25/06/2020
पांढरे डाग किंवा कोड या आजाराबद्दल अनेक गैरसमज आढळून येतात. हा आजार संसर्गजन्य आहे का व स्पर्श केल्याने तो पसरतो का हा पहिला प्रश्न येतो. दोन हजार वर्षापूर्वी पांढऱ्या डागाला श्वेतकुष्ठ संबोधले गेले म्हणून कोडाच्या माथी कुष्ठाचा कलंक आला. आता तर कुष्ठरोग सुध्दा बारा होतो. पांढऱ्या डागाच्या रुग्णाला मात्र विनाकारण त्रास सहन करावा लागतो. कोड संसर्गजन्य नाही व तो आनुवंशिक पण नाही.
कोड बरा होत नाही असाही एक समज प्रचलित आहे. कोडावर पुर्वी चांगले औषध उपचार उपलब्ध नव्हते हे खरे आहे. आता मात्र आधुनिक वैद्यकात अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहेत. फोटोन थेरपी, एकझायमर लेसर थेरपी, प्रतिकार शक्ती मध्ये बदल करणांरी काही औषधे अशी अनेक शस्त्रे आता त्वचारोगतज्ञाच्या हाती उपलब्ध आहेत.
स्किनसिटी ही वीस वर्षांपासून पांढऱ्या डागावर उपचार करणारी संस्था आहे. एकझायमर लेसर वापरून कोड बरे करण्याचा स्किनसिटीचा सतरा वर्षाचा अनुभव आहे.
अनेक तंत्रज्ञान एकत्र करून स्किनसिटी ने "संयुक्त उपचारपद्धती" विकसित केली आहे. या पद्धती मुले उपचाराचे दुष्परिणाम कमीतकमी राहून पांढरे डाग बरे करता येतात. संयुक्त उपचार पद्धतीने कोड बरे होण्याचे प्रमाण स्किनसिटी मध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशी माहिती स्किनसिटी चे संचालक आणि त्वचारोगतज्ञ डॉ नितीन ढेपे यांनी दिली.
आठवड्यातून दोनदा असे सहा महिने ते एक वर्षापर्यंत हा उपचार घ्यावा लागतो. या उपचार पद्धतीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत असेही डॉ ढेपे यांनी सांगितले.
पांढरे डाग आहेत म्हणून लग्न करायला नको अशा मानसिकतेत रुग्ण आमच्याकडे येतो. उपचारानंतर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड फरक पडतो. पांढरे डाग बरे होऊन , लग्न होऊन नंतर मुलांना दाखवायला येणाऱ्या संसारात सुखी मुली पाहिल्यानंतर हा उपचार विकसित केला याचे खरे समाधान होते. अशी शेकडो लग्ने स्किनसिटीच्या उपचाराने वाचवली आहेत.
स्किनसिटी ही त्वचारोग आणि लेसर उपचार यामध्ये देशामध्ये अग्रणी संस्था असून तीमध्ये पदव्युत्तर अभयसक्रम उपलब्ध आहेत. पांढरे डाग आणि लेसर उपचार यावर स्किनसिटीचे संशोधन अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले आहे. डॉ ढेपे स्किनसिटी चे संचालक असून त्यांना लेसर मॅन असेही म्हटले जाते. भारतीय त्वचारोगतज्ञ संघटनेच्या माध्यम कक्षाचे ते प्रमुख असून "कोड बरा होऊ शकतो" या विषयावर या संघटनेने जनजागरण मोहीम चालवली आहे.