21/06/2023
*चीट डे … एक बिझिनेस स्ट्रॅटेजी*
भारतीयांमधे lifestyle deseases चं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यावरच एक संपूर्ण इंडस्ट्री उभी आहे! खरं नाही वाटत ना? Health and fitness शी संबंधित अनेक प्रॅाडक्ट्स, जिम व व्यायामावर उभी इंडस्ट्री, nutrients and health supplements industry, beauty products, fitness equipments, clothes and accessories, diet and health parameters related products यादी न संपणारी आहे.
*मुळात आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव हीच चुकीची संकल्पना आहे*. शरीरस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य याला परफेक्ट इंग्रजी शब्द नाही सापडला. स्वास्थ्य, संतूलन, आनंदी निरामय जीवन ही संकल्पना या मायाजालात हरवलेली वाटते. कुंटे सर सांगतात तसं *शरीरासाठी आयुर्वेद, मनासाठी योग, उपनिषदं व आत्म्यासाठी भारतीय अध्यात्म शास्त्र... ही भारतीय त्रिसूत्री* आपण केव्हाच बाद केली आहे. सगळ्यावर ‘गोळीबार’ (dependency on tablets) हाच एक उपाय! तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासि अशी आपली अवस्था आहे.
या बिझिनेस ने लावलेली सर्वात वाईट सवय म्हणजे चीट डे! सत्यानाश… 🤦♀️ आठवडाभर कडक डाएट करायचं आणि मग ‘reward’ म्हणून चीट डे. काहीही खा. कसंही वागा. आणि आठवड्याच्या मेहनतीवर बोळा फिरवा. *नक्की कोणाला चीट करायचं? आणि का? आठवडाभर healthy lifestyle फॅालो केल्याबद्दल स्वतःलाच फसवायचं? हे कसं रिवॅार्ड असू शकतं? I cheat myself with junk food to reward my act of healthy lifestyle ... so contradictory!*
आपल्या चीट डे वरच या इंडस्ट्रीचे गल्ले भरतात हे पण कळत नाही इतकी अक्कल गहाण टाकली आहे. आमच्या अर्चना देशपांडे, उमा गावडे, दिप्ती जोशी, मंजिरी आत्रे, स्वप्नील यांनी जर असे चीट डे केले असते तर १५-२० किलो वजन कमी झालंच नसतं. नशीब त्यांनी सरांना कधी विचारलं नाही cheat day कधी करू. नाहीतर ताबडतोब ‘कुंटे’ नावाला साजेसं उत्तर आणि सार्वजनिक कौतुक सोहळा झाला असता 😃😃
तर मुद्दा असा की आरोग्य, स्वास्थ्य हे विषय आधी समजून मग फिटनेसच्या मागे धावलो तर आपोआप मन व जीभही ताब्यात राहील आणि cheat day ची गरजच पडणार नाही. उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक. That's why *Mind programing with weight loss*.
So take charge of your health before these health industry giants make you a puppet and dictate the terms.
Aparna Gharpure,
Powai, Mumbai
9769920874