02/12/2023
**मनाची सफाई**
आपण रोज घर झाडून साफ करतो.आजूबाजूचा परिसर साफ ठेवतो .
रोज शरीराची शुद्धी करण्यासाठी मुखसंमर्जन,अंघोळ करतो .बाहेरून घरी आल्यावर ,शौचास जाऊन आल्यावर हात पाय धुतो.
अगदी पुढे जाऊन शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी पंचकर्म चिकित्सा सुद्धा करून घेतो.
आपण आपले कपडे,गाडी,पादत्राणे स्वच्छ करण्याचा पुरेपूर आटोकाट प्रयत्न करत असतो.
पण आपल्याला एक मन ही असते ते दिसत नसले तरी ते सतत कार्यरत असते.त्यामध्ये सुद्धा अनेक त्रासदायक, नकोश्या अश्या आठवणी,विचार यांचा कचरा साठलेला असतो व आपल्याला समजायला लागल्यापासून साठवत आलेलो असतो.आणि हा कचरा आपण वर्षानुवर्षे आपल्या बरोबर वाहवत असतो.त्याचा आपल्याला नक्कीच त्रास होत असतो पण ते काढून टाकण्याचा प्रयत्न न करता कदाचित आपल्या अंतिम समयापर्यंत आपण ते गाठोडे वाहून नेत असतो.
जसे आपले घर,परिसर आपले शरीर स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे त्याचप्रमाणे आपले मन ही वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे.
अन्यथा जसे गटार तुंबून दुर्गंधी सुटते व त्या परिसरात राहणे मुश्किल होते तद्वत मनातील विचारांची दुर्गंधी मानसिक आजारांचे स्वरूप घेऊन आपले रोज चे आयुष्य जगणे मुश्किल होऊ शकते.हे टाळण्यासाठी आयुर्वेदामध्ये
सत्वावजय चिकित्सा सांगण्यात आलेली आहे.
शारीरिक दुखण्यासाठी लोक लगेच डॉ.कडे जातात ,उपचार घेतात आणि बरेही होतात.समाज ही त्यांना सहानुभूतीने पाहतो.परंतु मानसिक त्रास किंवा आजाराकडे एकूणच समाजाचा दृष्टिकोन तितकासा बरा नाही.मानसिक रुग्णा कडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे.त्यामुळे रुग्ण ही मानसिक आजारावर चिकित्सा घेण्यास पुढे येत नाही व रोगाची व रुग्णाची अवस्था बिकट होऊन बसते.
अश्या वेळी जे काही छोटे छोटे विषय आहेत जसे चिंता,भयगंड,मंत्र चळ,तणाव,नैराश्याची सुरुवात , आघा तानंतर येणारा तणाव जसे अपघात,नैसर्गिक आपत्ती,breakup,जवळच्या व्यक्तीचा मृत्यु इ. गोष्टी मधून सावरून पुनः सामान्य जीवन जगण्यासाठी आयुर्वेद मधील *_सत्वावजय चिकित्सा_* खूप चांगल्या पद्धतीने सहाय्यक ठरू शकते.
या चिकित्सेच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
*वैद्या सौ स्मितांजली संजय भिसे शिंगे.*
#आयुर्वेदाचार्य
#आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सक
#आयुर्वेदिय मानसोपचार समुपदेशक
#पदव्युत्तर योग स्नातक
#योग चिकित्सक
९४२२३८३२२०
महाड, रायगड, महाराष्ट्र