
01/03/2025
मोफत भव्य वेदना निवारण शिबीर
माननीय डॉक्टर श्री राजेंद्र विखे पाटील साहेब कुलपती प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य वेदना निवारण शिबीर हे डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील रुरल मेडिकल कॉलेज लोणी येथे दिनांक 7 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 या दहा दिवसाच्या कालावधीसाठी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विना शस्त्रक्रिया आधुनिक उपचार पद्धतीद्वारे मणक्याचे आजार, संधिवात, गुडघ्यांचे आजार, कॅन्सरच्या वेदना, टाचेचे दुखणे, फ्रोजन शोल्डर, नागिणीचे दुखणे, ऑपरेशन नंतरच्या वेदना अशा विविध प्रकारच्या आजाराचे उपचार मोफत केले जातील.