17/03/2023
वाचा अन इतरांनाही सांगा
द्राक्ष वरती जो पांढरा थर असतो तो औषधांचा असतो आणि ते खाल्ल्याने सर्व आजारी पडत आहेत अश्या अफवा खाली मेसेज फ्रॉम डॉक्टर असे लिहून व्हॉट्सॲप विद्यापीठ मध्ये पसरत आहेत.
विशेष म्हणजे हे मेसेज चांगले शिकलेले जबाबदार व्यक्ती सुद्धा व्हायरल करत आहे याचं आश्चर्य वाटत.
पहिला मुद्दा द्राक्ष वरील पांढरा थर हा नैसर्गिकरीत्या फळांचे रक्षण करण्यासाठी तयार होत असतो त्याला ब्लूम असे म्हणतात
मार्केट मध्ये तो थर काढलेला असल्यास द्राक्ष ला कमी भाव मिळतो.कारण तो थर काढला की द्राक्ष जास्त वेळ चांगली राहत नाही,लवकर खराब होतात.
दुसरा मुद्दा म्हणजे
सध्या सगळीकडेच ताप आणि खोकला ची लाट सुरू आहे ती
साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात वातावरणातील बदलामुळे व्हायरल रोगांची साथ येते त्यामुळे आहे व
सध्या जी लक्षणे दिसत आहेत ती H3N2 या व्हायरस ची आहेत असे
ICMR आणि NCDC ने जाहीर केलं आहे..
याउलट
द्राक्षांमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे सर्दी आणि फ्लूसह अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात.
त्यामुळे अफवा पसरवू नका बिनधास्त आवर्जून द्राक्ष खा 🍇
#पोस्ट_साभार
#गणेश_अप्पासाहेब_सहाणे