
20/05/2022
What Patient's Talk About Us | मणक्याची शस्त्रक्रिया समज-गैरसमज
https://youtu.be/m9ueTLqYd7Q
1)ऑपरेशननंतर तुम्ही मुक्तपणे फिरू शकाल का?
Spine surgery recovery – या surgery बाबतील लोकांना अनेक प्रश्न व गैरसमज असतात. त्यातील एक गैरसमज म्हणजे surgery नंतर बेड वर बसून राहावा लागेल का? तर याचं उत्तर म्हणजे नाही. Spine surgery हि patient ला चालता यावं म्हणून करतात. Patient ला जागेवर बसून राहता येऊ नये म्हणून हि surgery होते. Patient ला वाकता येईल व खाली बसता हि येईल कारण वाकणं हे फक्त मणक्याचे काम नसून गुढग्याचा व hip joint चे सुद्धा आहे. वाकणे हे ऑपरेशन नंतर काही दिवसांनी गुढग्यातून व खुण्यातून सुरु करता येते. याशिवाय ठरावीक व्यायाम कायम ठेवले तर मनक्यातून सुद्धा वाकता येते.
2)ऑपरेशनमुळे अर्धांगवायू (Paralysis) होईल का?
लोकांमध्ये अजून एक शंका अशीही असते कि operation नंतर paralysis म्हणजेच अर्धांगवायू चा त्रास होऊ शकतो का तर तसे हि काहीही नाही. Spine surgery मध्ये एका nerve च operation झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही nerve वर फरक पडत नाही. त्यामुळे अर्धांगवायू चा त्रास होऊ शकत नाही. जास्तीत जास्त एका पायात थोडीशी कमजोरी येणं हाच एक त्रास होऊ शकतो.
3)शस्त्रक्रियेनंतर मणक्याच्या समस्या परत येतील का?
अजून एक प्रश्न असा असतो कि spine operation झाल्यावर परत मणक्याचे आजार परत येणार नाहीत. मणक्याचे operation हे कायमचे उत्तर नसते. जसजसे वय वाढते तसतसे काही सवयींमुळे अथवा काही खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मणका हळू हळू कमकुवत होऊ लागतो. त्यामुळं मणक्याचे आजार परत होऊ शकतात व त्याची काळजी रुग्णांनी घेतली पाहिजे.
Operation करण्याआधी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो व operation खरेच गरजेचे आहे का याचा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी मणक्या मधलं दुखणे स्नायूंमुळे हि होऊ शकते व मानसिक ताणांमुळे हि होऊ शकते (इत्यादी कारणे वगळता).
यामुळे या व्यांधीचे निदान व उपचार तज्ञ डॉक्टांच्या मार्गदर्शनाने करणे गरजेचे आहे.