10/07/2025
'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा ? जाणून घ्या 'या'आजारा बद्दल...
नागिण या आजाराला इंग्रजीमध्ये Herpes zoster किवां shingals (शिंगल्स) असं देखील म्हणतात.
नागीण होण्यामागील कारण -
नागीण हा "व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस" (Varicella Zoster virus) या विषाणूमुळे होतो. हा एक त्वचेचा संसर्गजन्य आजार आहे.
नागीण (Herpez zoster) व कांजण्या (Varicella किंवा chicken pox) हे दोन्ही आजार व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस (Varicella Zoster virus) या विषाणूमुळे होतात.
नागीण व कांजिण्या आजारास कारणीभूत असणारे varicella-zoster virus हे व्हायरस प्रामुख्याने त्वचेवर आलेल्या पुरळांच्या स्त्रावातून पसरत असतात.
जर तुम्हाला लहानपणी कधीही कांजिण्या न झालेला असल्यास व तुमचा संपर्क नागीण किंवा कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या त्वचेवरील पुरळांच्या स्त्रावाशी आल्यास तुमच्या शरीरात varicella-zoster हे व्हायरस पसरतात व कांजिण्या आजार निर्माण करतात. त्यानंतर पुढील काही वर्षात रोग प्रतिकारशक्ती शक्ती कमी झाल्यावर नागीण आजार होतो.
नागीण हा आजारा कोणाला होऊ शकतो -
- म्हातारपण.
- रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आसणे.
- कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक ताण.
- औषधांच्या दुष्परिणामांमुळे ही असे होण्याची शक्यता असते.
नागीणची लक्षणे काय आहेत -
शिंगल्सच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये हे समाविष्ट असू शकते-
ताप, थंडी, डोकेदुखी, थकवा, प्रकाशाची संवेदनशीलता, पोट बिघडणे व त्यानंतर
त्वचेच्या भागात खाज सुटणे, मुंग्या येणे किंवा जळजळ होणे.
प्रभावित भागात आपल्या त्वचेवर लालसरपणा.
त्वचेच्या छोट्या भागात पुरळ उठणे.
द्रवाने भरलेले फोड फुटणे .
प्रभावित त्वचेच्या भागात सौम्य ते तीव्र वेदना.
नागीणीवर उपचार कोणते -
डॉक्टरांच्या सल्लानुसार नागिणी उपचार केल्यानतंर हा आजार लवकर बरा होऊ शकतो.
या आजारावर विषाणूविरोधी औषध उपलब्ध आहेत.
उपचारांमुळे आजाराची तीव्रता आणि कालावधी कमी होऊ शकतो आणि तुमच्या लक्षणांवर अवलंबून, व्हायरस कमकुवत करणे आणि/किंवा वेदना कमी करणे समाविष्ट असू शकते.
तुम्हाला नागीण (शिंगल्स) आहे असे वाटत असल्यास, कृपया शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुमच्या लक्षणांची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यासाठी ते योग्य औषधे लिहून देऊ शकतात
उपचार वेळेवर न घेतल्यास वृद्धांन मध्ये पोस्ट-हर्पेटिक न्यूराल्जिया (post herpetic neuralgia) यासारख्या गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो.
सर्वसामान्य लोकांना पडलेले प्रश्न........
50 आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना जास्त धोका का असतो.?
वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होत असल्याने, वयाच्या 50 नंतर लोकांना अधिक धोका असतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना नागीण (शिंगल्स) होण्याचा धोका जास्त असतो.
नागीण रोग संसर्गजन्य आजार आहे का..?
होय, नागीण रोग संसर्गजन्य आजार आहे.
नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजिण्या आजार होत असतो. त्यामुळे एकाद्या व्यक्तीला नागीण झाल्यास त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला झाल्यास त्याला कांजिण्या (chickenpox) हा आजार होऊ शकतो.
एकापेक्षा जास्त वेळा शिंगल्स येऊ शकतात का.?
होय कोणालाही एकापेक्षा जास्त वेळा शिंगल्स येऊ शकतात. शिंगल्सबद्दलची सर्वात मोठी मिथक म्हणजे ती एकदाच होऊ शकते.
जर लहानपणी कांजिण्या झालेला असल्यास शरीरात या व्हायरसच्या अँटीबॉडीज तयार झाल्याने पुन्हा नव्याने या व्हायरसचा संसर्ग होत नाही. अशा व्यक्तीच्या शरीरात व्हायरस छुप्या स्वरूपात nerve tissue मध्ये लपलेले असतात. आणि कालांतराने त्या व्यक्तीची इम्युनिटी कमी झाल्यावर नागीण आजाराचा त्रास त्याला होत असतो.
नागीण (शिंगल्स) टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणते आहेत.?
लसीकरणामुळे नागीण (शिंगल्स) टाळण्यासाठी मदत होऊ शकते. नागीण (शिंगल्स) आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोला.
डॅा. किरण जाधव स्किन केयर
डॉक्टर्स लेन,समता कॅालनी, माजलगाव