होत नाही.
शरीरावरील केस उभे राहतात, तेज दिसत नाही, त्वचा खडबडीत होते, तसेच त्वचेचे आजार वाढतात.
जनावरे पान्हा चोरते, दूध देत नाही, तसेच लवकर आटते
जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच डोळ्यातून पाणी गळते.
गाई-म्हशी लहान वासरे यामध्ये अंधत्व येते.
भाकड कालावधी वाढतो. वर्षाला एक वेत मिळत नाही तसेच जनावरांच्या शरीरावर मांस दिसत नाही.
गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते तसेच तात्पुरते किंवा कायमचे वांझपण येते
जनावर माज वेळेवर दाखवत नाही, माजाचा काळ कमी जास्त होतो तसेच माजाचा स्त्राव घट्ट किंवा पातळ शेंबडासारखा पडतो.
गाई-म्हशींच्या सडांची तोंड लवकर बंद न झाल्याने काससुजी तसेच गाभण अवस्थेत किंवा व्यायल्यानंतर सडातून दूध सतत टिपकत असते.

दुधातील फॅट कमी होऊन दुधाची प्रत कमी होते.
सडावर चिरा पडतात जखमा लवकर बऱ्या होत नाहीत तसेच धार काढताना जनावर लाथ मारते, हलते.
जनावर व्यायल्यानंतर कॅल्शिअम कमी होते त्याची वेळीच पूर्तता झाली नाही तर मिल्क फिव्हर होतो. तसेच वेळेत उपचार न केल्यास जनावर दगावते.
मायांग बाहेर पडते तसेच उपचार न झाल्यास जनावर दगावते.
गाई-म्हशी विताना वासरू अडकण्याचा संभव असतो तसेच व्यायल्यानंतर वार लवकर पडत नाही अडकून राहतो.
नवजात वासराचे वजन कमी भरते तसेच अपूर्ण दिवसाचे वासरू जन्माला येते.
जनावरांच्या पायाची हाडे,खुरे,शिंगे, अपघात प्रसंगी किंवा जोरात धडक दिल्यास मोडतात.
जनावराला खनिज मिश्रणे आहारातून न मिळाल्यास ते मिळवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जनावर चप्पल, पिशव्या, रबर, माती, अशा अखाद्य वस्तू खाते त्यामुळे पचनसंस्थेत बिघाड होऊन जनावर फुगते.
प्रतिबंधात्मक उपाय -
दूध उत्पादन व प्रजनन यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाची खनिज मिश्रणे योग्य प्रमाणात आहारात असणे गरजेचे आहे.
खनिज मिश्रणाचा नियमित वापर करावा.
नवीन जातीच्या सकस वैरणी तयार कराव्यात.
आपल्या भागातील जमिनीतील खनिजांची कमतरता ओळखून परिपूर्ण घटक असणारे खनिज मिश्रणे खरेदी करावीत.
वापरण्याचे प्रमाण-(प्रतिदिन)
लहान वासरांसाठी- २०-२५ ग्रॅम
मोठ्या कालवडीसाठी -५० ग्रॅम
दुभत्या जनावरांसाठी ५०-१०० ग्रॅम

येथे उपलब्ध....
पवार मेडिकल एजन्सी, कुळधरण रोड, कर्जत ता. कर्जत ....
मो. न. 8308162878, 8411955646

24/03/2025
 #फिश_ऑईल म्हणजे  #ओमेगा_3_फॅटी_असिडत्याचे मानवी शरीरासाठी उपयोग...- उपलब्ध पवार मेडिकल एजन्सी - 8308162878 कार्बोहायड्र...
27/12/2024

#फिश_ऑईल म्हणजे #ओमेगा_3_फॅटी_असिड
त्याचे मानवी शरीरासाठी उपयोग...
- उपलब्ध पवार मेडिकल एजन्सी - 8308162878
कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी (फॅट्स), जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या आहारातील मूलभूत घटक आहेत. चरबी फॅटी एसिडपासून बनलेली असते.

फॅटी एसिडचे दोन प्रकार आहेत: सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड हे हेल्दी फॅट्स आहेत.

अनसॅच्युरेटेड फॅट्स हे मोनोअनसॅच्युरेटेड (ओमेगा 9 फॅटी एसिड) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड (ओमेगा 3 आणि 6) असतात. मानवी शरीर ओमेगा 3 फॅटी एसिड बनवू शकत नाही. ओमेगा -6 फॅटी एसिड आपल्याला आहारातून मिळवता येतात. याउलट ओमेगा 9 फॅटी ॲसिड शरीरात तयार करता येतात.

ओमेगा -3 चे सर्वोत्तम स्त्रोत मासे आहेत, तर ओमेगा -6 आणि ओमेगा -9 हे वनस्पतीजन्य तेले, काजू आणि बियामध्ये असतात. आपण आपल्या आहारामधून सहजपणे ओमेगा -3, -6 आणि -9 फॅटी ऍसिड मिळवू शकतो परंतु त्याचे योग्य प्रमाण असणे महत्त्वाचे असते. ओमेगा 3:6:9 चे प्रमाण 2:1:1असायला हवे. ज्या लोकांना आहारातून ओमेगा -3 पुरेसा मिळत नाही, त्यांनी ओमेगा-3-6-9 कॉम्बिनेशन ऐवजी नुसते ओमेगा-3 घेतल्यास फायदा होतो.

फिश ऑईल हे माशांपासून बनवलं जातं. या तेलामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड असतं. ओमेगा-3 ने भरपूर असल्यामुळे फिश ऑइलला ओमेगा-3 ऑइल असंही म्हटलं जातं.

ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे बरेच प्रकार असतात. त्यापैकी तीन महत्त्वाचे फॅटी ऍसिडस:

इकोसॅपेंटेनॉइक एसिड (EPA),
डोकोसाहेक्सॅनॉइक एसिड (DHA)
ईपीए आणि डीएचए सामान्यत: सामन (रावस), मर्केल (बांगडा), हेरिंग, सारडिन सारख्या कोल्ड-वॉटर फॅटी फिशमध्ये आढळतात.
अल्फा-लिनोलेनिक एसिड (ALA) – ओमेगा-3 चा एक वनस्पतीजन्य प्रकार आहे. हे फ्लेक्ससीड (जवस), चिया सीड्स, अक्रोड,आणि कॅनोला व सोयाबीन तेलात आढळते.
शरीरासाठी #फिश_ऑइलचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊया फिश ऑइलचे आरोग्यदायी फायदे:

1. मानसिक विकारांविरूद्ध लढण्यासाठी: बायपोलार डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया, तणाव आणि नैराश्य/ डिप्रेशन इ. कमी करू शकतं. जे लोक नियमितपणे ओमेगा-3 चे सेवन करतात त्यांना नैराश्याची रिस्क कमी असते.

2. डोळ्याचे आरोग्य सुधारू शकते: फिश ऑइल हे नेत्र विकारापासूनही बचाव करते. याच्या सेवनाने वाढत्या वयातील डोळ्यांच्या समस्यांना कमी करण्यात मदत होते.

3. गर्भधारणेत बाळाच्या डोळे आणि मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहित करते: डीएचए (DHA) बाळाच्या डोळे आणि मेंदूच्या विकासाला मदत करतं. तसेच नवजात मुलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. गर्भावस्थेतील काळात मातेच्या शरीरात ओमेगा 3 चे व्यवस्थित प्रमाण असेल तर बाळाला खालील फायदे होतात:

उच्च बुद्धिमत्ता
चांगले कम्युनिकेशन आणि सोशल स्किल्स
विकासात्मक विलंब कमी होण्याचा धोका
एडीएचडी, ऑटिझम आणि सेरेब्रल पाल्सीचा धोका कमी
4. हृदयाच्या आरोग्यासाठी: फिश ऑइल हृदयासंबंधींचे आजार रोखण्यात मदत करतं. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक ही जगातील मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. ओमेगा -3 चे फायदे असेः

ट्रायग्लिसेराइड्स: ओमेगा -3 मुळे ट्रायग्लिसेराइड्स ची लेव्हल कमी होऊ शकते
रक्तदाब: ओमेगा -3 उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये रक्तदाब पातळी कमी करू शकतो
“गुड” एचडीएल कोलेस्ट्रॉल: ओमेगा -3 एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकते
रक्ताच्या गुठळ्या: ओमेगा -3 मुळे हानिकारक रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध होतो
दाह: ओमेगा -3 आपल्या शरीराच्या दाहक प्रतिसादा दरम्यान सोडल्या जाणार्‍या काही पदार्थांचे उत्पादन कमी करते
5. मुलांमध्ये एडीएचडीची (ADHD) लक्षणे कमी करू शकतात: अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) असलेल्या मुलांमध्ये एडीएचडी नसलेल्या मुलांच्या तुलनेत ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण कमी दिसून आले . फिश ऑईल सप्लीमेंट्स एडीएचडीसाठी सर्वात उपयुक्त उपचार आहे.

6. मेटाबोलिक सिंड्रोमची लक्षणे कमी करू शकतात: मेटाबोलिक सिंड्रोम मध्ये खालील बाबींचा समावेश असतो –

सेंट्रल ओबेसिटी (पोटाजवळ अधिक चरबी)
उच्च बीपी (रक्तदाब)
इन्सुलिन रेजिस्टन्स
उच्च ट्रायग्लिसेराइड्स
“चांगले” एचडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी
ओमेगा -3 फॅटी एसिड मुळे मेटाबॉलिक सिण्ड्रोमची लक्षणे कमी होऊ शकतात.

7. सूज ही शरीराला होणाऱ्या इंफेक्शन आणि जखमेला रोखण्याची एक प्रतिकार प्रणाली आहे. कधी कधी बऱ्याच काळानंतर सूज कमी होते. याला जुनी सूज असं म्हणतात. ही सूज लठ्ठपणा, मधुमेह, आणि हृदय रोग यासारख्या जुन्या आजारांना वाढवू शकते. ही सूज कमी करण्यासाठी तुमच्या आहारात फिश ऑइल सामील केल्यास मदत होऊ शकते.

8. ऑटोइम्यून रोगाविरूद्ध लढा: जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती संक्रमण पेशी समजून स्वतःच्या पेशींवर आक्रमण करण्यास सुरवात करते तेव्हा ते ऑटोइम्यून रोग म्हणून ओळखले जाते. उदाहरणे: टाईप १ डायबेटीस, आणि मल्टिपल स्क्लेरोसिस. ओमेगा -3 फॅटी एसिडस् अनेक ऑटोइम्यून रोगांशी लढण्यासाठी मदत करू शकतात.

9. अल्झायमर रोगाशी लढा देऊ शकतोः वयानुसार आपल्या मेंदूचे कार्य कमी होते. ओमेगा -3 फॅट्स अल्झायमर रोग टाळण्यास मदत करू शकतात, परंतु यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.

10. मुलांमध्ये दमा/अस्‍थमा: अस्‍थमा हा एक फुफ्फुस्सांचा विकार आहे जो फुफ्फुसांत सूज आणि श्वसनाची समस्या निर्माण करतं. ओमेगा-3 च्या सेवनाने दम्याची रिस्क कमी होते.

11. फॅटी लिव्हर डिसीज: ओमेगा -3 फॅटी एसिडस् नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असलेल्या लोकांमध्ये चरबी कमी करते.

12. हाडांच्या आरोग्यासाठी: फिश ऑइलने तुमची हाडंही बळकट होतात. हे हाडासंबंधित रोग ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) आणि ठिसूळ हाडं बरी करण्यात मदत करतं.

13. मासिक पाळीत वेदना: ओमेगा -3 फॅटी सिडमुळे मासिक पाळीत होणारी वेदना कमी होऊ शकते. इबुप्रोफेन औषधापेक्षा अधिक प्रभावी असू शकते.

14. झोप सुधारू शकते: संशोधनात असे दिसून आले की शरीरातल्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडच्या कमतरतेमुळे झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. डीएचए च्या कमतरतेमुळे मेलाटोनिन नावाचे संप्रेरक व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे निद्रानाश होऊ शकतो. ओमेगा-3 च्या सेवनाने झोप सुधारू शकते.

15. त्वचेसाठी: डीएचए आपल्या त्वचेचा रचनात्मक घटक आहे. ओमेगा -3 तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास, अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी, सूर्याच्या अति-तीव्र किरणांपासून बचाव, मुरुमांचा धोका कमी करण्यास मदत करते.

16. ऑटिज्म: जसे गर्भवती महिलेच्या शरीरात ओमेगा ३ फॅटी ऍसिड जर योग्य प्रमाणात असेल तर बाळाला ऑटिज्म होण्याची रिस्क कमी असते. त्याचप्रमाणे मर्यादित संशोधनांती असे आढळून आले आहे कि ऑटिज्म असणाऱ्या मुलांमध्ये ओमेगा ३ फिश ऑइलचा चांगला परिणाम होतो.

आठवड्यातून दोनदा फॅटी फिशचे सेवन करणे हा उत्तम मार्ग आहे. जे लोक मासे खात नाहीत, त्यांनी ओमेगा 3 फिश ओईल सप्लीमेंट घेणे आवश्यक आहे.

फिश ऑइल हे सहसा हेरिंग, ट्यूना, अँकोविज आणि मॅकेरल सारख्या तेलकट माशांच्या ऊतींमधून काढलेले तेल असते. काही वेळेस कॉड माशाच्या यकृतापासून कॉड लिवर ऑइल बनते. ओमेगा -3 चे चिया सीड्स, ब्रसेल्स स्प्राउट्स, अल्गेल तेल, भांग बिया, अक्रोड, फ्लेक्ससीड्स, पेरिला तेल यासारखे वनस्पती स्रोत आहेत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की वनस्पतिजन्य ओमेगा -3 पेक्षा फिश ऑइल मध्ये आढळणारे ओमेगा -3 जास्त फायदेशीरअसतात. चांगल्या प्रतीचे ईपीए आणि डीएचए हे फिश, क्रिल आणि अल्गल तेलातून मिळू शकतात.

किती ओमेगा-3 घ्यावे ?

साधारणतः दररोज ईपीए आणि डीएचए (EPA + DHA) मिळून 250-500 mg घेण्याचा सल्ला दिला आहे. बाजारात मिळणाऱ्या 1,000-मिलीग्राम फिश ऑइल सॉफ्ट जेलमध्ये साधारणत: 250 मिलीग्राम एकत्रित ईपीए आणि डीएचए असतात.

जास्त ओमेगा 3 हानिकारक असू शकतो: अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) च्या मते, दररोज 2000 मिलीग्राम पर्यंत चा डोस सुरक्षित आहे. पण कुठल्याही परिस्थितीत 3,000 मिलीग्रामपेक्षा जास्त घेणे टाळावे.

अधिक प्रमाणात ओमेगा 3 फिश ऑइलच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत:

मधुमेह असणाऱ्या लोकांनी जर दररोज 8000 मिलीग्राम ओमेगा 3 फिश ऑइल घेतल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
रक्तस्त्राव: मोठ्या प्रमाणात फिश ऑइल घेतल्यास रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. नाकातून रक्त येणे, हिरड्यातून रक्त येणे अशी लक्षणे उद्भवू शकतात. तसेच, कोणत्याही शस्त्रक्रियेच्या 2-3 आठवड्यांपूर्वी ओमेगा 3 फिश ऑइल घेणे थांबवा.
अतिसार: फिश ऑइल आणि फ्लेक्ससीड तेलासारख्या ओमेगा -3 फॅटी ॲसिड सप्लिमेंटमुळे अतिसार होऊ शकतो.
ॲसिड रिफ्लक्स: काही लोकांमध्ये अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणे जसे की मळमळ,अपचन आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
स्ट्रोक: ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडचे जास्त सेवन केल्याने हेमोरॅजिक स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
व्हिटॅमिन ए टॉक्सीसिटी: कॉड लिव्हर तेलासारख्या विशिष्ट प्रकारचे ओमेगा -3 फॅटी ॲसिड सप्लिमेंटमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे टॉक्सीसिटी होऊ शकते.
निद्रानाश: जरी ओमेगा -3 फॅटी ॲसिड सप्लिमेंटचा झोपेसाठी फायदा होतो, तरी त्याच्या अतिसेवनामुळे निद्रानाश होऊ शकतो.
#माहिती_संग्रहण व #संकलन आणि उपलब्ध .... प्रॉडक्ट
पांडुरंग गजानन पवार पाटील
Pawar Medical Agency
कुळधरण रोड कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
मो. 8308162878

*पित्त हा विकार अनेकांना जगणं नकोसा करणारा आहे*तसेच अपचन पोटात निर्माण होणारे वायू ...पोट गच्च झाल्यासारखे वाटणे. पोटावर...
23/12/2024

*पित्त हा विकार अनेकांना जगणं नकोसा करणारा आहे*
तसेच अपचन पोटात निर्माण होणारे वायू ...
पोट गच्च झाल्यासारखे वाटणे. पोटावर अतिरिक्त चरबी वाढणे ..
गरगरणे, करपट, ढेकर येणे, जळजळ, लिव्हर वरती सूज, भूक न लागणे, उचकी येणे, अतड्यावर सूज येणे, जेवल्यानंतर सुस्ती आल्यासारखे वाटणे..
इत्यादी त्रास हे फक्त ज्या व्यक्तीची पित्त प्रकृती व्यवस्थित नाही त्यांना अश्या एक ना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते...
वरील सर्व त्रासावर *Acidoz Express* (एसिडॉझ एक्स्प्रेस)
हे सर्वोत्तम औषध अनेक डॉक्टरांनी आपल्या रुग्णांवर व रुग्णांनी वापरून पाहिले आहे व त्याचे अनुभव सुधा अतिशय उत्तम आहेत...
नक्की वापरा अनुभव घ्या व इतरांना सांगा...
येथे उपलब्ध...
*अनेकांचे अनुभव चांगले सोबतच* ... *औषधाची गुणवत्तेने अनेक जणांना छान रिझल्ट*
*पवार मेडिकल एजन्सी,कर्जत.*
आनंद ऑटो च्या खाली तळमजला कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर
*मो.8308162878*

मोठा पॅक 5 लिटर HandWash ऊपलब्ध पवार मेडिकल एजन्सी येथे
12/07/2024

मोठा पॅक 5 लिटर HandWash ऊपलब्ध पवार मेडिकल एजन्सी येथे

07/07/2024

𝗙𝗹𝗮𝘄𝗹𝗲𝘀𝘀 𝗯𝗲𝗮𝘂𝘁𝗶𝗳𝘂𝗹 𝘀𝗸𝗶𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝗲𝗹𝗼𝗶𝘀 𝗵𝗮𝗶𝗿 𝗿𝗲𝗺𝗼𝘃𝗮𝗹 𝗰𝗿𝗲𝗮𝗺..!!

Elois hair removal # exporting to 30 countries # Available in three variants to cater wide skin types like normal, sensitive and dry. Formulated with 100% natural extracts of Aloe vera, Papaya and Rose essence.
Urvashi Rautela Urvashi Rautela Lovers

Available tube pack size: 25g, 50g, 100g

Address

Lodhivali

Telephone

8308162878

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pawar Medical Agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Pawar Medical Agency:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram