15/03/2024
मिरज :- वीरानंद चॅरि्टेबल ट्रस्ट सोमशेखर हॉस्पिटल आणि श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटर मिरज यांच्या सहकार्याने आज दिनांक 15.3.2024 रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले.सदर शिबिरात उत्स्फूर्तपणे 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यामध्ये डॉ सोमशेखर हॉस्पिटल मधील स्टाफ,भारती विद्यापीठ अंतर्गत नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व गुलाबराव पाटील मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी तसेच ढवळी, बेडग, सावळी, कुपवाड या ग्रामीण भागातून सुद्धा उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.
यावेळी वीरानंद चॅरि्टेबल ट्रस्टचे अध्यक्ष व श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटरचे अध्यक्ष मा.डॉ सोमशेखर पाटील सर,श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटरचे सेक्रेटरी मा डॉ जयदीप पोळ सर, वीरानंद चॅरि्टेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष मा. चंद्रशेखर पाटील, खजिनदार मा. राजशेखर पाटील तसेच सदस्य डॉ ध्रुव सोमशेखर पाटील, डॉ विद्या सोमशेखर पाटील तसेच श्री वसंतदादा पाटील ब्लड सेंटरच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी मा डॉ वैशाली पोळ, जनसंपर्क अधिकारी मा. युवराज मगदूम व इतर स्टाफ हे सर्वजण उपस्थित होते.
हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांनी रक्तदान शिबिराचे नियोजन केले.
====================