16/12/2022
पोषक अन्न लावण्यासाठी जागा ही मर्यादा नाही!
प्रेरणा सामाजिक विकास संस्था (PSVS) ही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात स्थित एक संस्था आहे आणि ती प्रामुख्याने महिला सक्षमीकरण, उपजीविका, शेती, प्रशिक्षण इत्यादींवर काम करत आहे. महाराष्ट्रातील 600 हून अधिक गावांमध्ये या संस्थेचे अस्तित्व आहे.
प्रेरणा सामाजिक विकास संस्था 2019 मध्ये अनिमिया फ्री इंडिया फोरम (AFIF) मध्ये सामील झाले. प्रेरणा सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्री कमलेश कोरपे यांनी सहायक ट्रस्टने आयोजित केलेल्या ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स प्रोग्राम मध्ये सहभाग घेतला आणि ऑर्गनिक किचन गार्डन फॉर न्यूट्रिशन (OKGN) ट्रेनर म्हणून पात्र ठरले. ट्रेनर असल्याने, श्री. कोरपे यांनी 1400 हून अधिक अंगणवाडी सेविकांना पोषण आणि ऑरगॅनिक किचन गार्डन फॉर न्यूट्रिशन (OKGN) च्या विकास आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे.
महाडमधील नाटे बौधवाडी गावातील अंगणवाडी सेविका श्रीमती अलका जाधव यांनी प्रेरणा सामाजिक विकास संस्थेच्या प्रशिक्षणाला हजेरी लावली होती आणि अंगणवाडीत फारशी जागा नसताना देखील सेंद्रिय पोषण परसबाग विकसित करण्यासाठी प्रयत्न केलेे. पण हार न मानता त्यांनी जागेची अडचण दूर करण्याचसाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. अलका ताईंनी टाकून दिलेल्या प्लास्टिकच्या डब्यात मेथी आणि कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या उगवल्या आणि शेवगा, पेरू, कढीपत्ता, पपई इत्यादि झाडेही जिथे जागा मिळेल तिथे वाढवली. यांच्या अंगणवाडीत 10 मुले आहेत, श्रीमती जाधव मुलांसाठी OKGN मधील भाज्यांपासून विविध पोषक पाककृती तयार करतात आणि त्या पाककृतींचा आनंद मुलांना देतात.
अलका ताई सांगतात की प्रशिक्षणाने त्यांना सेंद्रिय पोषण परसबाग अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी आत्मविश्वास आणि कौशल्ये मिळाली, यामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानाचे कृतीत रूपांतर करण्यास प्रवृत्त केले, काही अडचणी होत्याच. या छोट्याशा यशाने त्यांना स्वतःच्या शेतात स्वतःचे ओकेजीएन विकसित करण्यास प्रवृत्त केले. आता त्या त्यांच्या कुटुंबासाठी सहायक ट्रस्ट व
प्रेरणा सामाजिक विकास संस्थे मार्फत मिळालेल्या बियाणे किटच्या मदतीने रसायनमुक्त भाजीपाला पिकवत आहे, जे त्यांनी प्रशिक्षणादरम्यान ट्रेनिंग किटसोबत खरेदी केले होते. अलका ताई त्यांच्या शेतातील अतिरिक्त उत्पादन अंगणवाडीतील मुलांना देखील देतात.
योग्य वेळी योग्य ज्ञान आणि कौशल्ये प्रदान केल्याने लोक वेगळा विचार करण्यास प्रवृत्त होतात आणि अनेकांना पोषणाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा मिळते. आम्हाला विश्वास आहे की अलका ताई बदल घडवून आणू शकतात आणि योग्य मार्ग दाखवू शकतात आणि त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी अनेकांना प्रेरणा देऊ शकतात. श्रीमती जाधव आणि प्रेरणा सामाजिक विकास संस्थेचेे अभिनंदन.
Photo Courtesy: AFIF partner Prerana Samajik Vikas Sanstha, Mahad & Mrs. Alka Jadhav, Aanganwadi teacher, Nate Bauddhwadi, MAHAD, Maharashtra.
Kamlesh Korpe
अनिमिया फ्री इंडिया फोरम
सहायक ट्रस्ट
🌐www.sahayaktrust.org
📹www.youtube.com/c/TheSahayakTrust
👥The Sahayak Trust