
04/01/2023
24 डिसेंबर 2022 पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे मंत्रमुग्ध वातावरण आणि समाजाच्या स्नेहबंधनात अडकलेल्या डॉ निखिल या व्यक्तिमत्वाचा प्रेमपूर्वक आदर वृद्धिंगत झाला होता.
गर्भपात कायद्यात बदल, हे एक शिवधनुष्य होते, ते उचलण्याचा जिकीरीचा निर्णय डॉ.निखिल दातार यांनी अनेक वर्षांपूर्वी घेतला. या लढाईत सातत्य ठेवले. अनेक अबलांसाठी आशेचा मार्ग निर्माण केला. सदर पुस्तकातील हा सर्व प्रवास रोमांचक आहे.
या पुस्तकाच्या कुपीत दडलेला स्नेह आणि कर्तव्याचा दरवळ आपल्या हृदयावर केव्हा स्वार होतो याची अनुभूती-- अहाहा काय वर्णावी. याचा प्रत्यय आपण प्रत्येकाने घ्यावा.
कसलाही आडपडदा न ठेवता, शास्त्र आणि भावना यांचा समतोल साधत केलेले उत्कृष्ट लेखन -- शब्दातीत 🌹.
डॉ. स्मिता आणि आणि डॉ. निखिल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे 🌷🌷
हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशन, अमेझाॅन, पुस्तक विक्रेते यांच्याकडे उपलब्ध आहे.