Manthan मंथन

Manthan मंथन Committed to the Wellness and well-being of the people.

01/05/2024

अहम्... आवाम्... वयम्।
‘मी‘ चा शोध, ‘आम्ही‘ ची घट्ट वीण, ‘आपण‘ चे भान.
स्वतः सोबत समाजाला जोडायचा सरळ साधा सोपा मार्ग! Great opportunity to connect with mind, body and soul!
या आत्मोन्नतीच्या प्रवासात व समाजाला जोडण्याच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर हा गृप जॅाइन करा. https://chat.whatsapp.com/LWWVQB1kxWH2jsgAgDgnDI

20/07/2023
21/06/2023

*चीट डे … एक बिझिनेस स्ट्रॅटेजी*
भारतीयांमधे lifestyle deseases चं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण त्यावरच एक संपूर्ण इंडस्ट्री उभी आहे! खरं नाही वाटत ना? Health and fitness शी संबंधित अनेक प्रॅाडक्ट्स, जिम व व्यायामावर उभी इंडस्ट्री, nutrients and health supplements industry, beauty products, fitness equipments, clothes and accessories, diet and health parameters related products यादी न संपणारी आहे.
*मुळात आरोग्य म्हणजे आजाराचा अभाव हीच चुकीची संकल्पना आहे*. शरीरस्वास्थ्य व मनःस्वास्थ्य याला परफेक्ट इंग्रजी शब्द नाही सापडला. स्वास्थ्य, संतूलन, आनंदी निरामय जीवन ही संकल्पना या मायाजालात हरवलेली वाटते. कुंटे सर सांगतात तसं *शरीरासाठी आयुर्वेद, मनासाठी योग, उपनिषदं व आत्म्यासाठी भारतीय अध्यात्म शास्त्र... ही भारतीय त्रिसूत्री* आपण केव्हाच बाद केली आहे. सगळ्यावर ‘गोळीबार’ (dependency on tablets) हाच एक उपाय! तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासि अशी आपली अवस्था आहे.
या बिझिनेस ने लावलेली सर्वात वाईट सवय म्हणजे चीट डे! सत्यानाश… 🤦‍♀️ आठवडाभर कडक डाएट करायचं आणि मग ‘reward’ म्हणून चीट डे. काहीही खा. कसंही वागा. आणि आठवड्याच्या मेहनतीवर बोळा फिरवा. *नक्की कोणाला चीट करायचं? आणि का? आठवडाभर healthy lifestyle फॅालो केल्याबद्दल स्वतःलाच फसवायचं? हे कसं रिवॅार्ड असू शकतं? I cheat myself with junk food to reward my act of healthy lifestyle ... so contradictory!*
आपल्या चीट डे वरच या इंडस्ट्रीचे गल्ले भरतात हे पण कळत नाही इतकी अक्कल गहाण टाकली आहे. आमच्या अर्चना देशपांडे, उमा गावडे, दिप्ती जोशी, मंजिरी आत्रे, स्वप्नील यांनी जर असे चीट डे केले असते तर १५-२० किलो वजन कमी झालंच नसतं. नशीब त्यांनी सरांना कधी विचारलं नाही cheat day कधी करू. नाहीतर ताबडतोब ‘कुंटे’ नावाला साजेसं उत्तर आणि सार्वजनिक कौतुक सोहळा झाला असता 😃😃
तर मुद्दा असा की आरोग्य, स्वास्थ्य हे विषय आधी समजून मग फिटनेसच्या मागे धावलो तर आपोआप मन व जीभही ताब्यात राहील आणि cheat day ची गरजच पडणार नाही. उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक. That's why *Mind programing with weight loss*.
So take charge of your health before these health industry giants make you a puppet and dictate the terms.
Aparna Gharpure,
Powai, Mumbai
9769920874

21/06/2023

शांत झोप न मिळाल्याने अनेक व्याधी मागे लागतात. आजच्या तणावपूर्ण वातावरणात ही मन:शांती कशी मिळवावी यासाठी कुंटे सरांचे online मार्गदर्शन घेऊ शकता. Whatsapp 9769920874 for appointment.

काहीतरी करायचंय.🤔.. क्या करें क्या ना करें ये कैसी मुश्किल हाय! कालच एका मैत्रिणीचा फोन आला होता.... भर दुपारी अडीच- तीन...
21/02/2023

काहीतरी करायचंय.🤔.. क्या करें क्या ना करें ये कैसी मुश्किल हाय!

कालच एका मैत्रिणीचा फोन आला होता.... भर दुपारी अडीच- तीन वाजता. ‘हाsssssssय! कशी आहेस? झोपली नव्हतीस ना गं?😴 दुपारची कामं आटपली... म्हटलं खूप दिवसांत बोलणं नाही झालं तर फोन लावूया‘
झोपेत असते तरी मी थोडंच हो म्हणणार होते 😀 मैत्रीचं नातं असतंच एकदम खास!
स्त्रीसुलभ गप्पा टाकल्या... अख्या जगाचं गॅासिप करून झालं 🤭 तरी बाईसाहेबांची वटवट चालूच...
‘अगं संध्याकाळी वॅाकला जातेस की नाही... मी हल्लीच सुरू केलंय‘ फोन आवरता घ्यायच्या हेतूने मी विषय फिरवला. तर .... ‘अगं ती तर एक गंमतच झाली....‘ 🙃 या वाक्यानंतर काय घडलं असेल? I'm sure you can imagine. स्पीकरवर फोन टाकून माझं आवरायला घेतलं आणि शेवटी हेडफोन्स वर बोलत बोलत 🚶‍♀️ वॅाकला बाहेर पडले. तिचं एकच वाक्य पुन्हा पुन्हा... काहीतरी करायचंय गं पण काय ते नक्की कळत नाहीये!

तुम्ही एक गोष्ट नोटिस केली का? आज अशा अनेक स्त्रियांना empty nest syndrome जाणवतोय... मुलं मोठी झाली, नवरा रात्री उशिरा घरी येतो... कामांसाठी बायका असतात, हातात भरपूर वेळ असतो पण घरातल्या कोणालाच रिकामा वेळ नाही. मुलांसाठी जॅाब सोडला... आता ४५-५० वयाला पुन्हा full time job नको वाटतो... यावर उपाय काय?
माझं शिक्षण, कला यांचा उपयोग करून मी एक नवी इनिंग सुरु केली तर? जमेल का? झेपेल का? घरचे साथ देतील का? हे आपलेच प्रश्न ... उगाचच शंका... खरंतर in most cases घरची मंडळी खूप सपोर्ट करतात पण पहिलं पाऊल तर मलाच पुढे टाकायचंय ना!
अशा मैत्रिणींसाठी एक खुषखबर... 💃
लवकरच Business ideas training program मुंबई व पुणे येथे होणार आहे. त्यात तुमच्या क्षमतेप्रमाणे काय वेगवेगळी कामं / व्यवसाय सुरू करता येईल, पूर्वतयारी, business grooming इत्यादी गोष्टी शिकवल्या जातील. फारसं भांडवल न टाकता अनेक व्यवसाय करता येतात. थोडं planning, आणि खूप सारा आत्मविश्वास मात्र हवा!
मग वाट कसली बघताय? नाव नोंदणीसाठी जरूर मला whatsapp message करा... Or just click on Manthan WhatsApp button and send the message.
Aparna Gharpure
9769920874

13/02/2023

#मार्गदर्शन #परीक्षा

गणेश पूजन व सरस्वती पूजनाला विद्यार्थी दशेत अनन्यसाधारण महत्त्व असतं. मनाची चंचलता, चलबिचल होऊ नये, शांत, स्थिर, ठामपणे पेपर लिहावा म्हणून त्या प्रभावी ठरतात. परीक्षेला जाताना देवाच्या व मोठ्यांच्या पाया पडतात ना.. तसंच काहीसं.
पूर्वी अशा प्रकारच्या क्रिया घरोघरी आजी आजोबा करून घेत होते. आता ही तुम्हाला संधी आहे की ... रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री सात ते दहा या वेळात online zoom session मध्ये.

खास विद्यार्थी व पालकांसाठी... तणावमुक्ती क्रिया व मेधावर्धन क्रिया - बुद्धीची देवता श्रीगणेश व विद्यादेवी सरस्वतीची आराधना ... सोबतच...
१. परीक्षेसाठी, confidence वाढविण्यासाठी techniques
२. टेन्शन दूर करून मन:शांती व उत्तम कामगिरीचा दृढनिश्चय
३. Dynamic writing technique द्वारे डोक्यातली उत्तरं झरझर पेनातून पेपरवर उतरवा.
४. ओंकार साधनांद्वारे मेंदूला vibrations देऊन चेतना जागवणे,
५. मुलांसोबत सुसंवाद साधावा म्हणून पालक व मुले एकत्र ही क्रिया करतात.
६. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री सात ते दहा या वेळात online zoom session. Fees Rs 1500.
Contact Aparna Gharpure at 9769920874 for registration.

20/01/2023

तुम्हाला स्मार्ट, चंट, हुषार, अष्टावधानी व्हायचंय का? अचंबित करणारे स्मरणशक्तीचे प्रयोग बघायचेत का? मग memory , बुद्धी व मानवी मेंदूचे चमत्कार बघायला नक्की या... *Brain Activation Training - amazing power of human brain - on Saturday 21 January at 9 pm IST *
https://us02web.zoom.us/j/88513831213?pwd=cVJ5eEh2L3VnaUpBeUJKY1kzZ1lUQT09
Meeting ID: 885 1383 1213
Passcode 141426
This session is open for all. Please share the link with your friends and relatives. All are welcome.
Aparna Gharpure
9769920874.

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Join us to become a Certified Voice Culture trainer! *व्हॅाइस कल्चरचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन सर्टिफाईड प्रशिक्षक बना*....
14/01/2023

Join us to become a Certified Voice Culture trainer! *व्हॅाइस कल्चरचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन सर्टिफाईड प्रशिक्षक बना*. विद्यार्थी, युवक व वृद्धांसाठी, शिक्षक, कलाकार वा गायकांसाठी तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा! एप्रिल च्या वर्गासाठी खास सवलत... Contact 9769920874 for registration.
#स्वरसाधना

एकंदरितच ग्रहदोष या विषयावर अनेक समज गैरसमज समाजात पसरलेले दिसतात. मंगळ ग्रह दर ४५ दिवसांनी पुढच्या राशीत प्रवेश करतो. त...
28/12/2022

एकंदरितच ग्रहदोष या विषयावर अनेक समज गैरसमज समाजात पसरलेले दिसतात. मंगळ ग्रह दर ४५ दिवसांनी पुढच्या राशीत प्रवेश करतो. त्याचे बरे-वाईट परिणाम मानवी जीवनावर व मनावर होतच असतात.... अगदी ‘पत्रिकेत‘ मंगळ नसला तरीसुद्धा! त्याची प्रचंड भीती पसरवून उपाय म्हणून भरपूर दक्षिणा उकळणे, कर्मकांडात अडकवून ठेवणे किंवा ते गैरसमज दूर करून त्रास कमी करण्यासाठी मनोबल वाढवणे ... तुम्हाला काय योग्य वाटतं? जर अगदी माफक वर्गणी देऊन तुम्ही त्या मानस क्रिया स्वतः शिकू शकलात तर भविष्यात सुद्धा ते ज्ञान उपयोगी पडणार नाही का? मंगळ-दोष निवारण क्रिया मंगळवारी १० जानेवारी रोजी रात्री सात ते नऊ या वेळात असेल. दक्षिणा मूल्य प्रत्येकी ५००/- रूपये. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क सौ अपर्णा घारपुरे 9769920874.

Address

Mumbai

Telephone

+917304920874

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manthan मंथन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Manthan मंथन:

Share