27/02/2024
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल तर्फे फार्मासिस्ट अभ्यासक्रम शिबिराचे आयोजन..........................
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आणि महाड पोलादपूर तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्यासाठी फार्मासिस्ट व्यावसायिक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त माहितीविषयक अभ्यासक्रम शिबिराचे आयोजन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एफ डी ए असिस्टंट कमिशनर श्री डी.सी. शेख, मुंबई झोन जनरल सेक्रेटरी श्री सुनील छाजेड, ड्रग इन्स्पेक्टर श्री प्रकाश कोळी, एम एस पी सी मेंबर श्री नितीन मणियार, श्री ललित सिरोया श्री मनोज ठाकूर श्री.मिनार पाटील, श्री व्ही जी चिमणकर सर, श्री सुशील माळी,श्री मनोज ठाकूर,श्री मिनार पाटील फार्मसी कॉलेज कर्जतचे प्रिन्सिपल श्री मोहन काळे, श्री संतोष घोडींदे इत्यादी प्रमुख मान्यवर
उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन,शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यानंतर सर्व मान्यवरांचे आयोजकांकडून यथोचित स्वागत करण्यात आले.
मोहनकाका शेठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
औषध क्षेत्रातील नवनवीन विकसित तंत्रज्ञान व त्यासंबंधी विविध विषयांची अद्यावत माहिती देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या व दुपारच्या सत्रात श्री मोहन काळे, श्री अमोल बोंद्रे, सौ माया देसाई, श्री डी सी शेख तसेच डॉक्टर विनया कुलकर्णी यांनी फार्मासिस्ट व्यवसाय संबंधी विविध विषयांवर उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित सर्वांसाठी संस्थेतर्फे चहा,अल्पोपहार त्याचप्रमाणे स्नेहभजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
अत्यंत नियोजनबद्ध झालेल्या या कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर माणगाव श्रीवर्धन तळा बोरली इत्यादी ठिकाणहून जवळपास 150 फार्मासिस्ट सहभागी झाले होते. मनोज मेडिकल महाडचे श्री.मनोज शेठ यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रंगसुगंध महाडचे अध्यक्ष व प्रसिद्ध सूत्रसंचालक श्री सुधीर शेठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोहनकाका शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली महाड पोलादपूर तालुका केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या श्री सचिन सुकाळे, श्री दिलीप मेहता,श्री अभय कामत, श्री अमित घाटे सर्वच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.