Dr Tanvi Naik - Mental Health Insights

Dr Tanvi Naik - Mental Health Insights मानसोपचारतज्ज्ञ | Psychiatrist

20/04/2026

It finally happened! 💛

Our first Women’s circle….and it was everything we hoped for (and more) ✨

So many smiles, honest moments and a lot of warmth in one room 💛

Feeling really happy seeing this vision come to life…

First one will always remain special! 😊

More circles coming soon!!
See you in the next one!🤗🥳

१५ एप्रिल । ११.३० वाजता      #मिरज
14/04/2026

१५ एप्रिल । ११.३० वाजता

#मिरज

नमस्कार! 🌸खरं सांगायचं तर…आपल्या आजूबाजूची प्रत्येक स्त्री सतत कुठल्या ना कुठल्या भूमिकेत वावरताना आपल्याला दिसते. ती कध...
09/04/2026

नमस्कार! 🌸

खरं सांगायचं तर…
आपल्या आजूबाजूची प्रत्येक स्त्री सतत कुठल्या ना कुठल्या भूमिकेत वावरताना आपल्याला दिसते. ती कधी मुलीच्या भूमिकेत असते, कधी बहिणीच्या, कधी मैत्रिणीच्या, कधी बायकोच्या तर कधी आईच्या… ती कधी स्वतःहून त्या भूमिकेत शिरते तर कधी तिच्यावर ती भूमिका लादली जाते.
इतरांची काळजी घेण्यात, त्यांच्या भावनांचं, अपेक्षांचं आणि जबाबदाऱ्यांच ओझ सांभाळत असताना ती हळू हळू स्वतःची काळजी घेणंच विसरून जाते.

ह्या भूमिकांमधून तिची कधी सुटका होते का? त्या भूमिका आपण तिला कधी विसरू देतो का? ह्या भूमिका विसरून ती फक्त एक ‘माणूस’ कधी असते?

म्हणूनच आम्ही असा विचार केला की —
आपण त्यासाठी एक जागा तयार केली तर?

सुरू करत आहोत- The Women’s Circle 🌿

मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली एक अशी सुरक्षित आणि नि:पक्षपाती जागा-

जिथे तुम्हाला सतत “Strong” राहायची गरज नाहीये, जिथे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी योग्य शब्द शोधण्याची गरज नाहीये, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत असण्याचीही गरज नाहीये…
तुम्ही या, बसा, व्यक्त व्हा किंवा फक्त ऐका...

ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही कुठल्याही मुखवट्याशिवाय वावरू शकता, बोलू शकता, आणि स्वतःशी किंवा तुमच्या सारख्याच इतरांशी जोडले जाऊ शकता…

आणि हो—
हे लेक्चर किंवा वर्कशॉप नाहीये.
आणि ही भिशीही नाहीये (पण चहा/कॉफी मात्र मिळू शकते 😄)

हे वाचून तुम्ही नकळत स्वतःशीच हसला असाल, किंवा एका सेकंदासाठी तरी विचारात पडला असाल तर कदाचित ही जागा तुमच्यासाठी बनली आहे…💛

तर नक्की या! स्वतःला समजून घेण्यासाठी, भावना ओळखण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी!

तुम्हाला भेटायला आम्हाला खूप आवडेल 🌿

आपल्याच,
डॉ. तन्वी नाईक (Psychiatrist)
राधा आपटे (Psychologist)

Address

Taj Complex, Opposite LIC Building, Hira Hotel Chowk, Shivaji Road
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Tanvi Naik - Mental Health Insights posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category