08/07/2025
*हायपर ऍक्टिव्ह, अटेंशनल डेफिशियन्सी (ADHD) व हिप्नोसिस उपचार*
आमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, शाळेतून मेसेज आलाय कि तुमच्या मुलाला अटेंशन डेफिनिशन्सी आहे.
कौन्सिलर सांगता येत कि तुमचा मुलगा अतिशय चंचल आहे.
हे शब्द हल्ली खूपदा ऐकण्यात येतात.. यालाअटेंशनल डेफिसेन्सी हायपर ऍक्टिव्हिटी दिसोर्डर म्हणतात.
हिप्नोथेरेपीच्या प्रॅक्टिस मध्ये तर आता अशा तऱ्हेची कित्येक मुलं आपल्याकडे वर्षावर येत असतात..
पूर्वी जसं मुलाचं वय वाढेल तसा हा आजार बर होईल अशी समजूत होती..
पण साधारण 1990 नंतरच्या संशोधनामध्ये असं जाणवलं की मोठेपणी सुद्धा हा आजार बऱ्यापैकी असू शकतो किंवा हल्ली काही मध्यम वयीन स्त्रीया किंवा मोठ्या प्रौढांना सुद्धा अटेंशनल डेफिशियन्सी आढळते..
विशेषतः शाळकरी किंवा कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण खूप आढळून येत आहे..
*याची काही करण पुढील प्रमाणे*
* ADHD अनुवंशिक असू शकते. जवळच्या एखाद्या नातेवाईकाला असल्यास काही वेळा अनुवंशिक लक्षणे समस्याग्रस्ताला असू शकतात
* पर्यावरणीय घटकांमध्ये जसे अकाली जन्म, कमी वजनाचे बाळंतपण.. हे कारण असू शकते..
* जनुकीय ट्रान्सपरंट मेंदूच्या विकासामध्ये न्यूरो ट्रान्समीटर चे अनियमन असणं हेही कारण असू शकते
* प्रसतीपूर्व आईकडून चुकून चुकीची औषधं घेतली जाणं.
* आईचं व्यसन करणे,
* गर्भारपणात एखाद्या विषारी पदार्थाच्या संपर्कात आईचे येणे
* मेंदूला दुखापत असणं.
हल्ली ह्या समस्येचं प्रमाण जास्त जाणवण्यामध्ये काही सामाजिक व कौटुंबिक कारणे पण जाणवलेली आहेत..
पूर्वीच्या तुलनेत समाज रचनेमध्ये आता बदल झालेले आहे..
* आई वडील दोघेही नोकरीला असतात
* एकच मूल असतं.
* भावंड नसल्यामुळे एकलकोंडे पणा असतो.
* एकच मुल असल्यामुळे आणि आपण दोघेही नोकरीवर असल्यामुळे आई-वडील मुलावर जास्त फोकस किंवा पेंपरिंग असतं.
* मुल इंग्लिश मीडियम कीवा आयसीएससी बोर्डात जात असतात तिथे अभ्यासाचा प्रेशर ताण जास्त असतं.
* घरात बिघडलेले कौटुंबिक संबंध असणं
* उच्च पातळीवर संघर्ष असणं
* कधीकधी सिंगल पेरेंट्स असणं
*आधी ADHD ची लक्षणे समजून घेऊ*. यातील काही किंवा सगळी लक्षणे एखाद्यास असू शकतात..
* दैनंदिन कामे पूर्ण करण्यास अडचणी जाणवणे
* सतत अस्वस्थता, आवेग, असमर्थता, आक्रमकता आणि बैचैन..
* सतत हालचाल करत राहणे शांतता- एकाग्रता नसणे
* बसल्या जागी सुद्धा सतत हात किंवा पाय किंवा शरीराचा भाग हलवत राहणे..
* खूप बोलत राहणे, असंबंध बोलत राहणे, सार्वजनिक स्थळी किंवा कुठेही मोठ्या मोठ्याने बोलत राहणे
* इतरांपेक्षा चंचलता असणे
* आपली पाळी किंवा संधी यायच्या आधीच बोलणे किंवा मध्येच बोलत राहणे
* कोणतीही प्रतिक्रिया विचारपूर्वक परिस्थितीचा अंदाज न करता देणे
* घरातले व शाळेतले नियम पाळण्यास न जमणे
* इतरांशी बोलताना, खेळताना सतत भांडण, हमरा तुमरी किंवा मारामारीवर येणे
* आपली वस्तू व्यवस्थित सांभाळण्यास न येणे किंवा हरवणे
* एखादे काम पूर्ण करण्यास न जमणे लक्ष देऊन न काम करणे सतत सतत विचलित होत राहणे..
* सांगितलेले काम सोडून देणे
* स्व नियंत्रण किंवा आत्म नियंत्रणाचा अभाव असणे
* मध्येच लहान मुलासारखं रडणे किंवा उड्या मारणे
* शाळेमध्ये छोट्या छोट्या इशूज वरून वायलेट होणे
वरील लक्षणे असलेले पेशंट(मुलं) येतात. पण इथे मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की या मुलांमध्ये IQ चा काही प्रश्न नसतो. हि मुलं बुद्धिमान असतात या स्थितीचा आणि बुद्धिमत्तेचा तसा काही फारसा संबंध नाही..
( *गतिमंद व मतिमंद ही वेगळी कॅटेगरी आहे ती इथे लागू होत नाही* )
काही वेळा जरी हायपर ऍक्टिव्हिटी ची पातळी सामान्य असली तरी शाळेत किंवा घरी अशा मुलांच्या दैनंदिन जीवनात लाक्षणीय रित्या वागणुकीत व्यत्यय येत असतो... त्यामुळे काही वेळा चिंता दायक परिस्थिती येते
येथे असे आढळतं की सर्वच मुलांमध्ये ADHD नसते किंवा व्यक्ती- व्यक्तीत त्याची तीव्रता किंवा लक्षणे किंवा प्रकटीकरण मुलांमध्ये वेगवेगळे असू शकते
याच्यावर काय उपचार होऊ शकतात
* तज्ञ मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) किंवा न्यूरोलॉजिस्ट कडून उपचार केले जातात.
* समुपदेशन ए डी एच डी असलेल्या व्यक्तीला भावना विचारांनी वर्तनांवर नियंत्रण करण्यास मदत करते
* शिक्षणामध्ये शिक्षकानी व पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेणं गरजेचं असतं कारण इतर मुलं त्याला कायम अस्वस्थ करत असतात.. त्यामुळे कधी कधी मूल अग्रेसिव्ह होऊ शकतं
* बिह्याविहार थेरेपी तज्ञ मदत करू शकतात नवीन काही सामाजिक कौशल्य, वागणूक प्रशिक्षण, शैक्षणिक प्रशिक्षण पालक आणि मुल दोघांनाही प्रशिक्षण देऊ शकतात त्यामुळे लक्ष सुधारण्यास मदत होते
* इतरही घटक नियमित व्यायाम साजगता ध्यान उपयोगी ठरतं
* लक्ष विचलित करणारे घटक समजून घेऊन कमी करणे आवश्यक असत
* ईथे एक समजून घेणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीला ए डी एच डी ची लक्षणे व उपचार वेगवेगळ् असू शकतात आणि उपचारांमध्ये संपूर्ण कुटुंबाचा हस्तक्षेप व सक्रिय सहभाग असणं गरजेचं असतं
*आता समजून घेऊ संमोहन उपचारांमध्ये आपण कस काय मदत करू शकतो*
सर्वात प्रथम म्हणजे मला इथे नमूद करायचे आहे की संमोहन उपचार ही पूरक उपचार पद्धती म्हणून वापरली जाते. (मुख्य उपचार नाही)
संबंधित मुलाची व त्याच्या पालकांची पूर्ण मनापासून संमती असेल तर त्याच्यावर संमोहन प्रयोग करावा
* संमोहन प्रोसेस मध्ये सर्वप्रथम त्या व्यक्तीला व्यवस्थित ट्रान्समध्ये जाण्यासाठी सूचना देऊन प्रेरित केले जाते
* मुलाच्या इमोशनल कोशन EQ चांगल्या प्रकारे कसे डेव्हलप करता येईल याचे प्रोग्रामिंग केले जाते
* एकाग्रता व सजगता वाढवण्यासाठी सूचना दिल्या जातात
* कोणत्याही काम मनापासून करावं आणि जरी वेळ लागला तरी ते काम पूर्ण करावं यासाठी प्रेरित केलं जातं
* तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सूचना प्रोग्राम केल्या जातात
* वर्तणूक आधी समजून घेऊन चुकीची वर्तवणूक सुधारण्याकडे भर दिला जातो
* सगळ्यात महत्व त्याची स्व नियंत्रणाची भावना डेव्हलप केली जाते.. त्यामुळे व्यक्ती त्याच्या भावना विचार आणि वर्तनांवर अधिक नियंत्रण ठेवण्यात सक्षम होतो
* आत्मविश्वास वाढीसाठी प्रेरणा दिली जाते
* भावनांवर व वर्तनांवर नियंत्रण मिळू शकल्यास कसा आत्मसन्मान सन्मान वाढतो हे मनावर जवळ जातं
* आई-वडिलांचा गुरुजनांचा शिक्षकांचा आदर करण्याच्या सजेशन प्रोग्राम कराव्या लागतात
* त्याचबरोबर वर्गातील मुलं किंवा मित्र यांनी काही चिडवलं, इरिटेट केलं तरी त्याला इग्नोर करून फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे व डेव्हलपमेंटकडे लक्ष फोकस करण्याचं कंडिशनिंग केलं जातं
* इतर काही समयोचित प्रॉब्लेम समस्या जर असतील तर त्या जाणून घेऊन त्यामध्ये संमोहनाचा उपचार वापरता येतो
* एकंदरीत संमोहन उपचार हे अशा मुलांमध्ये पूरक उपचार पद्धती म्हणून अतिशय प्रभावीपणे वापरता येतात.. पालकांच्या व मुलांच्या संमतीने कोणतीहि अवाजवी फी न सांगता योग्य ती गुरुदक्षिणा फी घेऊन त्याचा उपयोग जरूर करावा..
* ( टीप: ऑटिझम व एपिलीपसी हे आजार वेगळे आहेतत् यावर हिप्नॉटिझमचा फारसा उपयोग होत नाही )
* धन्यवाद🙏
* लेखन व संकलन
* *विकास मनोहर नाईक*
* *हिप्नॉटिस्ट व क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट*
*