14/01/2025
🌞 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾
मकरसंक्रांती हा सण आरोग्यदृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तिळगूळ देण्याची परंपरा केवळ सण साजरा करण्यापुरती नाही, तर त्यामागे आयुर्वेदाचा सुद्धा एक विचार आहे.
➡️ पांढरे तीळ -
▫️तीळ शरीराला उष्णता आणि ऊर्जा प्रदान करतात.
▫️हाडे मजबूत करणे, त्वचेचा पोत सुधारणे, व केसांचे आरोग्य टिकवणे यासाठी उपयुक्त.
▫️यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, आणि लोह मुबलक प्रमाणात असते.
➡️ गूळ -
▫️गूळ पचन सुधारतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो.
▫️थंड हवामानात शरीराला उष्णता देतो.
▫️यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असून, रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे.
🪷 आयुर्वेदानुसार तिळगूळ एकत्र सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच, तिळगुळ खा आणि गोड गोड बोला ही परंपरा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
🪷 या मकरसंक्रांतीला तिळगूळ खा, आनंदी राहा आणि गोड संवाद साधा! 🪷 आरोग्यदायी सण साजरा करा!
Dr. Tejas Vasant Lokhande's
🪷 Aarogyasoukhya 🪷
Ayurved | Panchakarma | Numerology
9619065500 | 7506105125
https://www.instagram.com/reel/DEyvQKVOat6/?igsh=MWdzb3RndGxjdGZoNQ==
#मकरसंक्रांती #आयुर्वेद #तीळगूळ