
27/12/2024
डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण मुकलो आहोत. त्यांनी आपल्या अर्थतज्ज्ञ आणि धोरणकार भूमिकेतून भारताच्या प्रगतीला नवे क्षितिज दाखवले. 2004 ते 2014 या कालखंडात पंतप्रधानपदावर कार्यरत राहून त्यांनी देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली.
त्यांच्या शांत, संयमी नेतृत्वातून संपूर्ण देशाला दिशादर्शन मिळाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगात बळ मिळावे, हीच भावना.