Yogayurved

Yogayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogayurved, Health/Medical/ Pharmaceuticals, Mumbai.

*राममंदिर - एक रक्तरंजीत इतिहास..*राम मंदिर विषय तसा खुप मोठा नाहीच.. कारण या हिन्दुस्थानात अनेक ठिकाणी राम मंदिर असतील....
13/01/2024

*राममंदिर - एक रक्तरंजीत इतिहास..*

राम मंदिर विषय तसा खुप मोठा नाहीच.. कारण या हिन्दुस्थानात अनेक ठिकाणी राम मंदिर असतील.. प्राचीन असतील.. नवीनही असतील.. पण श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिर म्हटले की जणु काळीज चर चर कापल्याची जाणीव होते.. मग नक्की हा केवळ आस्थेचाच विषय आहे का..? तर मुळीच नाही.. कारण विषय जर फक्त आस्थेचा असेल तर या राष्ट्रातील कोणत्याही भूमिवर शेकडो एकरात भव्य मंदिर केव्हाच बांधले गेले असते.. केली असती तेथे पुजा अर्चा.. मग अयोध्याच का..?

आयोध्यामधे प्रभु रामचंद्राचा जन्म झाला किंबहुना त्यांच्या पुढील पिढ्या ही येथे वाढल्या.. अशा या पवित्र भूमित त्यांचे भव्य मंदिर असावे.. कदाचित ही समस्त हिन्दूजणांची आस्था होऊ शकते.. पण हा विषय खरोखर केवळ आस्थेपुरता मर्यादित आहे का..? आणि तो ठेवला का..? तर मी म्हणेल नाही..! हा विषय केवळ आस्थापुरता मर्यादित होऊच शकत नाही.. भगवान सर्वत्र आहेत ही हिन्दूची धारणा आहे.. पण अयोध्यासाठीच अट्टहास का..? कशासाठी..? आज यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे..

आज हिन्दू राममंदिराचा विचार करत असेल तर तो बाबरी ढांचाचे पतन अर्थात १९९२ पासून.. पण हा संघर्ष केवळ १९९२ पासूनचाच होता का..? तर नाही.. शेकडो वर्षांचा हा लढा.. लाखों राम भक्तांचे बलिदान.. त्यातून साकार होत असलेले हे शिल्प किती रक्तरंजित खुणांवर पाऊल ठेवत आले आहे.. याचा केलेला हा लेखाजोखा.. हा लेख त्या हिन्दूकडे अधिक निर्देश करील ज्यांना इतिहासाचे स्मरण नसेल.. मग हे राम मंदिर कशासाठी असा ही प्रश्न पडत असेल.. आत्मविस्मृत झालेल्या हिंदूंची केवळ आस्थाच नव्हे तर स्वाभिमान ही जागा व्हावा.. आणि अजूनही काही आव्हाने पुर्णत्वास नेण्यास हा निद्रिस्त समाज उत्थान करून सज्ज व्हावा.. याचसाठी पुन्हा पेटवलेले हे यज्ञकुंड.. या यज्ञकुंडात आजवर किती समिधा वाहिल्या गेल्या त्याची ही यशोगाथा..

धार्मिक मान्यतेनुसार हिन्दुचे आराध्य दैवत प्रभु रामचंद्र यांचे पुत्र कुश यांनी शरयू नदीच्या तटावर भव्य अशा राममदिरांचे निर्माण केले.. अनेक वर्षे नव्हे तर अनेक शतके हिन्दूचे ते श्रद्धास्थान ठरले..

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
पुरी द्वारकावती चैव सप्तैता मोक्षदायिका ।।

अशा प्रकारे हिंदूंच्या सात आस्था केंद्रातील प्रथम श्रद्धास्थान ती हिच आयोध्या नगरी..

आयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिर ध्वस्त करण्यासाठी बाबर हा एकमेव इस्लामी आक्रांता आला असे नव्हे तर.. त्या अगोदरही या मंदिरावर अनेक कट्टर इस्लामवाद्यांची वक्रदृष्टि होती.. त्यात प्रथम प्रयत्न केला तो १४४० साली महमूदशाहने परंतु त्याला त्यात काही यश मिळाले नाही.. राजा सुहेलदेव ने वाटेतच त्याचा खात्मा केला.. आणि मंदिर रक्षणाची जबाबदारी पार पाडली.. त्यानंतर राम जन्मभूमि रक्षणासाठी कालानुक्रमे सुमारे ७६ वेळा महायुद्ध झाली.. लाखो लोकांनी, संत महंत आणि शेकडो सम्राटानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.. आज हाच ज्वलंत इतिहास मांडण्याचा केलेला प्रयत्न..

कालखंड होता १५२६ चा इस्लामी रियासत स्थापन करण्याची मंशा घेऊन उज्बेगिस्तानमधून सुमारे पाच- साडे पाच लाख सैन्य घेऊन जहरुद्दीन मुहम्मद बाबर हिंदुस्थानच्या भूमिवर उतरला.. बाबर म्हणजे इस्लामवादाचा कट्टर पुरस्कर्ता.. वाटेत अनन्य अत्याचार करत तो मेवाडला येऊन पोहोचला.. मेवाडचे साम्राज्य म्हणजे हिंदुस्थानचे जणु सरताज.. धर्माच्या बाबतीत तितकेच कट्टर.. तत्कालीन काळात मेवाडचे महाराजा होते राणा संग्रामसिंह अर्थात राणा सांग.. बाबरचा पहिला यशस्वी मुकाबला केला तर तो याच राणा सांग ने.. तब्बल तीन वेळा राणा सांग कडून बाबरला धुळ खावी लागली.. अपमानित होऊन बाबर अवधपुर म्हणजे अयोध्याच्या दिशेने पळत सुटला.. मनात सुडाची भावना होतीच.. ती शमवणे त्याला गरजेचे वाटू लागले होते..

बाबरच्या सैन्याचे मनोधैर्य खचले होते.. एखादा विजय हवा म्हणून त्याने याच प्रभू श्रीरामाच्या अयोध्यावर आक्रमण केले.. बाबर अयोध्यावर चाल करून तेथील तत्कालीन व्यवस्था नष्ट करून अयोध्येच्या गादिवर बसला.. सुडाची आग मात्र धगधगत होती.. याच काळात अयोध्या भूमि श्यामानंद महाराज यांच्या अधीन होती.. श्यामनंद महाराज म्हणजे प्रख्यात आध्यात्मिक वारसा असलेले महागुरु.. त्यांची ख्याती ऐकून इस्लामी फकीर ख्वाजा कजल अब्बास मूसा हा त्यांचा शिष्य बनला.. कालांतराने त्याचीही कीर्ति होऊ लागली.. काही वर्षात जलालशाह नावाचा कट्टर इस्लामवादीही श्यामानंद महाराजांचे शिष्य बनले.. हे दोघे जरी वर वर शिष्य असले तरी येथील राम मंदिर मात्र नेहमी त्यांच्या डोळ्यात सलत होते..

काही दिवस असेच गेले या दोघांनी संगनमत करून मक्का प्रमाणे इथे भव्य इस्लामी केंद्रबिंदु व्हावे असा चंग बांधला.. त्यातील योजनांचा काही भाग म्हणून राम मंदिराच्या आजुबाजुच्या जमिनीत त्यांनी मृत मुसलमान लोकांचे दफन करण्यास सुरवात केली.. अल्पावधीत या भूमिचे एका कब्रस्तानमधे रूपांतर झाले.. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर दोघांनी मिळून बाबरची भेट घेतली आणि येथील मंदिर पाडून मस्जिद उभारण्याची इच्छा व्यक्त केली..

बाबर आधीच सुड भावनेने पेटला होताच.. त्यात अजुन भर पडली.. हा बदला घेण्यासाठी आणि हिंदूंची आस्था नेस्तनाबूत करण्यासाठी त्याने आपला मोर्चा राम मंदिराकडे वळवला.. आपल्या शिष्यांचे हे कारस्थान पाहून श्यामनंद महाराज व्यथित झाले.. मूर्तीचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.. असा विचार करून मध्यरात्रीच त्यांनी या काळ्या पाषाणातिल सुबक मूर्ती शरयु नदीत विसर्जित केल्या आणि ते अज्ञातवासात निघुन गेले.. मंदिराच्या रक्षणासाठी पाच सहा शिष्य द्वारावर ठेवले.. जलालखान ने या सर्व पुजाऱ्यांची हत्या केली.. आणि राम मंदिर उध्वस्त करण्याचा मार्ग मोकळा केला.. हे ठरले राम मंदिर रक्षणाचे पहिले बळी..

बाबरची वक्रदृष्टी आयोध्येतील प्रभु राम मंदिरावर पडली आहे याची पहिली भनक लागली ती भीटीचे राजे राजा महतबसिंह बद्रीनारायण यांना.. मंदिराच्या रक्षणासाठी ते स्वतः सुमारे १ लाख ७४ हजार सैन्य घेऊन आयोध्येस पोहोचले.. बाबरच्या ४ लाख ५० हजार सैन्यावर हे तूटून पडले.. पण दुर्दैवाने बाबरच्या बलाढ्य सैन्यापुढे महतबसिंहच्या सैन्याचा पाडाव झाला.. तब्बल ७० दिवस चाललेल्या या युद्धात त्यांच्यासकट सर्व सैन्य कापले गेले.. राम मंदिर रक्षणासाठी ठरलेले हे दुसरे बलिदान होय..

बाबर किती क्रूरकर्मा होता..? तर पुढील घटनेवरुन लक्षात येईल.. बाबरच्या अंगात जणु सैतानच घुसला होता.. २१ मार्च १५२८ रोजी या बाबर ने मीर बांकी या आपल्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली चारी बाजूने तोफा लावून मंदिर उध्वस्त केले.. बाबर एवढ्यावरच थांबला नाही तर मस्जिदसाठी बनवलेल्या विटामधे त्याने पाण्याऐवजी त्यांच्याच रक्ताचा वापर केला.. ही पवित्र अयोध्या किती रक्ताने रंगली असेल यावरून त्याची कल्पना येईल..

राम मंदिरासाठी लढा आणि संघर्ष ही तर याची केवळ मुहूर्तमेढ होती.. कोणत्याही परिस्थितीत राम मंदिर पुन्हा उभे राहिले पाहिजे यासाठी या संघर्षाची कहानी पुन्हा सुरु झाली.. प्रभु रामचंद्राची भूमि अशा पद्धतीने अपवित्र व्हावी.. हे आसपासच्या गांवाना सहन झाले नाही.. आमचे पूर्वज महर्षि भरद्वाज होते.. त्यांच्या श्रद्धास्थानाचे अशा रीतीने विटबंन व्हायला नको होते.. या जानिवेतुन देवीदास पाण्डेय यांनी आसपासच्या गावातील लोकांमधे नवी स्फूर्ति, नवी चेतना भरली आणि ९० हजारांची फौज निर्माण केली.. ५ दिवस हे युद्ध अहोरात्र चालले.. पण फितूरीने घात केला.. या युद्धाचे नेतृत्व करणाऱ्या देवीदास पाण्डेय यांना त्यांच्याच अंगरक्षकाने विट फेकून मारली.. आणि घायाळ केले.. ही संधी साधुन मीर बांकीने अचूक नेम धरला आणि त्याच्या बंदूकीच्या गोळ्या देवीदास यांच्या छातीत घुसल्या.. या ९० हजार सैन्यांच्या रक्ताची समिधा पुन्हा एकदा स्वाभिमानासाठी वाहिली गेली.. राम मंदिरासाठी हे तीसरे समर्पण ठरले..

संघर्ष संपला नाही.. ही तर जणू सुरवात होती.. कारण देवीदास यांच्या बलिदानानंतर अवघ्या १५ दिवसातच हंसवरचे महाराज रणविजय सिंह यांनी केवळ २५ हजार सैन्य घेऊन बाबरच्या सैन्यावर हल्ला चढवला.. १० दिवस हे युद्ध चालले त्यात महाराज रणविजय सिंह धारातीर्थी पडले आणि हे २५ हजार सैन्य पुन्हा कापले गेले.. राम मंदिरासाठी हे चौथे शिरकाण ठरले होते..

आपल्या पतिचा बदला आणि आराध्य दैवताची होत असलेली उपेक्षा पाहून रणविजय सिंहाची पत्नी जयराज कुमारी मैदानात उतरली.. तीने ३ हजार लढाऊ स्रियांची पलटन तयार केली.. सोबत स्वामी महेश्वरानंद यांनीही २४ हजार चिमटाधारी संन्याशाचे दल तयार केले आणि अयोध्येवर १० वेळा आक्रमण केले.. यावेळी अयोध्येच्या गादीवर होता तो हुमायूं.. या युद्धात जयराज कुमारीने हुमायुवर विजय मिळवला.. पण तो विजय फार काळ टिकला नाही.. हुमायुने एक महिन्यातच पुन्हा सर्व शक्तिनिशी प्रतीहल्ला केला.. त्यात जयराज कुमारीसह २८ हजार सैन्य मारले गेले.. आत्मसन्मासाठी हे पाचवे प्राणाचे पुष्प वाहिले गेले होते..

हा संघर्ष काही काळ स्थिर राहिला.. पण बदल्याची भावना शांत झाली नव्हती.. हुमायु नंतर अकबर सत्तेवर आला.. शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून अकबरने ३ फुटाचे छोटे मंदिर बनवले.. पण ते समाधानकारक नव्हतेच.. कारण हे मुस्लिम वेळोवेळी जन्मभूमीची जागा अपवित्र करू लागले.. या जानिवेतुन स्वामी बलरामचारी यांनी पुन्हा लढा द्यायचे ठरवले.. यासाठी त्यांनी आदिवासी, भिल्ल, क्षत्रिय, ब्राह्मण, सन्याशी अशा सर्व प्रकारच्या लोकांचे एकत्रितकरण केले आणि अयोध्येवर २० वेळा आक्रमण केले यात त्याने १५ वेळा विजय मिळवला.. शेवटी त्यांनाही या मंदिरासाठी आपले बलिदान द्यावे लागले.. बलिदानाचे हे सहावे सत्र होते..

अकबरच्या काळात छोटी मोठी बलिदानाची सत्र चालूच होती.. त्यानंतर शाहजहाँन सत्तेवर आला.. या ही काळात छोटे मोठे छुपे हल्ले होतच राहिले.. पण योग्य नेतृत्व करणारे कोणी लाभले नाही..! म्हणून हे दोन कालखंड पुन्हा नोंद घ्यावी असे ठरले नाहीत.. हा कालखंड साधारणपणे १५३० ते १५५६ पर्यंतचा होता.. तरीही या काळात १० वेळा या राम मंदिरासाठी युद्ध झाल्याची नोंद आहे.. ही सातव्या बलिदानाची यशोगाथा होती..

आपल्या सर्व जवळच्या नातलगांची हत्या करून १६५८ च्या आसपास औरंगजेब सत्तेवर आला.. इस्लामचा खंदा पुरस्कर्ता आणि एक क्रूरकर्मा शासक अशीच त्याची ख्याति होती.. गादीवर येताच त्याने अयोध्येतील सर्व मंदिरे उध्वस्त करण्याचे आदेश दिले.. आणि क्षणात त्याची अमलबजावनीही झाली.. समर्थ गुरु रामदास स्वामी यांचे शिष्य वैष्णवदास यांच्या मात्र ते चांगल्याच जिव्हारी लागले.. त्यांच्या नेतृत्वाखाली चिमटाधारी संन्याशाची फौज उभी राहिली.. त्याने सुमारे ३० वेळा राममंदीरासाठी औरंगजेब सारख्या बलाढ्य शत्रुवर आक्रमण केले.. पण एवढ्या बलाढ्य शक्तिपुढे यांचा निभाव लागणे शक्य नव्हते.. या युद्धात सरदार गजराज सिंह, राजेपुरचे महाराजा कुंवर गोपालसिंह, सिसिण्डाचे ठाकुर जगदंबा सिंह सगळे मारले गेले.. याच वेळी या भागातील अनेक आदिवासी राजपूत जमातीतील समाजाने शपथ घेतली.. जोपर्यंत राम मंदिर निर्माण होणार नाही.. तोपर्यंत पायात पादत्राण आणि डोक्यावर पगडी घालनार नाही.. आजही फैजापुर, जौनपुर आणि आजुबाजुच्या जिल्ह्यातील काही जमाती ते तत्व पाळत आहेत.. अशा प्रकारे आठव्यांदा सामुहिक प्राणाची आहुति देण्यात आली..

सन १६६० च्या काळात औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिलेले पाहून त्याने जाबांज खान याच्या नेतृत्वाखाली हजारो सैन्य अयोध्येवर आक्रमणासाठी पाठवले.. मन हेलाऊन टाकनारा तो प्रसंग.. लहान मुले, स्रियां, वृद्ध कशाचीही मुलाहिजा केली गेली नाही.. यावेळी पुन्हा धावून आले ते बाबा वैष्णवदास महाराज.. अल्प काळात त्याने साधु संन्याशाची फौज उभी केली.. हा संग्राम उर्वशी कुड या ठिकाणी झाला.. पण बाबा वैष्णवदासला यश आले नाही.. आणि सर्व भगवाधारी प्रभु रामासाठी हुतात्मा झाले.. हे नववे रक्तसिंचन होते..

सुड घेण्याची भावना अधिकच तीव्र होत होती.. यातूनच १७६३ साली अमेठीचे राजा गुरुदत्त सिंह आणि पीपरपुर चे राजे कुमार सिंह यांनी पुन्हा सन्याशी आणि आजूबाजूच्या खेड्यातील सामान्य जनता यांना सोबत घेऊन ५ वेळा अयोध्येवर चाल केली.. पाचव्या वेळी मात्र त्यांनी निर्णायक विजय मिळवला आणि विवादित जागी पुन्हा श्रीरामाच्या मूर्तिची स्थापना केली..

१७६४ च्या सुमारास औरंगजेब ने पुन्हा अयोध्येवर हल्ला चढवला.. यात १० हजार हिन्दूची हत्या झाली.. अयोध्या भूमि रक्ताने लाल झाली.. याच राम मंदिर जवळ कंदर्पकूप नावाची एक विहीर होती.. औरंगजेब ने ही सर्व प्रेत या विहीरीत टाकून बाजूने मोठी भींत बांधली.. आणि त्यास नाव दिले 'गज शहीदा'.. एवढे होऊनही हिन्दू शमला नाही.. प्राणाची पर्वा न करता तेथेच राम नवमी साजरी करण्यास सुरवात केली..

१६८० साली शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह आणि बाबा वैष्णवदास यांनी श्रीराम जन्मभूमिवर पुन्हा अधिकार मिळवण्यासाठी नव्याने सैन्य निर्माण केले आणि अयोध्येवर हल्ला चढविला.. अयोध्येवर विजयही प्राप्त केला.. पण मंदिर निर्माण करण्याआधीच त्यांना पुन्हा पराभव स्वीकारावा लागला..

पुढील काही काळातच ब्रिटिश सरकार सत्तेवर साले आणि हिंदुस्थानवर एक हाती हुकूमत सुरु झाली.. या ही काळात राम मंदिर साठी संघर्ष झाला नाही असे नाही.. पण तो थोपवन्यात ब्रिटिश सरकारला यश आले असे म्हणता येईल.. कारण १८५३ मधे हिन्दू मुस्लिम यांच्यात ज्या प्रकारच्या दंगली उसळल्या त्या शमविन्यासाठी आतील बाजूत मुस्लिम आणि बाहेर हिन्दू समुदायास पुजा करण्याची अनुमती या ब्रिटीश सरकारकडून दिली गेली.
पुढे २५ मे १८८५ साली रघुवर दास यांनी राम जन्मभूमी अधिकारासाठी ब्रिटिश कोर्टात अपील दाखल केली.. पण त्यांच्या प्रयत्नास फारसे यश आले नाही.. कारण परिस्थिति जैसे थे च राहिली..

१९३४ साली पुन्हा हिन्दू मुसलमान दंगे झाले.. या वेळी हिन्दू समाज इतका आक्रमक झाला की चार दिवसात त्यांनी बाबरी मस्जिद आपल्या ताब्यात घेतली आणि तेथे श्रीरामाची मूर्ति स्थापन केली.. तेंव्हापासून या मस्जिदीत कधीही मुस्लिम नमाज साठी फिरकले नाहीत..

१९४७ साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला त्याच बरोबर धर्माच्या आधारावर देशाची फाळणी सुद्धा झाली.. कट्टर इस्लामवादाचा पुरस्कर्ता जीना यांच्या प्रयत्नातुन स्वतंत्र इस्लामी राष्ट्र पाकिस्तान उदयास आले.. राहिला तो हिंदूंचा हिंदुस्थान.. आता राममंदिर निर्माणचा मार्ग मोकळा झाला, अशीच श्रीराम भक्ताची धारणा होती.. त्यातून ५ डीसेम्बर १९५० साली महंत परमहंस रामचंद्र दास यांनी विवादित क्षेत्रात पुन्हा प्रभु रामचंद्राची मूर्ति स्थापन करण्यासाठी कोर्टात जनहित याचिका दाखल केली.. त्यावेळी मात्र फैजाबाद जिल्हा न्यायालयाने विवादित क्षेत्र हिंदुना पुजाअर्चा साठी खुले व्हावे असे आदेश दिले.. देश स्वतंत्र झाला खरा.. पण प्रभु रामचंद्राचा वनवास मात्र अजुन संपला नव्हता..

मध्यांतरीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक नवी हिन्दू शक्ति उदयास आली होती.. त्यातून विश्व हिंदू परिषद अस्तित्वात आली आणि श्रीराम मंदिर निर्माण मुद्दा त्यांनी अधिक आक्रमक केला.. सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही पण विश्व हिंदू परिषदेचे असंख्य कार्यकर्ते, अनेक संत महंत यांनी राम मंदिर मुद्दा उचलून धरला..

याचे पडसाद म्हणून १९७७ साली अयोध्येत खोदकाम सुरु झाले.. हे खोदकाम निपक्षपातीपणे व्हावे म्हणून एक समिति स्थापन केली त्यात सरकारी अधिकारी, हिन्दू, मुस्लिम, महंत असे सगळ्या प्रकारचे सामिल होते.. त्यात हिन्दू अधिकारी बी. बी. लाल तर मुस्लिम अधिकारी के.के. मोहम्मद यांचा प्रमुख समावेश होता.. हे खोदकाम करत असताना असे १४ खांब मिळाले की ज्यावर अनेक देवी देवतांची चित्रे कोरलेली होती.. येथे पूर्वी राम मंदिर होते याचा हा भक्कम पुरावा होता..

पहिला टप्पा संपल्यावर पुन्हा खोदकाम हाती घेण्यात आले यावेळी नेतृत्व करत होते ते ड़ॉ. बी. आर. मनी.. यावेळी विवादित जागेवर पुन्हा ८४ खांब आढळून आले..

१९८६ साली फैजाबाद जिल्हा न्यायालयात पुन्हा जनहित याचिका दाखल करण्यात आली.. या वेळी प्रथमच कोर्टाने हिन्दू धर्मियांना विवादित क्षेत्रात पुजा करण्यास परवानगी दिली.. श्रीराम मंदिर निर्माण निर्णयाबाबत मात्र जैसे थे परिस्थिती ठेवली.

३० सप्टेंबर १९८९ पासून विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वाखाली राम शिला पूजन यात्रा काढण्यात आली.. यात अनेक दिग्गज कार्यकर्ते सामिल झाले.. त्यातून प्रकरण अधिकच आक्रमक बनले.. यात आकडेवारी नुसार ३ लाख गांव आणि ११ कोटी लोकांचा सहभाग नोंदविला गेला..

१९९० साली कारसेवा समिति स्थापन करण्यात आली.. या समितीच्या नेतृत्वाखाली सोमनाथ ते अयोध्या अशी राम रथ यात्रा काढण्यात आली.. या रथ यात्रेत देशभरातून सुमारे ८ लाख कारसेवक सहभागी झाले होते.. अयोध्येला पोहचण्यापुर्वीच अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.. कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला यात किती मुत्युमुखी पडले याचा अधिकृत आकड़ा उघड़ केला नाही.. हजारो कारसेवक यावेळी जखमी झाले होते..

१९९१ साली पुन्हा सुमारे २५ लाख कारसेवकांनी श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माणसाठी आंदोलन उभारले.. या वेळीही दोन वेळा गोळीबार करण्यात आला.. यात कित्येक जण मृत्युमुखी पडले..

२ डिसेम्बर १९९० उत्तर प्रदेश सरकार मुलायम सिंह यादव यानी वचन देऊनही कारसेवकांवर बेछूट गोळीबार केला.. श्रीराम भक्ताना जितके दाबण्याच्या प्रयत्न केला जात होता तितकीच त्यांची भावना अधिक उफाळून येत होती.. वास्तविक पाहता स्वतंत्र हिन्दुस्थानात हे लज्जास्पदच म्हणावे लागेल.. आजवर समोर असणाऱ्या शत्रुशी लढल्याची यशोगाथा होती तर आता स्वकियांशी झुंज देण्याची कर्म कहानी होती.. मुठभर मतांच्या पोडगीसाठी हिंदुनी हिंदुशी धरलेले हे वैर होते.. हीच मोठी शोकांतिका होती..

३ डिसेम्बर १९९२ साली पुन्हा ३ लाख कारसेवक अयोध्येच्या दिशेने कुच झाले.. यावेळी मात्र आक्रोश अधिकच उफाळून आला होता..
६ डिसेम्बर १९९२ रोजी पोलिस बंदोबस्ताला न जुमानता.. प्राणाची पर्वा न करता हजारो कारसेवक बाबरी ढाच्यावर चढले आणि ५०० वर्षाचा जहरी कलंक पुसत काही क्षणात बाबरी ढांचा जमीनोदोस्त केला.. स्वतःच्या भूमित, स्वतःच्या राष्ट्रात अशा प्रकारे संघर्ष करायला लागावा ही तर इतिहासातील मोठी शोकांतिका होती.. आपलेच आपले वैरी बनले होते.. इथे रावण एक नव्हता तर असंख्य होते..

शेवटचे बलिदान ठरले ते २७ फेब्रुवरी २००२ साली.. अयोध्येकड़ून अहमदाबादकडे येणाऱ्या साबरमती एक्सप्रेस वर अज्ञात हल्लेखोंरानी हल्ला केला.. या एक्सप्रेसमधे २००० च्या आसपास कारसेवक बसले होते.. पूर्व नियोजित कट करून एक्सप्रेसच्या काही बोगी पेटवण्यात आल्या.. त्यात ६० च्या आसपास कारसेवक होरपळून निघाले.. याची ही नोंद असणे गरजेचे वाटते..

राम भक्तांचे कार्य इथे संपले नव्हते.. येथून पुढे सुरु होते ती न्यायालयीन लढाई..१९९२ ते २०१९ पर्यंत राम जन्मभूमि खटला अधिकच रंगत गेला.. अगदी राम कल्पनिक चरित्र आहे.. इथपर्यंत मजल गेली.. तब्बल तीन दशके ही न्यायालयीन लढाई चालू राहिली.. आणि या लढाईचा गोड अंत झाला तो ९ नोव्हेम्बर २०१९ ला.. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की विवादित क्षेत्र ही श्रीराम जन्मभूमिच होती.. तिथे हिन्दूचे अस्थाकेन्द्र असलेल्या राम मंदिराचे पुन्हा निर्माण व्हावे.. तो क्षण म्हणजे ५०० वर्षाच्या संघर्षाचा अभूतपूर्व विजय होता.. हा ऐतिहासिक विजय बहाल केला नव्हता तर तो मिळवला होता..

५ ऑगस्ट २०२० हाच तो मंगल दिवस.. लाखो राम भक्तांच्या बलिदानाचे सार्थक ठरलेला क्षण.. अर्थात भव्य राम मंदिर निर्माण साठी झालेले भूमिपूजन.. एका डोळ्यात आनंद तर एका डोळ्यात अश्रु असा तो भावनाविवश क्षण.. कारसेवकांच्या रूपाने अनेक यातना भोगलेल्या कार्यकर्त्यांचे स्वप्न साकार झाल्याचा हा क्षण.. गेली पाच सहा शतके लाखो हिंदूंच्या त्या विजयी गाथेचे सार्थक होत असलेला हा क्षण..

शेकडो वर्षाच्या बलिदानाच्या पायावर दिमाखात उभे राहिलेले हे मंदीर केवळ श्रीराम मंदीर नाही तर ते या देशाचे राष्ट्रामंदीरही आहे.. केवळ आस्थाच नव्हे तर येथील घुमणारा घंटानादही त्याग आणि समर्पणाचा इतिहास सांगेन.. २२ जानेवारी २०२४ (सोमवार, पौष शुद्ध द्वादशी, शके १९४५) रोजी या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या मंदीराची प्राणप्रतिष्ठा होत आहे.. आणि आपण सारे या मंगल प्रसंगाचे साक्षीदार होत आहोत..

इतिहास साक्षीदार आहे.. रणांगणाचा यज्ञकुंड करून प्राणाची आहुति देण्याचा जीवघेणा खेळ वर्षानुवर्षे खेळला जातोय तो याच भूमित.. कशासाठी ही प्राण देण्याची स्पर्धा तर स्वतःसाठी नव्हे तर स्वत्वासाठी.. कधी या भूमिचे, कधी धर्माचे, कधी राष्ट्राचे, तर कधी अस्मियतेचे संरक्षण करण्यासाठी.. याच कारणासाठी ही भूमि सदैव रक्तरंजित राहिली.. जेथे नरच नव्हे तर नारीही हातात शस्र घेऊन लाखोंच्या शत्रुवर तुटुन पडू शकते.. अशी ऐत्याहासिक उदाहरणे प्रेरणा म्हणून ठेवली जातात ती याच भूमित.. अशा भूमिचा भूमिपुत्र जेंव्हा स्वार्थ बुद्धिने फितूर होऊन प्रश्न उभा करतो.. अशावेळी.. नेत्रात अंगार टाकून त्यांची झापडे उघडी करावीच लागतात..

प्रस्तुत लेख लिहताना संघर्षाच्या उत्तरार्धाची लेखात फारसी नोंद केली नाही.. कदाचित त्याकडे राजकीय वक्रदृष्टितुन पाहिले जाईल.. किंबहुना आज अनेक जण त्याचे साक्षिदारही असतील.. हा विजय म्हणजे समस्त हिन्दूचा विजय आहे.. कारण जे लढले.. झगडले ते हिन्दू म्हणून.. कशासाठी..? तर हिन्दू अस्मितेसाठी..

प्रस्तुत इतिहासाच्या नोंदी २००५ च्या आसपास टीपुन ठेवल्या गेल्या होत्या.. त्यासाठी अनेक जुन्या पुस्तकांचा आधार होता.. समग्र लिहायचे ठरले तर कितीतरी खंड निर्माण होतील.. काही शेष राहिलेही असेल.. त्या बाबत दिलगिरी ही व्यक्त करतो..

कदाचित प्रश्न पडेल की एवढ्या वर्षानंतर आज का सूचले..? तर त्याचे ही कारण आहे.. हिन्दूवासीयांनो.. खरे तर आव्हाने अजुन बरीच आहेत.. काशी विश्वेश्वर परिसर आणि ज्ञानवापी मस्जिद, मथुरा, भोजशाळा अशी अनेक पवित्र क्षेत्र आहेत जी अजूनही वर्षानुवर्षे मिनारखाली गुदमरुन पडली आहेत.. त्यांची मुक्तता करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिन्दू संघटन.. आजची परिस्थिती पाहता येणारा काळ किती भयानक असेल त्याची कल्पना न केलेली बरी..

खरे तर येथील समाज हिन्दू.. यातील काही आज स्वतःला पृथक समजत असेल तरीही.. काही राष्ट्रविघातक समूह आज समाजात अलगपणाची बीजे रुजविन्याचा प्रयत्न करत आहे.. दुर्दैवाने आमचा समाज अंधपणे त्यास बळीही ठरत आहे.. हिन्दू केवळ धर्म नाही तर संस्कृती आहे.. जीने आजवर हा हिन्दू समाज विविधता असूनही एकसंध बांधून ठेवला आहे.. आज हीच संघटीत भावना राष्ट्राचे बलशाली केंद्र आहे.. या दुष्ट प्रवृत्तिकडून या संघटीत भावनेवरच आघात केला जात आहे.. त्यासाठी, जातिवाद, प्रांतवाद, वर्णवाद, अशा संकुचित अस्मिता जागृत केल्या जात आहेत.. या भूलथापांना बळी पडून आम्ही आमचे स्वत्व गमावून बसत चाललो आहे.. बाबर ने फक्त मंदिर उध्वस्त केले.. आज ते उभे ही राहिले.. पण हिन्दू ऐक्य नष्ट झाले.. तर गल्लोगल्ली असे अनेक बाबर निर्माण होतील..

आज काही निर्लज्जांकडून प्रश्नही उपस्थित होत आहे की, कशासाठी मंदिराचा एवढा अट्टहास..? तर मी एवढेच म्हणेन की, काही बाबी या राष्ट्राच्या आत्मसन्मानाच्याही असतात.. विरोधासाठी विरोध करून आपली राजकीय पोळी भाजनारे करंटे येथे काही कमी नाहीत.. यांना हिन्दू म्हणावे की हिंदुना लागलेला कलंक म्हणावे तेच समजत नाही..

राम मंदिर निर्माण हा केवळ आस्थेचा विजय नाही तर एक अभूतपूर्व संघर्षाचा विजय आहे.. धार्मिक हिंदुस्थानचे धार्मिक अधिष्ठान, परंपरा, संस्कृती आणि लाखो बलिदानाची ती यशोगाथा आहे.. ५०० वर्षे रक्ताने लाल झालेली ही शरयु नदी आज खऱ्या अर्थाने आनंदाश्रु वाहत असेल.. आजवरच्या या रक्तरंजित इतिहासाची ती साक्षीदार होती.. सांस्कृतिक राष्ट्र म्हणून जशी या हिंदुस्थानची ओळख आहे तशीच ही योध्यांचीही भूमि आहे.. याचा विसर न पडावा.. केवळ पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी त्याग आणि बलिदान देण्यासही येथील समाज मागेपुढे पाहत नाही.. हेच या भूमिचे सत्व आणि तत्व आहे.. यातूनच ही राम मंदिराची आकांक्षा..

तरीही एक प्रश्न पडतोच.. राजकीय उल्लेख नकोच पण ओघाने येतोच.. आज या देशात अनेक हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन दिवसरात्र झटणारे.. झिजणारे कार्यकर्ते आहेत.. कोणी त्यांना ठराविक राजकीय पक्षाचे चेले म्हणत असतील..पण विचार केला तर राजकीय समिकरणे वाढीस लागली ती आत्ता.. या पाच सहा दशकात.. पण आत्मउन्नतिची आणि स्वाभिमानाची ज्योत अखंड ठेवत आहे ती गेल्या दोन हजार वर्षापासून.. ज्याला तुम्ही काही जण म्हणत असाल त्या काही जनांच्या त्याग आणि परिश्रमातुन हे राष्ट्र आजही तितक्याच जोमाने उभे आहे.. लक्षात ठेवा, कळत नकळत कोणीतरी तुमच्याही वाट्याची लढाई लढत असतील.. त्यांना साथ देणे हे ही धर्म कर्तव्यच.. केवळ हिंदू म्हणून.. आणि म्हणूनच हे राष्ट्र सुरक्षित आहे..

विपरीत परिस्थितिशी मुकाबला करून हा राष्ट्रसन्मान पुन्हा मिळवणे हा तर येथील दिव्य वारसा.. अगदी मौर्यकाळ, विक्रमादित्य काळ, त्यानंतर छत्रपति शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा काळ याची साक्ष देईल.. आम्हाला सहजच काही गोष्टी प्राप्त होतच नाही.. लढा आणि संघर्ष जणू या मातिचा गुणधर्म बनला आहे.. पण मुळात शत्रुचे हे इस्पीत का साध्य होते.. तर षंड आणि गद्दार रक्त येथे आजही नव नवीन चेहरे घेऊन उदयास येते.. ही सुद्धा या भूमिची शोकांतिका..

असो.. भविष्यात अनेक आव्हाने पेलायची आहेत.. जेंव्हा आत्मविस्मृति होईल तेंव्हा पूर्वजांचे पराक्रम, त्याग, बलिदान आठवावे.. तोच भूतकाळ पुन्हा नव संजीवनी निर्माण करून नव्या आव्हानासाठी सज्ज राहण्यास प्रेरणा देईल.. लक्षात ठेवा.. राष्ट्रउद्धारासाठी हिन्दू ऐक्यशिवाय पर्याय नाही एवढेच शेवटचे सांगून थांबतो..

पिढ्यापिढ्याच्या संघर्षातुन झाला महाविजय साकार..!
गुढी उभारा दिग्विजयाची श्रीरामाचा जय जयकार..!!

*।। सियावर रामचंद्र की जय ।।*

*देशप्रेमी - संपत कौदरे (पुणे - महाराष्ट्र)*
*८८८८९३१२१९*

*|| जय श्री राम ||•*
🚩🚩🙏🙏🚩🚩

18/01/2023

*┈┅━❀꧁ ꧂❀━┅┈*

श्री धन्वन्तरये नमः ! 🙏🏻

Ayurveda ...
the Secretes of Health.

Know Your Prakruti.
(Ayurvedic View)

Very Helpful to know
Your Body & Mind.

Which is Suitable Diet/Exercise/Environment.

Even It will tell U which Profession Suits You.

Learn about This Prakruti From any Ayurvedic Doctor

Call for On-line Consultation
📞 9969883553
Evening at 7 to 9 pm.

Dr. Sateesh Vaze
M.D.(Ayurved)
D.Y.T.(Yoga).

*┈┅━❀꧁ ꧂❀━┅┈*

✨✨✨✨✨✨✨

24/07/2021

ब्राम्हे मुहूर्ते उत्तिष्ठेत् स्वस्थो रक्षार्थमायुषः
-

22/07/2021

*आत्मा*
नैनं छिंदन्ति शस्त्राणि
नैनं दहति पावकः !
नचैनं क्लेदयन्यापो
न शोषयति मारुतः !!

मनुष्याच्या शरीरामध्ये जो आत्मा जीवात्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे , तो 84 दशलक्ष योनितून प्रवास करून येतो.
माणसाचा जन्म हा या साखळीतला शेवटचा जन्म आहे

वासांसि जीर्णानि यथा विहाय ,
नवानि गृह्णाति नरोपराणि ...!
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही... !!

-अर्थात जसे मनुष्य जून्या कपड्यांचा त्याग करून दूसर्या नवीन वस्त्राना ग्रहण करतो तसेच जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून दुसर्या नवीन शरीराला प्राप्त करतो.

याठिकाणी त्याला एक चान्स मिळतो या साखळीतून कायमची निवृत्ती मिळण्यासाठी.
ही मुक्ती मिळण्यासाठी त्याला काही गोष्टी करायला लागतात.
यापूर्वीच्या जन्मांमध्ये जी काही वाईट कर्म केलेली आहे त्या सगळ्याच फळ भरायला लागतं आणि चांगले काम केलेला आहे पुण्याचं त्याचही फळं त्याला मिळतात

एक उदाहरण देतो आपलं बँकेमध्ये अकाऊंट असेल ते आपल्याला कायमचा बंद करायचा असेल
तर तुमची सर्व जमापुंजी काढायला लागते व जे काही लोन बँकेतून घेतला असे
ते सर्व परत फेडायला लागतं तोपर्यंत बँक आपलं अकाऊंट बंद करत नाही.

तेच या शेवटच्या माणूस जन्मात ही होत असतं
आपण आपली सर्व पापे या जन्मात फेडत असतो ती फेडून झाली की आपल्याला मोक्ष प्राप्त होतो.
म्हणूनच आपल्या बाबतीमध्ये काही वाईट झाले असेल तर ...
आपण आपले पाप फेडतो आहोत.
त्याशिवाय मुक्ती नाही.

डाॕ. सतीश वझे
एम्.डी.(आयुर्वेद)
📞 9969883553

30/09/2020

Over Weight
Depression
Respiratory track problems...

these are the common probems during lockdown period

to find solution
contact....

Dr.Sateesh Vaze
M.D.
D.Y.T.
Ayurved and Yoga
Consultant

ph... 9969883553
Timing.... 7 To 9 pm

13/09/2020

मनाचे 3 विभाग आहेत.
1. धी
2. धृति
3. स्मृति

धी- म्हणजे बुद्धी
हा भाग म्हणजे "चांगले काय वाईट काय" ठरवते.

धृति- म्हणजे धी ने सांगीतलेले वाईट सोडून देणे व चांगले ते धारण करण्याचे काम करते.

स्मृति - म्हणजे अनुभव. आपल्याला आलेले -चांगले वाईट अनुभव लक्षात ठेवणे.

या तीनपैकी कोणत्याही भागात बिघाड (भ्रंश) झाल्यास मनाचे काम खराब होते.
उदाहरणार्थ
1. धी भ्रंश... झाल्यास ती व्यक्ती आपल्यासाठी चांगले काय व वाईट काय हे ठरवू शकत नाही
उदा. वेडा व्यक्ति.
2. धृति भ्रंश ... ह्या व्यक्ती ला चांगले काय आणि वाईट काय याची पूर्ण कल्पना असते पण तो चांगल्या गोष्टी आत्मसात आणि वाईट गोष्टींचा त्याग करू शकत नाही.
उदा. व्यसनी माणूस.
3. स्मृति भ्रंश... ह्या व्यक्तीला जुन्या अनुभवांचे स्मरण नसते यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका होतात.

डाॕ. सतीश वझे
आयुर्वेद वाचस्पती (M.D.)
ph... 9969883553

05/09/2020

इच्छा हा आत्म्याचा गूण आहे.
आत्मा हा मनाला आदेश देतो.
मग मन पाच
ज्ञानेंद्रियाच्या साहय्याने ( शब्द , स्पर्श, रूप, रस, गंध ) या पाच गोष्टींचे ज्ञान करतो.
या मनावर संस्कार जो करतो तो शिक्षक.
चांगले व वाइट दोन्ही प्रकार चे संस्कार मनावर होतात.

यामध्ये आत्मा मना ला सांगत असतो की "हे वाईट आहे. हे चांगले आहे ".
पण मन हे एखाद्या Virus मुळे जसा computer बिघडतो तसे बिघडलेले असते त्यामुळे ते वाईट काम करत रहाते
उदा. व्यसनी माणूस.

आत्मा---- मन---- पंचज्ञानेंद्रिय--- विषयाचे ज्ञान....
ह्या ज्ञानाच्या चेन मध्ये
मन ह्यावर संस्कार करणारे शिक्षक... आणि
आत्मा ह्यावर संस्कार करणारे ते गुरू...!

इति आयुर्वेद.

सतीश वझे

22/08/2020

श्री धन्वन्तरये नमः ! 🙏🏻
I am starting on-line (Ayurvedic) consultation from june 2020 evening a
7 to 9 pm
Ph...+919969883553
डाॅ. सतीश वझे
M.D.(Ayurved)
D.Y.T (Yoga)

Address

Mumbai

Telephone

+91-9969883553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yogayurved:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram