10/03/2024
एक उमेदवार मत मागण्यासाठी एका म्हाताऱ्याकडे गेला आणि 1000 रुपये धरून म्हणाला बाबाजी कृपया मला यावेळी मत द्या.
बाबा जी म्हणाले:
बेटा, मला पैसे नकोत पण तुला मत हवं आहे तर मला गाढव विकत घेऊन दे! उमेदवाराला मते हवी होती, तो गाढव विकत घेण्यासाठी बाहेर पडला, पण 40,000 पेक्षा कमी किमतीचे गाढव सापडले नाही, म्हणून परत आला आणि बाबाजींना म्हणाला:
मला वाजवी किंमतीत एकही गाढव सापडले नाही, गाढवाची किंमत किमान 40000 आहे, म्हणून मी तुम्हाला गाढव देऊ शकत नाही पण मी 1000 देऊ शकतो!
बाबा जी म्हणाले:
साहेब, मला आणखी लाजवू नका, तुमच्या नजरेत माझी किंमत गाढवापेक्षा कमी आहे, जेव्हा गाढव 40000 पेक्षा कमी विकले जात नाही, तेव्हा मी 1000 ला कसा विकला जाऊ शकतो!
म्हणूनच या निवडणुकीत हुशारीने मतदान करा. स्वतःची आणि तुमच्या मताची कदर करा.
@व्हाट्सअप साभार