29/01/2018
म्हसवड वार्ताहर
विरकरवाडी हायस्कुलमध्ये माता-पालक मेळावा उत्साहात पार
न्यू इंग्लिश स्कुल,विरकरवाडी येथे माता-पालक मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर वीरकर होते.
प्रारंभी,सर्व उपस्थितांचे विद्यालयाच्या सभागृहात स्वागत करण्यात आले.
यावेळी डॉ.सेजल मोडासे म्हणाल्या,महिलांनी आपले आरोग्य आणि आहार या दोन्ही बाबींना महत्व दिले पाहिजे.प्रत्येक घरात मुली आणि आई यांच्यामध्ये मुक्त वातावरण ठेवले पाहिजे.वाढत्या वयानुसार मुलींमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलाशी प्रत्येक घरातील आईने समरस असले पाहिजे.मासिक पाळी ही नैसर्गिक बाब असून योग्य काळजी व स्वच्छतेबाबतची शिकवण घरातील महिलांनी, मुलींना समजावून सांगणे गरजेचे आहे.आई आणि मुलगी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास मुलींना मानसिक दडपण राहणार नाही.
गावचे सुपुत्र व कलेचा छंद जोपासणारे अंकुश भानुदास वीरकर यांच्यामार्फत, विद्यालयातील सर्व मुलां-मुलींना वाटर कलर बॉक्स आणि ब्रशचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ.दीपक मोडसे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उज्वला सुनील वीरकर,शिरतावच्या सरपंच स्वाती तुकाराम लुबाळ,उपसरपंच किरण खळवे,शिवाजी पांढरे,एस.आर.वीरकर,आर.टी.काळेल,आर.बी.लुबाळ,आर.बी.शिंदे,दीपक जावीर,डी.एम.माने,बी.जे.गलंडे,के.एस.पाटील,महादेव झपाटे,रमेश वीरकर आदींसह महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सूत्रसंचालन डी.एस.जावीर यांनी तर आभार आर.बी.शिंदे यांनी मानले.